एक्स्प्लोर

Mumbai School Reopen : मुंबईत आजपासून पहिली ते सातवीच्या शाळा सुरु होणार, महापालिकेचे मुख्याध्यापकांना निर्देश

Mumbai School Reopen : मुंबईत आजपासून पहिली ते सातवीच्या शाळा सुरु करा, असे निर्देश पालिकेनं मुख्याध्यापकांना दिले आहेत. शाळांकडून कोणत्याही सूचना न मिळाल्यानं पालक मात्र अद्याप संभ्रमात आहेत.

Mumbai School Reopen : मुंबईत आजपासून पहिली ते सातवीच्या शाळा सुरु करा, असे निर्देश मुंबई महापालिकेनं सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना दिले आहेत. पालिकेचे शिक्षणाधिकारी राजू तडवी यांनी याबाबतच्या सूचना दिल्या आहेत. असं असतानाही शाळांकडून कोणत्याही सूचना देण्यात आलेल्या नसल्यामुळं पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं आहे. अशातच मुंबई महापालिकेचे शिक्षणाधिकारी राजू तडवी यांनी एबीपी माझाशी बोलताना मुंबईतील शाळा आजपासूनच सुरु होणार असून शाळेबाबत कुठलाही संभ्रम पालक, विद्यार्थी आणि शिक्षकांनी बाळगू नये, असं स्पष्ट केलं आहे. 

"15 डिसेंबरपासून शाळा सुरु करा, हे याआधीच शाळांना सुचित केले होते. मात्र तरीदेखील काही शाळांनी आजतागायत पाल्याला शालेत पाठविण्याविषयी पालकांना कोणत्याही सूचना दिलेल्या नाहीत. ही बाब गंभीर असून पुन्हा नव्याने सूचना देण्यात येतील.", असं मुंबई महापालिकेचे शिक्षणाधिकारी राजू तडवी यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं.  

15 डिसेंबरपासून पहिली ते सातवीचे वर्ग सुरु करण्याच्या सूचना मुंबई महापालिका शिक्षणाधिकारी राजू तडवी यांनी दिल्या आहेत. मुंबईतील प्राथमिक शाळा सुरु करण्याचा निर्णय महापालिकेनं 30 नोव्हेंबरलाच घेतला होता. कोरोना प्रतिबंधक नियमावलीही त्यावेळी जाहीर करण्यात आली होती. मात्र शाळा सुरु होण्यास एक दिवस शिल्लक असताना शाळांकडून कोणत्याही सूचना देण्यात आलेल्या नाही. त्यामुळे पालकवर्गात संभ्रमाचं वातावरण होतं. 

पाहा व्हिडीओ : मुंबई आज तर पुण्यात उद्या शाळा सुरु; काय आहेत नियम?

राज्यात ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर मुंबईत प्राथमिक शाळा सुरु करण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनावर सोपविला आहे. मुंबई महापालिकेचे शिक्षणाधिकारी राजू तडवी यांनी 30 नोव्हेंबरला पत्रकार परिषद घेऊन 15 डिसेंबरपासून पहिली ते सातवीचे वर्ग सुरु होणार असल्याचं जाहीर केलं होतं. आठवड्याभरानंतर तडवी यांना पुन्हा शाळा सुरु होण्यासंदर्भात विचारणा केली असता, 15 डिसेंबरपासून प्राथमिक शाळा सुरु करण्याच्या निर्णयात कोणताही बदल झालेला नसल्याचंही त्यांनी सांगितलं होतं. मुंबईतील बहुसंख्य पालक हे नोकरदार असून कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरल्यामुळे ते कामाच्या ठिकाणी रुजू झाले आहेत. 15 डिसेंबरपासून शाळा सुरु होणार असल्यास तयारीसाठी शाळांनी एक दिवस आधी पालकांना सूचित करणं आवश्यक असल्याचं पालकांचे म्हणणं आहे. मात्र काही शाळा अद्याप शिक्षण विभागाच्या नव्या सूचनांच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे संभ्रमाचं वातावण निर्माण झालं होतं. 

"शिक्षण विभागाचे निर्णय हे आयत्या वेळी केव्हाही बदलतात किंवा एक दिवस आधी नव्या सूचना येऊन धडकतात. त्यामुळे काही शाळांनी 'वेट ऍण्ड वॉच'ची भूमिका घेतली असावी. मुंबईत मागील काही दिवस संचारबंदीसारखे आदेश लागू होत असल्यानं पालकांच्या मनातही ओमायक्रॉनविषयी भीतीचं वातावरण निर्माण होत आहे.", अशी प्रतिक्रिया महामुंबई मुख्याध्यापक संघटनेचे अध्यक्ष संजय डावरे यांनी दिली आहे. 

पुण्यात 16 डिसेंबरपासून शाळा सुरु 

मुंबई, पुणे, औरंगाबाद शहरातील शाळा अखेर सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबईत आजपासून महापालिका क्षेत्रातील शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर पुणे महापालिका क्षेत्रातील परवापासून म्हणजे 16 तारखेपासून पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळा सुरु होणार आहेत. तिकडे औरंगाबादेत पुढील आठवड्यात म्हणजे 20 डिसेंबर पासून  महापालिका क्षेत्रातील शाळा सुरु होणार आहेत. पुणे महापालिका हद्दतील शाळा गुरुवारपासून (16  डिसेंबर) सुरु होणार आहेत. पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळा सुरु करण्याचा निर्णय पुणे पालिकेने घेतलाय. कोरोना नियमांचं पालन करत शाळा सुरु करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.  

