Morning Headlines 6th June : मॉर्निंग न्यूजमध्ये वाचा, देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या
देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...
देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...
1. Cyclone Biparjoy : मान्सूनपूर्वी 'बिपरजॉय' चक्रीवादळाचा धोका, वादळी वाऱ्यामुळे पाऊस लांबला
Cyclone Update : एकीकडे मान्सूनची (Monsoon) प्रतिक्षा लागली असताना दुसरीकडे चक्रीवादळाचा (Cyclone) धोका पाहायला मिळत आहे. अरबी समुद्रात 'बिपरजॉय' चक्रीवादळ (Biparjoy Cyclone) निर्माण झाल्याने आता पाऊस (Rain Update) आणखी लांबला आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) दिलेल्या ताज्या माहितीनुसार, 5 जून रोजी दक्षिण पूर्व अरबी समुद्रात चक्रीवादळ तयार झालं. पुढील 24 तासांत याच प्रदेशात कमी दाबाचं क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळाला 'बिपरजॉय' असं नाव देण्यात आलं आहे. मान्सून आधी 'बिपरजॉय' चक्रीवादळाचा धोका निर्माण झाल्याने पावसावरही परिणाम झाला आहे. वाचा सविस्तर
2. World : जगबुडी होणार? तिप्पट वेगाने वितळतायत ग्लेशियर्स, शास्त्रज्ञांची दिला धोक्याचा इशारा
Greenland Ice Melting Faster : ग्लोबल वॉर्मिंगची (Global Warming) समस्या दिवसागणिक वाढताना दिसत आहे. जागतिक तापमानवाढ हा सध्या चिंतेचा विषय आहे. बदलती जीवनशैली आणि वाढतं शहरीकरण यामुळे अनेक दशकांपासून पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. पण मानव याकडे दुर्लक्ष करत आहे. पृथ्वीवरील (Earth)वाढत्या तापमानामुळे बर्फ वेगाने वितळत असून मानवासाठी धोका निर्माण झाला आहे. वाढत्या तापमानावर वेळीच उपाय न केल्यास जगबुडी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बर्फ वितळून संपूर्ण पृथ्वी जलमय होईल आणि मानवाचं आयुष्य धोक्यात येईल, असा इशारा शास्त्रज्ञांनी दिला आहे. वाचा सविस्तर
3. Odisha Train Accident: बालासोर रेल्वे दुर्घटना अपघात की, घातपात? इंटरलॉकिंग सिस्टमसोबत छेडछाड, CBI चौकशी होणार
Coromandel Express Derailment Inquiry: ओडिशाच्या (Odisha) बालासोरमध्ये (Balasore) तीन ट्रेन एकमेकांवर आदळल्यानं मोठा अपघात झाला. यामध्ये 288 प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर एक हजाराहून अधिकजण गंभीर जखमी आहेत. सध्या या अपघाताची सखोल चौकशी सुरू आहे. अशातच या भीषण रेल्वे अपघातामागे (Odisha Train Accident) मोठा कट होता का? असा प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे. 288 निष्पापांचा जीव गेला लोक एका ट्रॅकमुळे, तिथे कोणी जाणूनबुजून तर छेडछाड केली नव्हती ना? हा प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे. या प्रकरणात सध्या समोर आलेली एक गोष्ट हा अपघात घातपात तर नव्हता ना? याबाबत विचार करण्यास भाग पाडणारा आहे. ट्रॅकच्या इंटरलॉकिंग सिस्टीममध्ये जाणीवपूर्वक छेडछाड केल्याचं पुरावे रेल्वेला प्राथमिक तपासात मिळाले आहेत. त्यामुळे या अपघाताची सीबीआयमार्फत चौकशी (CBI Inquiry) करण्याचा निर्णय रेल्वेनं घेतला आहे. वाचा सविस्तर
4. Indian Railways : भारतीय रेल्वेने 2017-2022 दरम्यान सुरक्षेवर एक लाख कोटी खर्च केले, कागदपत्रांमधून माहिती समोर
Indian Railways : भारतीय रेल्वेने 2017-18 आणि 2021-22 दरम्यान सुरक्षेच्या उपायांवर एक लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च केले आहेत. तसंच या कालावधीत रेल्वे रुळाच्या देखभाल-दुरुस्तीवरील (Track Renewal) खर्चात सातत्याने वाढ पाहायला मिळाली. अधिकृत दस्तऐवजांमधून याबाबत माहिती मिळाली आहे. वाचा सविस्तर
5. WTC Final Rahul Dravid: ICC ट्रॉफी जिंकण्यासाठी टीम इंडियावर दबाव? WTC फायनलपूर्वी हेड कोच द्रविड म्हणतो...
WTC Final 2023: आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा (ICC World Test Championship) अंतिम सामना टीम इंडिया (Team India) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) यांच्यात खेळवण्यात येणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना 7 जूनपासून लंडनमधील ओव्हल मैदानावर खेळवला जाणार आहे. भारतीय क्रिकेट संघानं 10 वर्षांपासून आयसीसीचं कोणतंही विजेतेपद जिंकलेलं नाही, अशा परिस्थितीत अंतिम सामना जिंकून हा दुष्काळ संपवण्याचा प्रयत्न टीम इंडिया करणार आहे. वाचा सविस्तर
6. WTC Final 2023: WTC फायनलपूर्वी कर्णधार रोहित शर्मासमोर 3 मोठे प्रश्न, कसे सोडवणार?
WTC Final 2023: टीम इंडिया (Team india) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) यांच्यात ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा (ICC World Test Championship) अंतिम सामना 7 जूनपासून खेळवला जाणार आहे. आता सामना सुरू होण्यासाठी दोन दिवसांपेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे. पण टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मासमोर मात्र सामन्यापूर्वी तीन मोठे प्रश्न उभे राहिले आहेत. टॉसपूर्वी या तिनही प्रश्नांची उत्तरं रोहितला शोधावीच लागणार आहेत. वाचा सविस्तर
7. 6th June in History: मराठ्यांचे सार्वभौम राज्य स्थापन झाले...शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन; आज इतिहासात
6th June in History: इतिहासात प्रत्येक दिवसाचे एक महत्त्व असते. इतिहासात घडलेल्या घडामोडींचा भविष्यकाळावरही त्याचा परिणाम होत असतो. या घटनेतून प्रेरणा मिळते, काही शिकण्यास मिळते. अशीच एक घटना आजच्या दिवशी झाली. स्वराज्याचे ध्येय घेऊन सुरू झालेल्या लढ्यातला आजच्या दिवशी मोठा टप्पा पार पडला. शिवाजी महाराजांचा आजच्या दिवशी राज्याभिषेक झाला. तर, आजच्या दिवशी अमृतसरमधील सुवर्ण मंदिरातील भारतीय लष्कराचे ऑपरेशन ब्लू स्टार संपले. जाणून घेऊयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडी.... वाचा सविस्तर
8. मेष, कन्या, कुंभ अन् वृषभ राशीच्या लोकांचा आजचा दिवस तणावाचा; कसं असेल 12 राशींचं आजचं राशीभविष्य?
Horoscope Today, Daily Horoscope, Rashibhavishya, 06th June 2023: आज 6 जून 2023... मंगळवार राशीभविष्यानुसार अत्यंत महत्त्वाचा दिवस. आज मेष राशीच्या लोकांच्या आयुष्यात परदेशवारीचा योग आहे. तसेच, वृषभ राशीच्या लोकांच्या आयुष्यात आज आर्थिक धनलाभ होण्याचा योग आहे. जाणुन घेऊयात, मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस कसा राहिल? वाचा सविस्तर