उलट दिशेने वाहते भारतातील 'ही' नदी, कारण जाणून व्हाल चकित
Narmada River Flow : देशातील बहुतेक नद्या पश्चिमेकडून पूर्व दिशेला वाहतात आणि बंगालच्या उपसागरात मिळतात. पण नर्मदा नदी पूर्वेकडून पश्चिमेकडे प्रवाहाच्या विरुद्ध वाहते आणि अरबी समुद्राला मिळते.
![उलट दिशेने वाहते भारतातील 'ही' नदी, कारण जाणून व्हाल चकित narmada river flows against current know reason Narmada River flow Narmada River mythology उलट दिशेने वाहते भारतातील 'ही' नदी, कारण जाणून व्हाल चकित](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/19/5f2c43242100def4a8bb5505aa1436a51671420585880322_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Narmada River : भारताला (India) नद्यांचा (River) देश म्हटले जाते. भारतात छोट्या-मोठ्या मिळून एकूण 400 पेक्षा अधिक नद्या (Rivers) आहेत. जगातील अनेक मोठ्या आणि पवित्र नद्या भारतात वाहतात. भारतातील नद्यांची एक खास गोष्ट म्हणजे येथील सर्व नद्या एकाच दिशेने वाहतात, मात्र यालाही अपवाद एक नदी आहे. गंगा नदी ते यमुना नदीपर्यंत कोणत्याही नदीचा प्रवाह पाहिल्यास या नद्या पश्चिम दिशेकडून पूर्व दिशेकडे वाहत असल्याचं तुम्हाला दिसेल. पण भारतात अशी एक नदी आहे जी तिच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला वाहते. या बद्दल तुम्हाला माहित नसेल, तर जाणून घ्या भारतात अशी कोणती नदी आहे.
कोणती नदी विरुद्ध दिशेला वाहते? ( Which river flows in opposite direction? )
देशातील बहुतेक नद्या पश्चिमेकडून पूर्व दिशेला वाहतात आणि बंगालच्या उपसागरात मिळतात, पण नर्मदा नदी पूर्वेकडून पश्चिमेकडे प्रवाहाच्या विरुद्ध वाहते आणि अरबी समुद्राला मिळते. नर्मदा नदी गुजरात आणि मध्य प्रदेश या भारतातील दोन मोठ्या राज्यांची मुख्य नदी आहे.
नर्मदा नदी विरुद्ध दिशेला वाहण्यामागचं कारण काय? ( What is the reason behind Narmada river flowing in opposite direction? )
गुजरात (Gujrat) आणि मध्य प्रदेश (Madhya Pradesh) राज्यामधील मुख्य नदी नर्मदा विरुद्ध दिशेला वाहते. यामागे एक मुख्य कारण आहे. नर्मदा नदी विरुद्ध दिशेला वाहण्यामागचं मुख्य कारण म्हणजे रिफ्ट व्हॅली. रिफ्ट व्हॅली (Rift Valley) म्हणजे नदी ज्या दिशेने वाहते, तिचा उतार विरुद्ध दिशेला असतो. या उतारामुळे नर्मदा नदीचा प्रवाह पूर्वेकडून पश्चिमेकडे आहे. ही नदी मखल पर्वताच्या अमरकंटकच्या शिखरावरून उगम पावते.
पौराणिक कथा काय सांगतात? ( Narmada River Mythology )
प्रवाहाविरुद्ध वाहणाऱ्या नर्मदा नदीमागे एक पौराणिक कथाही प्रचलित आहे. या पौराणिक कथेनुसार, नर्मदा नदीचं लग्न सोनभद्रासोबत ठरलं होतं, पण नर्मदेची मैत्रीण जोहिला हिच्यामुळे दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला आणि याचा राग आल्याने नर्मदेने आयुष्यभर कुमारी राहण्याचा निर्णय घेतला आणि म्हणून नर्मदेने प्रवाहाविरुद्ध वाहून जाण्याचा निर्णय घेतला.
नर्मदा भारतातील पाचव्या क्रमांकाची नदी
नर्मदा भारतातील पाचव्या क्रमांकाची मोठी नदी असून सर्वांत मोठी पश्चिम वाहिनी नदी आहे. नर्मदा नदीला अनेक नावांनी संबोधलं जातं. नर्मदा नदीला रेवा, अमरजा, मेकलकन्या, रुद्रकन्या अशीही नावं आहेत. नर्मदा नदी मध्य प्रदेशातून वाहणारी सर्वात मोठी नदी आहे. ही नदी भारतातील मध्य प्रदेश आणि गुजरात राज्यामधून वाहते.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)