Morning Headlines 24th May : देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर, वाचा मॉर्निंग न्यूज
देश विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील
देश विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील
राहुल गांधींची छत्रपती शिवरायांशी तुलना करणारा ट्वीट; व्हिडीओ डीलीट करुन महाराष्ट्राची माफी मागा, भाजपची मागणी
काँग्रेसनं त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलरवर राहुल गांधी यांचा व्हिडिओ ट्विट केला आहे पण या व्हिडीओसोबत छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यगाथेवरचं गाणं लावलं आहे. राहुल गांधींची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराजांशी केल्याचा आरोप भाजपने केलाय. काँग्रेसनं ट्विट केलेल्या या व्हिडिओवर भाजपनं आक्षेप घेतलाय. व्हिडिओ तातडीनं डिलीट करण्याची मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी केली आहे (वाचा सविस्तर)
आज निवडणुका झाल्या तर कोण होणार पंतप्रधान अन् कोणाचं सरकार? मोदी, राहुल गांधींबाबत सर्वेक्षणात खुलासा
जनतेचा कौल जाणून घेण्यासाठी हे सर्वेक्षण कर्नाटक विधानसभा निवडणुकीनंतर 10 ते 19 मे दरम्यान 19 राज्यांमध्ये करण्यात आलं. कर्नाटकात भाजपला पराभवाचा सामना करावा लागला असला तरी पीएम मोदींच्या लोकप्रियतेवर फारसा परिणाम झालेला नाही, असं या सर्वेक्षणातून समोर आलं आहे. (वाचा सविस्तर)
ज्ञानवापी प्रकरणी सातही याचिकांची एकत्रितपणे 7 जुलैला सुनावणी होणार, वाराणसी कोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
ज्ञानवापी (Gyanvapi Gauri Case) खटल्याशी संबंधित सात याचिकांवर एकत्रित सुनावणी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय वाराणसी कोर्टाने (Varanasi court) घेतला आहे. सातही याचिकांची एकत्रित सुनावणी 7 जुलै रोजी होणार आहे. (वाचा सविस्तर)
भारत जोडो यात्रेचा राहुल गांधींना कितपत फायदा? सर्वेक्षणातून धक्कादायक आकडेवारी समोर
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसनं एकहाती विजय मिळवला आणि भाजपला चारी मुंड्या चित केलं. कर्नाटकात भाजपचा दारुण पराभव झाला. 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी विरोधी पक्षांच्या बैठकांच्या फेऱ्या सुरू आहेत. भाजपविरोधात विरोधक एकवटले असून भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी 2024 लोकसभा निवडणुकीसाठी अनेक योजना आखल्या जात आहेत. अशा परिस्थितीत काँग्रेस नेते राहुल गांधींची लोकप्रियता वाढत असल्याचं दिसून येत आहे(वाचा सविस्तर)
पंतप्रधान मोदींच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा आज शेवटचा दिवस
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा आज शेवटचा दिवस आहे. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अॅन्थनी अल्बनीज यांच्यासोबत मोदी द्विपक्षिय चर्चा करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा आज तिसरा आणि शेवटचा दिवस आहे. (वाचा सविस्तर)
राहुल गांधी, अरविंद केजरीवाल अन् ममता बनर्जी... कोण देऊ शकतं नरेंद्र मोदींना आव्हान?
या सर्वेक्षणात 2024 मध्ये कोणते नेते पंतप्रधान मोदींना आव्हान देऊ शकतात, असं विचारण्यात आलं होतं. यावर बहुतांश लोकांनी काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना आपली पसंती असल्याचं सांगितलं. सर्वेक्षणानुसार, 34 टक्के लोकांचा असा विश्वास आहे की, राहुल गांधी पंतप्रधान मोदींना आव्हान देऊ शकतात. (वाचा सविस्तर)
'या' राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस आहे खास! जाणून घ्या सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य
आज बुधवार हा महत्त्वाचा दिवस आहे. जे घरापासून दूर काम करत आहेत, त्यांना त्यांच्या कुटुंबाची आठवण येईल. आज तुम्हाला मित्रांच्या मदतीने उत्पन्नाच्या संधी मिळतील. मेष ते मीन राशीसाठी आजचा बुधवार कसा राहील? काय सांगतात तुमचे भाग्यवान तारे? जाणून घ्या आजचं राशीभविष्य सविस्तर
जागतिक स्किझोफ्रेनिया दिवस, संगीतकार राजेश रोशन, जादूगार रघुवीर यांचा जन्म; आज इतिहासात
इतिहासात प्रत्येक दिवसाचे महत्त्व असते. आजच्या दिवशी संगीतकार राजेश रोशन यांचा जन्म झाला होता, तर कवी मजरुह सुलतानपुरी यांचं निधन झालं होतं. तर, 24 मे हा दिवस जागतिक स्किझोफ्रेनिया दिन म्हणून देखील साजरा होतो. जाणून घ्या आजच्या दिवशी इतिहासात घडलेल्या महत्त्वाच्या घडामोडी... (वाचा सविस्तर)