सलाम! पुलवामा हल्ल्यातील शहीद मेजर धौंडियाल यांची वीरपत्नी भारतीय सैन्यदलाच्या सेवेत रुजू
फेब्रुवारी 2019 ला मेजर धौंडियाल यांनी या जगाचा निरोप घेतला. पण, त्यांचं अस्तित्वं आणि त्यांची देशाप्रती असणारी ओढ ते मागेच ठेवून गेले.
Indian Army : देशसेवेत रुजू होण्याचं अनेकांचंच स्वप्न असतं. पण, मुळात हे स्वप्न बाळगणं आणि प्रत्यक्षात देशसेवेत रुजू होऊन या देशासाठी प्राणही त्यागण्याची तयारी दाखवणं यासाठी खऱ्या अर्थानं वाघाचं काळीज लागतं. अशीच जिद्द आणि समर्पकता दाखवली होती भारतीय सैन्यातील मेजर विभूती शंकर धौंडियाल यांनी. देशाच्या सेवेत असताना त्यांना पुलवामा येथे दहशतवाद्यांशी दोन हात करताना वीरमरण आलं. फेब्रुवारी 2019 ला मेजर धौंडियाल यांनी या जगाचा निरोप घेतला. पण, त्यांचं अस्तित्वं आणि त्यांची देशाप्रती असणारी ओढ ते मागेच ठेवून गेले.
मेजर यांच्या जाण्यानं त्यांच्या कुटुंबाला, पत्नीला पुरता धक्काच बसला होता. पण, अखेर नियतीही या कुटुंबापुढे झुकली आणि मेजर धौंडियाल याच्या पत्नीनं सारं धाडस एकवटत जीवनातील नव्या पर्वाची सुरुवात केली. मेजर विभूती धौंडियाल यांच्या पत्नी निकीता धौंडियाल यांनी नुकतंच भारतीय सैन्यातील आपली सेवा सुरु केली असून चेन्नई येथील ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी येथे शनिवारी त्यांना लेफ्टनंट पद बहाल करण्यात आलं.
In Pics : NDA ची 140 वी तुकडी देशसेवेसाठी सज्ज; अशी होती पासिंग आऊट परेड
निकीता कौल यांच्या या जिद्दीला आणि त्यांच्या या मोठ्या निर्णय़ाला सारा देश मोठ्या मानानं सलाम करत आहे. वीरपत्नीनं अशा प्रकारे पतीचा वारसा पुढं नेणं ही बाब साऱ्यांनाच अभिमानाची वाटत आहे. यापूर्वीही अनेक वीरपत्नींनी पतीच्या निधनानंतर सैन्यदलाच्या सेवेत रुजू होत या देशाप्रती असणाऱी आपली जबाबदारी पार पाडल्याचं पाहायला मिळालं आहे.
#MajVibhutiShankarDhoundiyal, made the Supreme Sacrifice at #Pulwama in 2019, was awarded SC (P). Today his wife @Nitikakaul dons #IndianArmy uniform; paying him a befitting tribute. A proud moment for her as Lt Gen Y K Joshi, #ArmyCdrNC himself pips the Stars on her shoulders! pic.twitter.com/ovoRDyybTs
— PRO Udhampur, Ministry of Defence (@proudhampur) May 29, 2021
मेजर विभूती धौंडियाल यांच्याविषयी थोडं...
दक्षिण काश्मीरमध्ये असणाऱ्या पुलवामा इथं सैन्याच्या एका कारवाईमध्ये मेजर सहभागी होते. पुलवामा इथं भारतातील सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर आत्मघातील हल्ला करण्यात आलेल्या, ज्यानंतर भारतीय लष्करानं दहशतवादविरोधी मोहिम हाती घेत आक्रमक पवित्रा घेतल्याचं पाहायला मिळालं होतं.
#WATCH Wife of Major VS Dhoundiyal (who lost his life in an encounter in Pulwama yesterday) by his mortal remains. #Dehradun #Uttarakhand pic.twitter.com/5HWD6RXwnO
— ANI (@ANI) February 19, 2019
सैन्यानं जैशचा कमांडर आणि पुलवामा हल्ल्याचा कट रचणाऱ्यांपैकी महत्त्वाचा दहशवादी कामरान याचा यशस्वीपणे खात्मा केला. पण, या कारवाईमध्ये मेजर धौंडियाल आणि त्यांच्यासह इतरही तीन जवान शहीद झाले. त्यांच्या या कामगिरीसाठी त्यांना शौर्य चक्र देऊन गौरवण्यात आलं.
मेजर यांची कामगिरी आजही सर्वांना प्रेरणा देऊन जाते. याचंच एक उदाहरण म्हणजे त्यांची पत्नी. निकीता कौल. पतीच्या निधनानंतर लगेचच त्यांनी शॉर्ट सर्विस कमिशची परीक्षा उत्तीर्ण होत सैन्यातील प्रशिक्षणास सुरुवात केली. 2018 मध्येच ही जो़डी विवाहबंधनात अडकली होती. पण, वर्षभरात त्यांच्या सहजीवनाला गालबोट लागलं. पतीच्या सन्मानार्थ निकीता कौल यांनी कॉर्पोरेट क्षेत्रातील नोकरीला रामराम ठोकत सैन्याच्या सेवेत रुजू होण्याचा निर्णय घेतला.