एक्स्प्लोर

WMO: IMD संचालक मृत्युंजय महापात्रा यांची जागतिक हवामान संघटनेच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती

Mrityunjay Mohapatra News: IMD चे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांना मोठं यश मिळालं आहे. त्यांची WMO च्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

WMO Vice-President: भारतीय हवामानशास्त्र विभागाचे (IMD) महासंचालक मृत्युंजय महापात्रा (Mrityunjay Mohapatra) यांची गुरुवारी (1 जून) जागतिक हवामान संघटनेचे (WMO) तिसरे उपाध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. WMO ने ट्वीट करून याची माहिती दिली आहे. मृत्युंजय महापात्रा, मूळचे ओदिशाचे, भारताचे 'सायक्लॉन मॅन' म्हणून ओळखले जातात. 2019 पासून ते हवामान खात्याचे प्रमुख आहेत.

महापात्रा यांच्याशिवाय इतर दोन व्यक्तींनाही डब्ल्यूएमओच्या (WMO) उपाध्यक्षपदी बढती देण्यात आली आहे. त्यापैकी आयर्लंडमधील मेट इरिअनचे संचालक इयोन मोरन आणि कोट डी आयव्होरचे हवामानशास्त्र संचालक डौडा कोनाटे यांचा समावेश आहे. WMO ची निवडणूक गुरुवारी (01 जून) जिनिव्हा येथे पार पडली. यामध्ये संयुक्त अरब अमिरातीच्या राष्ट्रीय हवामान केंद्राचे संचालक अब्दुल्ला अल मंडौस यांची WMO च्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

WMO चे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष

अब्दुल्ला अल मंडौस यांचा कार्यकाळ चार वर्षांचा असेल. WMO मध्ये एक अध्यक्ष आणि तीन उपाध्यक्ष असतात. अर्जेंटिनाच्या सेलेस्टे साऊलो यांची WMO च्या पहिल्या महिला सरचिटणीस म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ज्यामध्ये अब्दुल्ला अल मंडौस यांची अध्यक्षपदी आणि मृत्युंजय महापात्रा, इऑन मोरान आणि दौदा कोनाटे यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

मृत्युंजय महापात्रा कोण आहेत?

आयएमडीनं गेल्या दोन दशकांत फायलिन, हुदहुद, वरदा, तितली, सागर, मेकुनू आणि फानी यांसारख्या अनेक चक्रीवादळांचं अचूक भाकीत करण्यात महापात्रा यांची भूमिका महत्त्वाची आहे. 2019 पासून त्यांची हवामान खात्यात महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यांचा जन्म ओडिशातील भद्रक जिल्ह्यातील एका छोट्या गावात झाला. चक्रीवादळामुळे होणारं नुकसान त्यांनी लहानपणापासूनच जवळून पाहिलं आहे. उत्कल विद्यापीठातून त्यांनी भौतिकशास्त्रात पीएचडी केली आहे. शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते 1990 च्या दशकापासून हवामान खात्यात रुजू झाले.

जागतिक हवामान संघटना म्हणजे काय?

