एक्स्प्लोर

चारशे वर्षांनी शापमुक्ती, वाडियार राजघराण्यात पाळणा हलला

म्हैसूर राजघराण्यात कधीही मुलाचा जन्म होणार नाही आणि हा राजवंश नष्ट होईल, असा शाप या घराण्याला मिळाल्याची आख्यायिका आहे

म्हैसूर : म्हैसूरच्या वाडियार राजघराण्यात राजपुत्राच्या जन्मामुळे आनंदाचं वातावरणं आहे. तब्बल चारशे वर्षांनंतर या राजघराण्यात पाळणा हलला. त्यामुळे वाडियार राजघराण्याची शापातून मुक्तता झाल्याचं म्हटलं जात आहे. राजा यदुवीर आणि त्रिशिका यांना पुत्ररत्नाचा लाभ झाला. म्हैसूर राजघराण्यात कधीही मुलाचा जन्म होणार नाही आणि हा राजवंश नष्ट होईल, असा शाप या घराण्याला मिळाल्याची आख्यायिका आहे. त्रिशिका यांच्या पोटी जन्मलेल्या बाळामुळे राजघराण्यात आनंदी आनंद आहे. दत्तक वारसाची परंपरा वाडियार राजघराण्याचा वारस हा दत्तक घेण्याची परंपरा आहे. राणी प्रमोदा आणि राजा श्रीकांतदत्ता यांना संतती नसल्यामुळे काही वर्षांपूर्वी त्यांनी राजा यदुवीर कृष्णदत्त चामराजा वाडियार यांना दत्तक घेतलं होतं. गेल्या वर्षी राजा यदुवीर कृष्णदत्त चामराजा वाडियार यांचा विवाह राजस्थानमधील डूंगपूरच्या राजकुमारी त्रिशिकासोबत झाला. ऐतिहासिक आंबा विला पॅलेसमध्ये या दोघांचा विवाह जूनमध्ये पार पडला. यदुवीर यांनी बोस्टनमध्ये शिक्षण पूर्ण केलं आहे. तर त्रिशिका यांनी अमेरिकेतून उच्चशिक्षण घेतलं आहे. कोणी शाप दिल्याची आख्यायिका ? 1612 मध्ये विजयनगर साम्राज्याचं पतन झाल्यानंतर अलमेलम्मा यांनी या घराण्याला शाप दिला होता. विजयनगर साम्राज्याचं पतन झाल्यानंतर म्हैसूर राजघराण्याच्या सैनिकांनी विजयनगर साम्राज्याचा खजिना लुटला. त्यानंतरही राणी अलमेलम्माजवळ शाही घराण्याचे दागदागिने शिल्लक होते. जेव्हा वाडियार राजांनी ते दागिने वाडियार घराण्याला देण्याचा आदेश राणीला दिला, तेव्हा त्यांनी नकार दिला. मात्र बळजबरीने शाही सैन्यानं राणीकडून दागिने घेण्याच्या प्रयत्न केला. अखेर राणी अलमेलम्मा यांनी उंच डोंगरावर धाव घेतली आणि वाडियार घराण्याला तीन शाप दिले. 'तालाकडूचा वाळवंट होईल, मलंगीला पाण्याचा भोवरा गिळंकृत करेल, आणि म्हैसूरच्या राजाला कधीही अपत्य प्राप्त होणार नाही'  असा शाप देऊन राणी अलमेलम्मा यांनी कावेरी नदीत उडी घेतली. या शापामुळेच राजघराण्यात मुलाचा जन्म झाला नसल्याचं मानलं जातं. राजघराण्याचा वारस दत्तक घेण्याची प्रथा वाडियारमध्ये रुढ झाली. आता चिमुकल्याच्या आगमनानं हे घराणं शापमुक्त झालं आहे, त्यामुळे म्हैसूरच्या महालात आनंदोत्सव सुरु आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

