![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Petrol Diesel Price Today: तेल कंपन्यांनी अपडेट केले आजचे दर; जाणून घ्या, तुमच्या शहरांतील पेट्रोल-डिझेलचे दर
Petrol Diesel Price: देशातील चार महानगरांमधील पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. त्याचबरोबर देशातच काही शहरांमध्ये पेट्रोल (Petrol) -डिझेलच्या (Diesel) किमतींत किरकोळ बदल झाल्याचं पाहायला मिळत आहे.
![Petrol Diesel Price Today: तेल कंपन्यांनी अपडेट केले आजचे दर; जाणून घ्या, तुमच्या शहरांतील पेट्रोल-डिझेलचे दर Petrol and Diesel Price Today in India 08th August 2023 Petrol and Diesel Rate Today in mumbai Delhi Bangalore Chennai Hyderabad and More Cities Petrol Diesel price In Metro Cities Petrol Diesel Price Today: तेल कंपन्यांनी अपडेट केले आजचे दर; जाणून घ्या, तुमच्या शहरांतील पेट्रोल-डिझेलचे दर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/08/094572acb9e819b678aa5377e871e9a4169146408263788_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Latest Price of Petrol Diesel in India : सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किमती अपडेट केल्या आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि कोलकाता येथे पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. कच्च्या तेलाची किंमतील गेल्या काही दिवसांमध्ये सातत्यानं वाढ पाहायला मिळाली होती. मागील दिवसांच्या वाढीनंतर आता किमती स्थिर झाल्या आहेत आणि त्या प्रति बॅरल 85 डॉलरच्या वर आहेत. ब्रेंट क्रूड ऑईसची किंमत प्रति बॅरल 85.50 डॉलर आणि WTI क्रूडची किंमत प्रति बॅरल 82.15 डॉलरवर कायम आहे.
देशातील महानगरांमध्ये आज पेट्रोल-डिझेलचे दर काय?
दिल्लीत एक लिटर पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर आहे. कोलकातामध्ये एक लिटर पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर दरानं विकलं जात आहे. मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये प्रति लिटर आणि एक लिटर डिझेल 94.27 रुपये दरानं उपलब्ध आहे. चेन्नईमध्ये एक लिटर पेट्रोलची किंमत 102.63 रुपये आणि डिझेलची किंमत 94.24 रुपये प्रति लिटर आहे.
देशातील चार महानगरांमधील पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. त्याचबरोबर देशातच काही शहरांमध्ये पेट्रोल (Petrol) -डिझेलच्या (Diesel) किमतींत किरकोळ बदल झाल्याचं पाहायला मिळत आहे. दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल-डिझेलचे दर जाहीर होतात. यामध्ये कच्च्या तेलाच्या किमतींव्यतिरिक्त पेट्रोल आणि डिझेलवर केंद्र आणि राज्य सरकारनं लादलेल्या करांचाही समावेश असतो.
महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये पेट्रोल-डिझेलचे आजचे दर
- पुण्यात पेट्रोलचे दर 106.22 रुपये प्रति लिटर, तर डिझेल 92.73 रुपये प्रति लिटर आहे.
- नाशकात पेट्रोलचे दर 106.51 रुपये प्रति लिटर, तर डिझेल 93.02 रुपये प्रति लिटर
- अहमदनगरमध्ये एक लिटर पेट्रोल 106.64 रुपये, तर एक लिटर डिझेल 93.15 रुपयांना
- सिंधुदुर्गात पेट्रोलची किंमत 107.97 रुपये प्रति लिटर, तर डिझेल 94.45 रुपये प्रति लिटर
- सोलापुरात एक लिटर पेट्रोल 106.77 रुपयांना, तर एक लिटर डिझेल 93.29 रुपयांना
- कोल्हापुरात एक लिटर पेट्रोल 107.45 रुपये प्रति लिटर, तर एक लिटर डिझेल 93.94 रुपये प्रति लिटर
- नागपुरात पेट्रोल 106.04 रुपये प्रति लिटर, तर डिझेल 92.59 रुपये प्रति लिटर
- गडचिरोलीत 106.92 रुपये प्रति लिटर पेट्रोल, तर डिझेल 93.45 रुपये प्रति लिटर
Petrol Diesel Price Today : तुमच्या शहरांतील पेट्रोल-डिझेलच्या किमती जाणून घ्या
इंडियन ऑईलचं IndianOil ONE Mobile App तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.
इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Price) सोप्या पद्धतीने पाहता येतील.
पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती (Petrol Diesel Price) एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत).
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)