(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mursi Community : ही आहे जगातील सर्वाधिक धोकादायक जमात, अनोळखी लोकांना बघताच करतात ठार
मुर्सी समूहामध्ये काही हिंसक प्रथा आहेत. या समूहामध्ये मुलगी 15 ते 16 वर्षाची झाल्यानंतर त्यांच्या ओठांना कापून त्यांच्या ओठांमध्ये काही महिने 12 सेंटीमीटरचा लाकडी रॉड घालून ठेवतात.
Mursi Community : संपूर्ण जग वेगानं आधुनिकीकरणाकडे जात आहे. नव्या बदलांना स्विकारत असताना जुन्या प्रथा, परंपरंपरांना नाकारलं जातं आहे. पण अजूनही जगात असा एक समूह आहे जो या आधुनिक जगापासून कोसो दूर आहे. या विज्ञान-तंत्रज्ञानाच्या जगाची त्यांना पुसटशीही कल्पना नाही. त्यांच्याच जगात असतात. या समूहाचे जीवन जगण्यासाठी काही नियम बनवले आहेत त्या नियमांना बांधिल राहूनच त्यांच वर्तन असतं. या समूहाचा अनोळखी माणसासोबतही त्यांच्या नियमानुसारच व्यवहार करतात. पण जगभरातील देशांमध्ये या समूहाच्या जमातींना संविधानिक कायदे कानून लागू पडत नाहीत. जर या समूहाने एखाद्या व्यक्तीची हत्या केली,तर त्यांच्यावर कोणत्याही न्यायालयात केस चालवली जात नाही. त्यामुळे ते संविधानिक कायद्यापासून पूर्ण स्वतंत्र आहेत. ही जमात मुर्सी (Mursi Community) नावानं ओळखली जाते.
भारतामध्ये अंदमान-निकोबारजवळील सेनेगल बेटावर निवास करणाऱ्या समूहांना हे स्वतंत्र अधिकार आहेत. यासारखेच इथियोपिया या देशाच्या ओमान घाटात आणि सुदान देशाच्या सीमेवर राहणाऱ्या मुर्सी समूहांनाही हे अधिकार प्राप्त आहेत. या समूहाला जगातील सर्वाधिक हिंसक आणि धोकायदाय समूह म्हणून ओळखलं जातं.
लोकांना ठार करतात...
मुर्सी जमातीबद्दल (Mursi Community) असं सांगितलं जातं की, त्यांच्या समूहात सर्वाधिक शक्तीशाली त्यालाच मानलं जातं ज्याने सर्वात जास्त माणसांना ठार मारलं आहे. अर्थात, काही वर्षापूर्वी अशा पद्धतीनं ठार मारलं जातं होतं.आपल्यासारखे सर्वसामान्य लोक लवकर त्यांच्या संपर्कात येत नाहीत. त्यामुळे बाहेरच्या जगातील लोक आणि मुर्सी जमातीच्या लोकांचा समोरासमोर खूप कमी वेळा सामना होतो. परंतु, मुर्सी जमातीजवळ अत्यंत भयंकर हत्यार आहेत. सध्या या जमातींची लोकसंख्या 10 हजार असल्याचं समजतं. हा समूहाला इतर जगातील लोकांपासून कोसो दूर राहतो. अशा विचित्र परंपरा पाळणारा समूह आहे.
या समूहात मुलींचे कापण्याची प्रथा आहे रूढ
मर्सी समूहात अनेक हिंसक प्रथा आहेत. याचं आजही तंतोतंत पालन केलं जात. या समूहातील 15 ते 16 वर्षाच्या मुलींचे ओठ कापून त्या ओठांमध्ये एक डिस्क घातली जाते. या बॉडी मॉडिफिकेशनला लिप-प्लेटच्या नावानं ओठखलं जातं. या कारणामुळे येथील महिला जगभरातील पर्यटकासाठी आकर्षाणाचं केंद्रबिंदू ठरत आहेत. आता आफ्रिकेतील फक्त मुर्सी, छाई आणि तिरमा या जमातीमध्ये ही हिंसक प्रथा राहिली आहे. मुर्सी जमातीच्या समूहात जनावरांच रक्तही पिलं जातं.