जागतिक हवामान संघटना (WMO) ही 1950 मध्ये स्थापन झालेली संस्था आहे. WMO जागतिक हवामान स्थितीवर वार्षिक अहवाल जारी करते. हा अहवाल हवामानातील घडामोडी तसेच स्थानिक, राष्ट्रीय आणि जागतिक स्तरावरील तापमानाची संपूर्ण माहिती प्रदान करते. याशिवाय, टोळांच्या थवाविषयी अंदाज वर्तवणं ही WMO ची आणखी एक जबाबदारी आहे. भारत 1949 पासून WMO चा सदस्य आहे. चक्रीवादळ अम्फानच्या अंदाज आणि अद्यतनांमध्ये उल्लेखनीय अचूकतेबद्दल भारताच्या IMD ची WMO नं देखील प्रशंसा केली होती.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jos Buttler on BCCI Rule : बीसीआयआयने खेळाडूंच्या बायका पोरांसाठी कडक नियम आणले, पण इंग्लंड कॅप्टन जोस बटलरच्या उत्तराने भूवया उंचावल्या!
बीसीआयआयने खेळाडूंच्या बायका पोरांसाठी कडक नियम आणले, पण इंग्लंड कॅप्टन जोस बटलरच्या उत्तराने भूवया उंचावल्या!
PM Kisan : पीएम किसानच्या 19 व्या हप्त्याचे  2000 रुपये मिळण्यासाठी करावं लागेल महत्त्वाचं काम, अन्यथा...
पीएम किसानचे 18 हप्त्यात 36000 रुपये मिळाले, 19 व्या हप्त्याचे 2000 मिळवण्यासाठी करावं लागेल महत्त्वाचं काम
Walmik Karad: पहिल्या पत्नीपेक्षा दुसऱ्या पत्नीच्या नावे चौपट संपत्ती, वाल्मिक कराडच्या दोन्ही पत्नींच्या नावे किती मालमत्ता?
पहिल्या पत्नीपेक्षा दुसऱ्या पत्नीच्या नावे चौपट संपत्ती, वाल्मिक कराडच्या दोन्ही पत्नींच्या नावे किती मालमत्ता?
IND vs ENG 1st T20 : टीम इंडियासाठी धोक्याची घंटा, इंग्रंजांविरुद्ध सावध राहावं लागणार; कोलकाता सामन्यापूर्वी हे रेकॉर्ड पाहाच!
टीम इंडियासाठी धोक्याची घंटा, इंग्रंजांविरुद्ध सावध राहावं लागणार; कोलकाता सामन्यापूर्वी हे रेकॉर्ड पाहाच!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Walmik Karad Judicial Custody : वाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, पुढे काय?ABP Majha Marathi News Headlines 11AM TOP Headlines 11 AM 22 January 2025 सकाळी ११ च्या हेडलाईन्सPune Reverse Car Accident : पुण्यात रिव्हर्स गिअरने अनर्थ, कार पहिल्या मजल्यावरुन कोसळलीRadhakrishna Vikhe Patil : दुर्लक्ष करा जरा,गाड्या चालू द्या; वाळू माफियांना अप्रत्यक्ष अभय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jos Buttler on BCCI Rule : बीसीआयआयने खेळाडूंच्या बायका पोरांसाठी कडक नियम आणले, पण इंग्लंड कॅप्टन जोस बटलरच्या उत्तराने भूवया उंचावल्या!
बीसीआयआयने खेळाडूंच्या बायका पोरांसाठी कडक नियम आणले, पण इंग्लंड कॅप्टन जोस बटलरच्या उत्तराने भूवया उंचावल्या!
PM Kisan : पीएम किसानच्या 19 व्या हप्त्याचे  2000 रुपये मिळण्यासाठी करावं लागेल महत्त्वाचं काम, अन्यथा...
पीएम किसानचे 18 हप्त्यात 36000 रुपये मिळाले, 19 व्या हप्त्याचे 2000 मिळवण्यासाठी करावं लागेल महत्त्वाचं काम
Walmik Karad: पहिल्या पत्नीपेक्षा दुसऱ्या पत्नीच्या नावे चौपट संपत्ती, वाल्मिक कराडच्या दोन्ही पत्नींच्या नावे किती मालमत्ता?
पहिल्या पत्नीपेक्षा दुसऱ्या पत्नीच्या नावे चौपट संपत्ती, वाल्मिक कराडच्या दोन्ही पत्नींच्या नावे किती मालमत्ता?
IND vs ENG 1st T20 : टीम इंडियासाठी धोक्याची घंटा, इंग्रंजांविरुद्ध सावध राहावं लागणार; कोलकाता सामन्यापूर्वी हे रेकॉर्ड पाहाच!
टीम इंडियासाठी धोक्याची घंटा, इंग्रंजांविरुद्ध सावध राहावं लागणार; कोलकाता सामन्यापूर्वी हे रेकॉर्ड पाहाच!
Dhananjay Munde : वाल्मिक कराडविरोधात मोठा पुरावा हाती लागला; धनंजय मुंडे म्हणाले, मी स्पष्ट सांगितलंय...
वाल्मिक कराडविरोधात मोठा पुरावा हाती लागला; धनंजय मुंडे म्हणाले, मी स्पष्ट सांगितलंय...
Team India Playing XI : प्लेइंग-11 बाबत टीम इंडियामध्ये अडचण, सूर्या कोणाला बसवणार अन् कोणाला संधी, कोलकाता पहिल्या टी-20 मध्ये ही असेल टीम?
प्लेइंग-11 बाबत टीम इंडियामध्ये अडचण, सूर्या कोणाला बसवणार अन् कोणाला संधी, कोलकाता पहिल्या टी-20 मध्ये ही असेल टीम?
Pune Reverse Car Accident : पुण्यात रिव्हर्स गिअरने अनर्थ, कार पहिल्या मजल्यावरुन कोसळली
Pune Reverse Car Accident : पुण्यात रिव्हर्स गिअरने अनर्थ, कार पहिल्या मजल्यावरुन कोसळली
Sanjay Raut: ठाकरे गटाचे 4 आमदार, 3 खासदार फुटणार; उदय सामंतांच्या दाव्यावर संजय राऊत भडकले
ठाकरे गटाचे 4 आमदार, 3 खासदार फुटणार; उदय सामंतांच्या दाव्यावर संजय राऊत भडकले
Embed widget