(Source: Poll of Polls)
Narendra Modi : नरेंद्र मोदींनी काल चिंता व्यक्त करताच मोहम्मद यूनुस यांचा मोदींना फोन, हिंदूंसह अल्पसंख्यांकांच्या सुरक्षेचा शब्द दिला
Muhammad Yunus Called PM Modi: बांगलादेशमधील अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद यूनुस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन करुन संवाद साधला. मोदी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत माहिती दिली.
Bangladesh Crisis News नवी दिल्ली: बांगलादेशमधील अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद यूनुस यांनी पंतप्रदान नरेंद्र मोदी यांना फोन केला होता. यूनुस यांनी बांगलादेशमध्ये सुरु असलेल्या हिंसक आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हिंदू आणि इतर अल्पसंख्यांकांच्या सुरक्षेचं आश्वासन दिलं आहे. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करुन माहिती दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत म्हणाले,प्रा. मोहम्मद यूनुस यांच्याशी फोनवर चर्चा केली, सद्यस्थितीवर विचारांचं आदान प्रदान केलं, लोकशाही , स्थिर, शांततापूर्ण आणि प्रगतीशील बांग्लादेशसाठी भारताचा पाठिंबा असेल, असं सांगितल्याचं मोदी म्हणाले. मोहम्म यूनुस यांनी बांगलादेशात हिंदू आणि इतर अल्पसंख्यांकाच्या सुरक्षेचं आश्वासन दिल्याचं मोदी यांनी सांगितलं.
मोदींनी काल चिंता व्यक्त करताच यूनुस यांचा आज फोन
नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त केलेल्या भाषणात बांगलादेशमधील स्थिती लवकर सामान्य होईल, अशी आशा व्यक्त केली होती. 140 कोटी भारतीय शेजारच्या देशातील हिंदू आणि अल्पसंख्यांकांच्या सुरक्षेबाबत चिंतीत आहेत, असं मोदींनी म्हटलं होतं. मोहम्मद यूनुस यांनी बांगलादेशची राजधानी ढाका येथील ढाकेश्वर मंदिरात जाऊन देशातील हिंदूंशी संपर्क साधला. माजी पंतप्रधान शेख हसीना यांची सत्ता गेल्यानंतर ज्या हिंसाचाराच्या घटना घडल्या होत्या त्यामध्ये अल्पसंख्यांकांवर हल्ला करणाऱ्यांना सजा देणार असल्याचं मोहम्मद यूनुस म्हणाले.
मोहम्मद यूनुस यांनी बांगलादेशमधील स्थिती बिघडल्यानंतर आंदोलक विद्यार्थ्यांच्या आग्रहाखातर 8 ऑगस्टला अंतरिम सरकारचे प्रमुख म्हणून शपथ घेतली होती. शेख हसीना यांनी अचानक राजीनामा दिल्यानंतर त्या भारतात दाखल झाल्या होत्या. यानंतर रिक्त असलेलं पंतप्रधानपद मोहम्मद यूनुस सांभाळत आहेत. नोकऱ्यांमधील वादग्रस्त आरक्षणाच्या धोरणाच्या विरोधात बांगलादेशमध्ये हिंसक आंदोलन झालं होतं.
नरेंद्र मोदी यांचं ट्विट
Received a telephone call from Professor Muhammad Yunus, @ChiefAdviserGoB. Exchanged views on the prevailing situation. Reiterated India's support for a democratic, stable, peaceful and progressive Bangladesh. He assured protection, safety and security of Hindus and all…
— Narendra Modi (@narendramodi) August 16, 2024
दरम्यान, बांगलादेशात निर्माण झालेल्या परिस्थितीमुळं 3 ऑक्टोबरपासून सुरु होणाऱ्या महिला टी 20 वर्ल्ड कपच्या आयोजनावर देखील परिणाम होण्याची शक्यता आहे.
संबंधित बातम्या :