एक्स्प्लोर
Advertisement
ऑनलाईन वस्तूंवर MRP सह इतर तपशील देणं अनिवार्य
ग्राहकांच्या सुरक्षेसाठी केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे.
नवी दिल्ली : ऑनलाईन खरेदी केल्या जाणाऱ्या सर्व वस्तूंवर आजपासून (1 जानेवारी) कमाल आधारभूत मूल्य म्हणजेच एमआरपी देणं अनिवार्य करण्यात आलं आहे. याशिवाय या वस्तूंवर एक्स्पायरी डेटप्रमाणे इतर तपशीलही द्यावा लागेल. ग्राहकांच्या सुरक्षेसाठी केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे.
वैद्यकीय उपकरणांनाही या नियमात आणण्यात आलं आहे. आतापर्यंत ऑनलाईन खरेदी केलेल्या वस्तूंवर एमआरपी असायचा. मात्र ऑनलाईन विकल्या जाणाऱ्या पाकिटांवर आवश्यक त्या सूचना नसल्याच्या अनेक तक्रारी आल्या होत्या. त्यानंतर केंद्र सरकारने हे पाऊल उचललं.
काय आहे नवीन नियम?
- एमआरपीसोबतच वस्तूवर निर्मितीची तारीख, एक्स्पायरी डेट, ग्राहकांसाठी काळजीच्या सूचना आणि देश ही माहिती द्यावी लागेल.
- छापील शब्द आणि आकड्यांचा आकार वाढवण्यात आला आहे, ज्यामुळे ग्राहकांना ते वाचण्यासाठी सुलभ होईल, असं मंत्रालयाने म्हटलं आहे.
- एकसारख्याच पाकिटबंद वस्तूंसाठी वेगवेगळे दर कुणीही आकारु शकत नाही.
- केंद्र सरकारने वस्तूची गुणवत्ता तपासण्याची पद्धतही अधिक शास्त्रोक्त केली आहे.
- बारकोड-क्यूआर कोडची परवानगी स्वैच्छिक आधारावर देण्यात आली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
क्रिकेट
निवडणूक
Advertisement