एक्स्प्लोर
नरसिंगचा रुम पार्टनर संदीप तुलसीही उत्तेजक चाचणीत दोषी
मुंबई : कुस्तीपटू नरसिंग यादव प्रकरणात नवनवीन खुलासे आता समोर यायला लागले आहेत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नरसिंग अजुनही ऑलिम्पिकच्या शर्यतीतून बाहेर गेला नाही.
दरम्यान या सर्व प्रकरणात नाडाच्या भूमिकेवर संशय घेतला जात आहे. 22 जूनला स्पेनहून परत आल्यानंतर नरसिंग यादवची 25 तारखेला पुन्हा उत्तेजक चाचणी घेण्यात आली. या चाचणीचा निकाल 16 तारखेला नाडाच्या अधिकाऱ्यांनी स्वतः नरसिंगला फोन करुन तो चाचणीत दोषी आढळल्याचं सांगितलं. वास्तविक पाहता नाडाचे अधिकारी एखाद्या चाचणीचा निकाल हा फेडरेशनला आधी कळवतात. त्यानंतर हा निकाल फेडरेशन खेळाडूला सांगतं.
यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे नरसिंग यादवचा रुम पार्टनर संदीप तुलसी यादव हा देखील उत्तेजक चाचणीत दोषी आढळला आहे. नरसिंग यादवच्या जीवाला धोका असल्याचा अहवाल सीआयडीने दिला होता, त्यामुळे ट्रेनिंग कँपमध्ये नरसिंगचा पार्टनरही खबरदारी बाळगून निवडला होता. त्यामुळे या सर्व प्रकरणात नाडाच्या अधिकाऱ्यांनी घेतलेल्या भूमिकेवर संशय घेतला जात आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement