Morning Headlines 8th August: देश विदेशातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर, वाचा मॉर्निंग न्यूज
देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...
देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...
मोदी सरकारविरोधातील अविश्वास प्रस्तावावर आजपासून चर्चा, राहुल गांधी काय बोलणार? याकडे लक्ष
मणिपूरच्या (Manipur Violence) मुद्द्यावरून विरोधकांनी मोदी सरकारविरोधात संसदेत अविश्वास प्रस्ताव (No Confidence Motion) आणला आहे. त्यावर आज दुपारी 12 वाजल्यापासून चर्चा होणार आहे. महत्त्वाचं म्हणजे या चर्चेची सुरुवात राहुल गांधींपासून (Rahul Gandhi) होण्याची शक्यता आहे. (वाचा सविस्तर)
दिल्ली सेवा विधेयक राज्यसभेतही मंजूर; विधेयकांच्या बाजूने 131 मते, विरोधात 102 मते
दिल्ली सेवा विधेयक (Delhi Service Bill) राज्यसभेत चर्चेनंतर मंजूर करण्यात आले. विधेयकाच्या बाजूने 131 तर विरोधात 102 मते पडली. 2024 च्या निवडणुकीआधी विरोधकांनी उभारलेल्या इंडिया (INDIA) आघाडीसाठी आजचे राज्यसभेतील मतदान आवश्यक होते. यातून इंडिया आघाडीतील एकजूट किती आहे, हे दिसून आले. (वाचा सविस्तर)
सुरक्षित पेयजल पुरवठा केल्यास 400000 मृत्यू टाळता येतील, जागतिक आरोग्य संघटनेचा अहवाल
जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार (World Health Organization Report) भारतात सर्वत्र सुरक्षितपणे व्यवस्थापित पेयजल पुरवठा केल्यास अतिसाराच्या आजारांमुळे होणारे सुमारे 400000 मृत्यू टाळता येतील. तसेच खर्चात अंदाजे 8.2 लाख कोटी रुपयांपर्यंत बचत होईल, असा अंदाज या अहवालात व्यक्त करण्यात आलाय. (वाचा सविस्तर)
तेल कंपन्यांनी अपडेट केले आजचे दर; जाणून घ्या, तुमच्या शहरांतील पेट्रोल-डिझेलचे दर
सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किमती अपडेट केल्या आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि कोलकाता येथे पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. कच्च्या तेलाची किंमतील गेल्या काही दिवसांमध्ये सातत्यानं वाढ पाहायला मिळाली होती. (वाचा सविस्तर)
पुन्हा कोरोनाचा धोका! कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा वेगाने प्रसार, ERIS ने जगाची चिंता वाढवली
कोरोनातून (Covid 19 Epidimic) जग आता कुठे सावरू लागलं होतं मात्र, कोरोनाचा (Corona) व्हायरल काही पिच्छा सोडताना दिसत नाही. आता पुन्हा एकदा कोरोनाच्या नव्या धोकादायक व्हेरियंटने (New Corona Variant) जगाची चिंता वाढवली आहे. (वाचा सविस्तर)
महिलांवर हिजाब परिधान करण्याची सक्ती! कायदा मोडणाऱ्यांना शवगारात मृतहेदांची स्वच्छता करण्याची शिक्षा
इराणमध्ये सरकार महिलांवर सक्तीने हिजाब कायदा लागू करण्याचा प्रयत्न करत आहे. हिजाब परिधान न करणाऱ्या महिलांना शिक्षा देण्यात येत आहे. कठोर हिजाब कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या महिलांवर इराण सरकार शिक्षा देण्यासोबतच त्यांच्या मानसोपचारतज्ज्ञांकडून उपचार करत आहे. कायदा मोडणाऱ्या महिलांना शवागारात काम करण्याची शिक्षा (Mortuary) दिली जात आहे. (वाचा सविस्तर)
मराठी सिनेसृष्टीचे सुपरस्टार दादा कोंडके यांचा जन्म; आज इतिहासात...
इतिहासात प्रत्येक दिवसाचे एक महत्त्व असते. आजच्या दिवशी अनेक महत्त्वाच्या घडामोडी झाल्या आहेत. स्वराज्याच्या पहिल्या लढाईत फत्तेहखानाच्या फौजेचा शिवाजीराजांनी पराभव केला. मुंबईतील काँग्रेसच्या अधिवेशनात 'ब्रिटिश चले जाव' चळवळीचा ठराव आजच्या दिवशी मंजूर झाला होता. तर, मराठी सिनेसृष्टीचे सुपरस्टार दादा कोंडके यांचा जन्मही आजच्या दिवशी झाला. (वाचा सविस्तर)
कर्क, कन्या आणि तूळ राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस खास, वाचा आजचं राशीभविष्य
आज वार मंगळवार दिनांक 8 ऑगस्ट 2023. आजचा दिवस काही राशींच्या लोकांसाठी खास असणार आहे. कर्क, कन्या आणि तूळ राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायी ठरणार आहे. पाहुयात आजचा दिवस मेष ते मीन या राशींच्या लोकांसाठी कसा राहील. (वाचा सविस्तर)