मोठी बातमी! म्हैसूर-दरभंगा एक्सप्रेस मालगाडीला धडकली, रेल्वे डब्यांना आग, अनेकजण जखमी
तामिळनाडूमधून ( Tamil Nadu) एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. तिथं एक मोठा रेल्वे अपघात (Train Accident) झाल्याची घटना घडलीय.
Mysore-Darbhanga Train Accident : तामिळनाडूमधून ( Tamil Nadu) एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. तिथं एक मोठा रेल्वे अपघात (Train Accident) झाल्याची घटना घडलीय. तिरुवल्लूरमध्ये म्हैसूर-दरभंगा एक्स्प्रेसची (Mysore-Darbhanga) मालगाडीला धडक बसली आहे.यामध्ये किमान 20 जण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. अपघातानंतर पॅसेंजर ट्रेनचे 6 डबे रुळावरून घसरले असून दोन डब्यांना आग लागली आहेत. यामध्ये अनेक जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.
घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य सुरू
दरम्यान, या अपघातात जखमी झालेल्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये अपघातस्थळी आग दिसत आहे. या अपघातात अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही. मात्र, काही जण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या: