एक्स्प्लोर
Advertisement
मी असेपर्यंत पक्षात फूट पडणार नाही : मुलायमसिंह यादव
लखनऊ : मी असेपर्यंत समाजवादी पक्षात फूट पडू शकणार नाही, अखिलेश आणि शिवपाल यादव यांच्यात कोणतेही वाद नाहीत, असं समाजवादी पक्षाचे नेते मुलायमसिंह यादव यांनी सांगितलं.
उत्तर प्रदेशच्या निवडणुका अगदी तोंडावर असताना समाजवादी पक्षाचे नेते मुलायमसिंह यादव यांच्या कुटुंबातील यादवीनं कळस गाठला आहे.
मुख्यमंत्री आणि पुतण्या अखिलेश यादव यांच्यावर नाराज असलेले शिवपाल यादव यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. मात्र हा राजीनामा मुलायम सिंहांनी स्वीकारला नाही.
मुलायमसिंह यादव यांचे सख्खे बंधू शिवपाला यादव आणि मुलायमसिंहांचे पुत्र, मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्यात धुसफूस सुरु आहे.
मुलायमसिंहांचे चुलतभाऊ रामगोपाल आणि अखिलेश यादव हे एका बाजूला आणि मुलायमसिंह आणि शिवपाल हे दुसऱ्या बाजूला असा संघर्ष आहे.
समर्थकांची घोषणाबाजी
शिवपाल यांच्या घराबाहेर समर्थकांची जोरदार घोषणाबाजी केली. शिवपाल यांनी समाजवादी पक्षातील पदांचा राजीनामा दिल्यानं समर्थक नाराज झाले. तसंच यादव कुटुंबातील पक्षाचे महत्वाचे सदस्य रामगोपाल यांना हटवण्याची मागणी शिवपाल समर्थकांनी केली.
तर दुसरीकडे रामगोपाल को बाहर करो अशी घोषणाबाजी शिवपाल यांच्या समर्थकांनी केली.
नेताजींना म्हणजेच मुलायमसिंहांना जाऊन भेटा आणि त्यांच्यासमोर तुमची बाजू मांडा अशी साद शिवपाल यांनी समर्थकांना घातली.
गेल्या काही दिवसांपासून मुलायम सिंह आणि अखिलेश यांच्यातून विस्तवही जात नाही.मुलायम यांच्या बाजूनं असणाऱ्या शिवपाल यांच्या पक्षातील बऱ्याच अधिकारांवर अखिलेश यादवांनी गदा आणण्यास सुरुवात केल्यानं युद्धाचा भडका झाला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
पुणे
निवडणूक
निवडणूक
Advertisement