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Pune School Reopen : पुण्यात 16 डिसेंबरपासून पहिली ते सातवीच्या शाळा सुरु होणार

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : मोठी बातमी! सुनील तटकरे शरद पवारांच्या भेटीला, भेटीच्या टायमिंगमुळे खळबळ, तर तटकरेंचा वेगळा दावा
मोठी बातमी! सुनील तटकरे शरद पवारांच्या भेटीला, भेटीच्या टायमिंगमुळे खळबळ, तर तटकरेंचा वेगळा दावा
धक्कादायक! वादळी वाऱ्यासह पावसानं भिंत कोसळली, सहा भाविकांचा मृत्यू तर अनेकजण जखमी, सांगली जिल्ह्यात हळहळ
धक्कादायक! वादळी वाऱ्यासह पावसानं भिंत कोसळली, सहा भाविकांचा मृत्यू तर अनेकजण जखमी, सांगली जिल्ह्यात हळहळ
...बाकी ज्ञान कशाला पाजळत बसता? मुंबईतील 25 वाहनांच्या ताफ्यावरुन रोहित पवार-अमित साटम यांच्यात जुंपली
...बाकी ज्ञान कशाला पाजळत बसता? मुंबईतील 25 वाहनांच्या ताफ्यावरुन रोहित पवार-अमित साटम यांच्यात जुंपली
सावधान! महाराष्ट्रासाठी पुढचे 3 दिवस महत्वाचे, विक्रमी तापमानाची नोंद होणार, हवामान विभागाचा इशारा, काळजी घेण्याचं आवाहन
सावधान! महाराष्ट्रासाठी पुढचे 3 दिवस महत्वाचे, विक्रमी तापमानाची नोंद होणार, हवामान विभागाचा इशारा, काळजी घेण्याचं आवाहन

व्हिडीओ

Chandrashekhar Bawankule on Narendra Modi : नरेंद्र मोदींच्या हातात देश सुरक्षित आहे!
Kolhapur Gold Silver : सोनं खरेदी थांबवा मोदींकडून आवाहन, कोल्हापुरातील सराफा व्यापारी काय म्हणाले?
Ambadas Danve on Modi : मोदींना आवाहन करावं लागतं म्हणजे त्यांनी अपयशाची कबुली दिली
Tamil Nadu News : तामिळनाडूत अण्णाद्रमुकमध्ये उभी फूट? प्रकरण काय?
Raj Thackeray On Modi : देशाच्या, राज्याच्या अर्थव्यवस्थेचं कंबरडं मोडून ठेवलंय- राज ठाकरे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : पंतप्रधान मोदी 22 लाख विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत खेळत आहेत, NEET पेपर लीकवर राहुल गांधी संतप्त
पंतप्रधान मोदी 22 लाख विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत खेळत आहेत, NEET पेपर लीकवर राहुल गांधी संतप्त
महाराष्ट्रात सर्वाधिक तेल चंद्रकांत पाटील वापरतात; मोदींचे आवाहन, जितेंद्र आव्हाडांचा घोड्यावरुन हल्लाबोल
महाराष्ट्रात सर्वाधिक तेल चंद्रकांत पाटील वापरतात; मोदींचे आवाहन, जितेंद्र आव्हाडांचा घोड्यावरुन हल्लाबोल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 मे 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 मे 2026 | मंगळवार
PM मोदींच्या आवाहनावर राज ठाकरे भडकले; मनसेप्रमुखांवर महायुतीचा पलटवार, नितेश राणे, कदम पिता-पुत्रांचा वार
PM मोदींच्या आवाहनावर राज ठाकरे भडकले; मनसेप्रमुखांवर महायुतीचा पलटवार, नितेश राणे, कदम पिता-पुत्रांचा वार
जळगावात लघु पाटबंधारेच्या भूसंपादनात कोट्यवधींचा घोटाळा; 2 वकिलांसह 7 शेतकऱ्यांविरुद्ध गुन्हा, उडाली खळबळ
जळगावात लघु पाटबंधारेच्या भूसंपादनात कोट्यवधींचा घोटाळा; 2 वकिलांसह 7 शेतकऱ्यांविरुद्ध गुन्हा, उडाली खळबळ
मोठी बातमी! NEET पेपरफुटीत नाशिकमधून 30 वर्षीय युवकास अटक, हेअरस्टाईल बदलून फिरायचा; सीबीआय ॲक्शन मोडवर
मोठी बातमी! NEET पेपरफुटीत नाशिकमधून 30 वर्षीय युवकास अटक, हेअरस्टाईल बदलून फिरायचा; सीबीआय ॲक्शन मोडवर
NEET Exam Cancelled : नीट परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये संताप, मानसिक आणि आर्थिक ताण वाढला
NEET परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये संताप, मानसिक आणि आर्थिक ताण वाढला
Mahadev Jankar: महादेव जानकरांचा मेंढपाळाच्या वाड्यावर मुक्काम; गोधढी पांघरुन शेतात पालावर निवांत झोपले
महादेव जानकरांचा मेंढपाळाच्या वाड्यावर मुक्काम; गोधढी पांघरुन शेतात पालावर निवांत झोपले
Embed widget