एक्स्प्लोर

आग्र्यात बनत असलेलं मुघल म्युझियम आता छत्रपती शिवाजी महाराज म्युझियम म्हणून ओळखलं जाणार!

योगी सरकारने आग्र्यात बनत असलेल्या मुघल म्युझियमचं नाव बदललं आहे. मुघल म्यूझियम आता छत्रपती शिवाजी महाराज म्युझियम नावाने ओळखलं जाणार आहे.

आग्रा (उत्तर प्रदेश) : अलाहाबादचं नामांतर प्रयागराज, फैजाबाद बनलं अयोध्या, मुघलसरायचं नाव बदलून दीनदयाल उपाध्याय नगर आणि आता आग्र्याच्या मुघल म्युझियमचं नाव छत्रपती शिवाजी महाराज म्युझियम केलं जाणार आहे. उत्तर प्रदेशात नामांतराचं राजकारण पुन्हा सुरु झालं आहे. यावेळी योगी आदित्यनाथ सरकारने आग्र्यात बनत असलेल्या मुघल म्युझियमचं नाव बदललं आहे. आता हे म्युझियम छत्रपती शिवाजी महाराज म्युझियम नावाने ओळखलं जाईल.

ताजमहलमुळे जगभरात प्रसिद्ध असलेल्या आग्र्यात सध्या मुघल म्युझियमचं बांधकाम होत आहे. परंतु योगी सरकारने आता या म्युझियमचं नाव बदलण्याचा निर्णय घेतला आहे. हे मुघल म्युझियम आता मुघलांना आव्हान देणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने ओळखलं जाणार आहे. आग्र्यातील विकास कामांचा आढावा घेताना स्वत: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ही घोषणा केली.

या निर्णयाची माहिती योगी आदित्यनाथ यांनी ट्विटरवरुन दिली. त्यांनी लिहिलं आहे की, "आग्रामध्ये सुरु असलेलं म्यूझियम आता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने ओळखलं जाईल. तुमच्या नव्या उत्तर प्रदेशात गुलामीच्या मानसिकतेच्या प्रतिकांचं कोणतंही स्थाना नाही. आपल्या सगळ्यांचे नाकय शिवाजी महाराज आहेत. जय हिंद, जय भारत."

ताजमहलच्या पूर्वेकडील प्रवेशद्वारावर बनत असलेल्या मुघल म्युझियमला 2015 मध्ये अखिलेश सरकारच्या कार्यकाळात मंजुरी मिळाली आहे. पण आता या म्युझियमचं नाव बदलून योगी आदित्यनाथ यांनी एका दगडात दोन पक्षी मारले आहेत. एकीकडे त्यांनी हिंदुत्त्वाचं राजकारण आणखी मजबूत केलं आहे, तर दुसरीकडे छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव म्युझियमला देऊन शिवसेनेवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला आहे.