दिलासादायक! सोन्या चांदीच्या दरात मोठी घसरण, सोन्यात गुंतवणूक केल्यास पुढे फायदा होणार का? 
दिलासादायक! सोन्या चांदीच्या दरात मोठी घसरण, सोन्यात गुंतवणूक केल्यास पुढे फायदा होणार का? 
मुंबईकरांसाठी गुडन्यूज, कल्याण ते CSMT सर्व लोकल 15 डब्ब्यांच्या करा; संसदेत प्रश्न, गर्दी कमी करण्यासाठी उपाय
मुंबईकरांसाठी गुडन्यूज, कल्याण ते CSMT सर्व लोकल 15 डब्ब्यांच्या करा; संसदेत प्रश्न, गर्दी कमी करण्यासाठी उपाय
शॉकिंग! रिल्सचा नाद केला, जीवावर बेतला; व्हिडिओ 'शूट' करताना बंदुकीतून सुटली गोळी, युवक जागेवरच ठार
शॉकिंग! रिल्सचा नाद केला, जीवावर बेतला; व्हिडिओ 'शूट' करताना बंदुकीतून सुटली गोळी, युवक जागेवरच ठार
TMC Candidate List : ममता बॅनर्जींचा धमाका, विधानसभेसाठी एका झटक्यात सर्व उमेदवार जाहीर
मोठी बातमी : ममता बॅनर्जींचा धमाका, एका झटक्यात सर्व उमेदवार जाहीर, नंदीग्राममधून स्वत: लढणार नाहीत!

व्हिडीओ

Farmer In UP's Firozpur Village Wears Bear : माकडांमुळे दशा, अस्वलाची वेशभूषा Special Report
Eknath Shinde Meet PM Modi : एकनाथ शिंदे दिल्लीत मोदींना भेटले, काय ठरलं? Special Report
Narendra Mehta : आरोपांचा सातबारा, सरकारकडून कोरा; पटोलेंचे गंभीर आरोप Special Report
Ahilyanagar Student Protest : अहिल्यानगरात स्माईलींग अस्मिता विद्यार्थी संघटनेचे अन्नत्याग आंदोलन
Dhule LPG : धुळ्यात गॅसचा तुटवडा; मात्र राहुल कुलकर्णीच्या प्रयत्नामुळे बायोमासचा पर्याय उपलब्ध

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सहावीतील मुलीवर ॲसिड हल्ला, अहिल्यानगर हादरलं; विधानसभेत पडसाद, राधाकृष्ण विखे पाटलांची पहिली प्रतिक्रिया
सहावीतील मुलीवर ॲसिड हल्ला, अहिल्यानगर हादरलं; विधानसभेत पडसाद, राधाकृष्ण विखे पाटलांची पहिली प्रतिक्रिया
मोठी बातमी! वादळी चर्चेनंतर विधानपरिषदेततही धर्म स्वातंत्र्य विधेयक मंजूर; अनिल परबांचं घणाघाती, अभ्यासू भाषण
मोठी बातमी! वादळी चर्चेनंतर विधानपरिषदेततही धर्म स्वातंत्र्य विधेयक मंजूर; अनिल परबांचं घणाघाती, अभ्यासू भाषण
मोठी बातमी! दहावीचा भूगोलचा पेपर होणार, 50 प्रश्नपत्रिका फुटल्यामुळे पडलेला प्रश्न सुटला, पालक अन् विद्यार्थ्यांचा जीव भांड्यात
मोठी बातमी! दहावीचा भूगोलचा पेपर होणार, 50 प्रश्नपत्रिका फुटल्यामुळे पडलेला प्रश्न सुटला, पालक अन् विद्यार्थ्यांचा जीव भांड्यात
एसीबीचं धाडसत्र जोरात; 35 हजार लाच घेताना वैद्यकीय अधिकाऱ्याला रंगेहात अटक, सापळा रचून बेड्या
एसीबीचं धाडसत्र जोरात; 35 हजार लाच घेताना वैद्यकीय अधिकाऱ्याला रंगेहात अटक, सापळा रचून बेड्या
धारवाडमध्ये हिमवर्षावस, वयोवृद्ध म्हणाले असा पाऊस बिघतला नाही; धाराशिवमध्येही मोठ-मोठ्या गारांचा पाऊस
धारवाडमध्ये हिमवर्षावस, वयोवृद्ध म्हणाले असा पाऊस बिघतला नाही; धाराशिवमध्येही मोठ-मोठ्या गारांचा पाऊस
मोठी बातमी : बारामती पोटनिवडणूक लढवतो आणि जिंकून दाखवतो, लक्ष्मण हाकेंचा निर्धार, म्हणाले, सुनेत्रा पवारांना विधानपरिषदेवर घ्या
मोठी बातमी : बारामती पोटनिवडणूक लढवतो आणि जिंकून दाखवतो, लक्ष्मण हाकेंचा निर्धार, म्हणाले, सुनेत्रा पवारांना विधानपरिषदेवर घ्या
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 मार्च 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 मार्च 2026 | मंगळवार
Pune News: धक्कादायक! दापोडीत मुळा नदीपात्रात आढळला महिलेचा मृतदेह; परिसरात मोठी खळबळ
धक्कादायक! दापोडीत मुळा नदीपात्रात आढळला महिलेचा मृतदेह; परिसरात मोठी खळबळ
Embed widget