मराठा साम्राज्य आणि मुघलकालीन वस्तू-दस्तऐवजांचं प्रदर्शन यूपी सरकारने या म्युझियमद्वारे छत्रपती शिवाजी महाराज यांचं वैभव संपूर्ण जगभरात पोहोचवण्याचं लक्ष्य ठेवलं आहे. सरकारने पर्यटन विभागाच्या अधिकारिऱ्याच्या माध्यमातून म्युझियममध्ये मराठा साम्राज्याच्या तमाम वस्तू प्रदर्शनाला ठेवण्याची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले आहेत. तसंच आग्र्यात बनणाऱ्या या म्युझियममध्ये मुघलकालीन वस्तु आणि दस्तऐवज प्रदर्शित केले जातील, अशी माहिती पर्यटन विभागातील अधिकाऱ्यांनी दिली. याशिवाय पर्यटकांसाठी इथे विशेष सुविधांची व्यवस्था करण्यासही सांगितलं आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pankaja Munde : पालकमंत्री झाल्यानंतर पंकजा मुंडे पहिल्यांदाच पोहोचल्या जालन्यात; प्रजासत्ताक दिनाचा मुहूर्त साधत जिल्हावासियांना मोठा शब्द; म्हणाल्या...
पालकमंत्री झाल्यानंतर पंकजा मुंडे पहिल्यांदाच पोहोचल्या जालन्यात; प्रजासत्ताक दिनाचा मुहूर्त साधत जिल्हावासियांना मोठा शब्द; म्हणाल्या...
Tilak Varma : 'मेरा टाइम आएगा ते टाइम आ गया' सूर्यकुमार यादवच्या 'या' निर्णयाने 22 वर्षीय तिलक वर्माचं नशीब बदललं!
'मेरा टाइम आएगा ते टाइम आ गया' सूर्यकुमार यादवच्या 'या' निर्णयाने 22 वर्षीय तिलक वर्माचं नशीब बदललं!
Manikrao Kokate : राज्यात पिक विमा योजना बंद होणार नाही, शेतकऱ्यांच्या भल्यासाठी...; कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंचं मोठं वक्तव्य
राज्यात पिक विमा योजना बंद होणार नाही, शेतकऱ्यांच्या भल्यासाठी...; कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंचं मोठं वक्तव्य
Prakash Abitkar : पालकमंत्री प्रकाश आबिटकरांकडून कोल्हापुरात ध्वजारोहण; म्हणाले, बहुमान मिळाल्याचा सार्थ अभिमान
पालकमंत्री प्रकाश आबिटकरांकडून कोल्हापुरात ध्वजारोहण; म्हणाले, बहुमान मिळाल्याचा सार्थ अभिमान
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 01 PM TOP Headlines 01 PM 26 January 2024Mumbai Central Line Mega Block Over : मध्य रेल्वेवरील ब्लॉक उशिराने संपल्यानं प्रवाशांना फटका, कर्नाक ब्रिजचं काम 5 तास उशिरानं संपलंABP Majha Marathi News Headlines 12 PM TOP Headlines 12 PM 26 January 2024Republic Day Parade Kartavya Path : कर्तव्यपथावर विविध राज्यांच्या चित्ररथांचा देखावा, डोळ्याचं पारणं फेडणारा क्षण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pankaja Munde : पालकमंत्री झाल्यानंतर पंकजा मुंडे पहिल्यांदाच पोहोचल्या जालन्यात; प्रजासत्ताक दिनाचा मुहूर्त साधत जिल्हावासियांना मोठा शब्द; म्हणाल्या...
पालकमंत्री झाल्यानंतर पंकजा मुंडे पहिल्यांदाच पोहोचल्या जालन्यात; प्रजासत्ताक दिनाचा मुहूर्त साधत जिल्हावासियांना मोठा शब्द; म्हणाल्या...
Tilak Varma : 'मेरा टाइम आएगा ते टाइम आ गया' सूर्यकुमार यादवच्या 'या' निर्णयाने 22 वर्षीय तिलक वर्माचं नशीब बदललं!
'मेरा टाइम आएगा ते टाइम आ गया' सूर्यकुमार यादवच्या 'या' निर्णयाने 22 वर्षीय तिलक वर्माचं नशीब बदललं!
Manikrao Kokate : राज्यात पिक विमा योजना बंद होणार नाही, शेतकऱ्यांच्या भल्यासाठी...; कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंचं मोठं वक्तव्य
राज्यात पिक विमा योजना बंद होणार नाही, शेतकऱ्यांच्या भल्यासाठी...; कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंचं मोठं वक्तव्य
Prakash Abitkar : पालकमंत्री प्रकाश आबिटकरांकडून कोल्हापुरात ध्वजारोहण; म्हणाले, बहुमान मिळाल्याचा सार्थ अभिमान
पालकमंत्री प्रकाश आबिटकरांकडून कोल्हापुरात ध्वजारोहण; म्हणाले, बहुमान मिळाल्याचा सार्थ अभिमान
हिंगोलीतून माहूरला दिंडीत आले, भगर शेंगदाण्याची आमटी खाल्ल्याने 50 हून अधिक भाविकांना विषबाधा, 4 गंभीर
हिंगोलीतून माहूरला दिंडीत आले, भगर शेंगदाण्याची आमटी खाल्ल्याने 50 हून अधिक भाविकांना विषबाधा, 4 गंभीर
Hasan Mushrif : कोल्हापूरपासून 623 किमी अंतरावर हसन मुश्रीफांचा वाशिमला जीव काही केल्या रमेना! बैठका नाहीच, ध्वजारोहण करताच तत्काळ कोल्हापूरला रवाना!
कोल्हापूरपासून 623 किमी अंतरावर हसन मुश्रीफांचा वाशिमला जीव काही केल्या रमेना! बैठका नाहीच, ध्वजारोहण करताच तत्काळ कोल्हापूरला रवाना!
Walmik Karad:'त्या' दिवशी वाल्मिक कराड पुण्यातील प्रसिद्ध रुग्णालयात होता, संदीप क्षीरसागरांचा नवा गौप्यस्फोट
त्या' दिवशी वाल्मिक कराड पुण्यातील प्रसिद्ध रुग्णालयात होता, संदीप क्षीरसागरांचा नवा गौप्यस्फोट
Sanjay Raut :  शरद पवारांच्या पाठीत खंजीर खुपसला हे गरिबांचं लक्षण नाही; नरहरी झिरवाळांना राऊतांनी डिवचलं
शरद पवारांच्या पाठीत खंजीर खुपसला हे गरिबांचं लक्षण नाही; नरहरी झिरवाळांना राऊतांनी डिवचलं
Embed widget