एक्स्प्लोर

24th May In History: जागतिक स्किझोफ्रेनिया दिवस, संगीतकार राजेश रोशन, जादूगार रघुवीर यांचा जन्म; आज इतिहासात

24th May In History: : मे महिन्यात प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्त्व आहे. सामाजिक आणि दैनंदिन जीवनात 24 मे या दिवसाचं महत्त्व नेमकं काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत.

24th May In History:  इतिहासात प्रत्येक दिवसाचे महत्त्व असते. आजच्या दिवशी संगीतकार राजेश रोशन यांचा जन्म झाला होता, तर कवी मजरुह सुलतानपुरी यांचं निधन झालं होतं. तर, 24 मे हा दिवस जागतिक स्किझोफ्रेनिया दिन म्हणून देखील साजरा होतो. जाणून घ्या आजच्या दिवशी इतिहासात घडलेल्या महत्त्वाच्या घडामोडी...

जागतिक स्किझोफ्रेनिया दिवस World Schizophrenia Awareness Day

जसे शारीरिक आजार असतात तसेच मानसिक आजारसुद्धा असतात. स्किझोफ्रेनिया हा त्याच आजारांपैकी एक आहे. हा एक प्रकारचा मानसिक विकार आहे. हा विकार मेंदूच्या कार्यावर परिणाम करतो. यााबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी 24 मे रोजी जागतिक स्किझोफ्रेनिया दिन साजरा केला जातो. 

1819 : इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया यांचा जन्म

व्हिक्टोरिया ही युनायटेड किंग्डमची राज्यकर्ती आणि ब्रिटिश भारताची पहिली सम्राज्ञी होती, 1837 साली ग्रेट ब्रिटन आणि आयर्लंडची राणी म्हणून गादीवर आली. 63 वर्षे सत्तेवर असलेली व्हिक्टोरिया ही आजवर युनायटेड किंग्डमची सर्वात प्रदीर्घ काळ राज्य करणारी राज्यकर्ती आहे. तिचा कार्यकाळ व्हिक्टोरियन पर्व ह्या नावाने ओळखला जातो, जो युनायटेड किंग्डममध्ये राजकीय, औद्योगिक, सांस्कृतिक आणि लष्करी प्रगतीचा काळ मानला जातो.1857 च्या उठावानंतर ईस्ट इंडिया कंपनी नष्ट होऊन तिच्या नावाने भारताचा कारभार सुरू झाला, त्यावेळी तिने काढलेला जाहिरनामा राणीचा जाहिरनामा म्हणून प्रसिद्ध आहे. पुढे तिने हिंदुस्थानची सम्राज्ञी असा किताब देखील धारण केला.

1924: आंतरराष्ट्रीय किर्तीचे जादूगार रघुवीर भोपळे ऊर्फ जादूगार रघुवीर यांचा जन्म. 

24 मे 1924 रोजी रघुवीर भिकाजी भोपळे यांचा जन्म झाला. आपली उभी हयात ज्यांनी जादू या कलेच्या संवर्धनासाठीच दिली, अशा एका महान जादूगाराचे हे नाव आहे. जादूचे प्रयोग हा आबालवृद्धांच्या उत्सुकतेचा विषय. जादूगार रघुवीर हे त्यातील महत्त्वाचे नाव आहे. डोळे बांधून रस्त्यावर मोटरसायकल चालविणे, स्वप्नसृष्टी, नोटांचा पाऊस, हातातून वीजनिर्मिती, भुतांचा नाच इत्यादी प्रयोग करणारे जादूगार रघुवीर यांनी उदयास आणले. जादूगार रघुवीर हे मूळचे चाकणजवळील आंबेठाणचे, पण त्यांच्या जादूच्या कलेसाठी त्यांनी जगभरातील 27 देशांचा प्रवास केला.

1942 : जागतिक किर्तीचे जीवशास्त्रज्ञ माधव गाडगीळ यांचा जन्म.    

माधव धनंजय गाडगीळ यांचा जन्म पुणे शहरात झाला. माधव गाडगीळ हे निसर्गप्रेमी, साहित्यप्रेमी, संस्कृतिप्रेमी असलेले जागतिक किर्तीचे जीवशास्त्रज्ञ आहेत. गाडगीळ केंद्र शासनाच्या स्वतंत्र पर्यावरण विभाग स्थापन करण्यासाठीच्या समितीचे सदस्य होते. त्यांनी त्याचा आराखडा बनवून स्वतंत्र पर्यावरण विभाग साकारला. जीवावरण संवर्धनासाठी ‘निलगिरी’ टेकड्या संरक्षित क्षेत्रासाठीचा प्रकल्प आराखडा गाडगीळांनी तयार केला. भारतातील हा पहिलाच प्रयत्न होता. त्यांना भारतीय राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मश्री आणि पद्मभूषण, आय.सी.एस.एस.आर. तर्फे विक्रम साराभाई पुरस्कार आणि पर्यावरण संरक्षणासाठी दिला जाणारा प्यू (PEW) विद्वत्ता पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. सदर्न अमेरिकन युनिव्हर्सिटीने गाडगीळांना पर्यावरणशास्त्रातील कामगिरीसाठी टायलर पुरस्कार दिला. 

1955: संगीतकार राजेश रोशन यांचा जन्म.

24 मे 1955 रोजी राजेश रोशन यांचा जन्म झाला. संगीतकार रोशन यांचे पुत्र आणि अभिनेता-दिग्दर्शक राकेश रोशन यांचे बंधू अशी राजेश रोशन यांची ओळख आहे. घरात संगीताचे वातावरण असल्यामुळे लहानपणीच त्यांना संगीताचे बाळकडू मिळाले. पुढे विनोदवीर मेहमूद यांनी राजेश यांना ‘कुंवारा बाप’मध्ये संधी दिली. स्वतंत्र संगीतकार म्हणून राजेश यांचा हा पहिलाच चित्रपट. यातील गाणी चांगलीच गाजली. यातले ‘आ री निंदिया आ’ हे गीत आजही रसिकप्रिय आहे. त्यानंतर आलेल्या ‘ज्युली’मध्ये राजेश रोशन यांनी कमाल केली. यातले ‘भूल गया सब कुछ, याद नहीं अब कुछ’ हे राजेश-लताचे गाणे आजही भान हरवायला लावते, तर ‘माय हार्ट इज बीटिंग’ ऐकल्यानंतर मन प्रसन्न होते. 

2000: शायर, गीतकार आणि कवी मजरुह सुल्तानपुरी यांचं निधन 

हिंदी चित्रपटांसाठी अनेक अविस्मरणीय गाणी लिहिणाऱ्या मजरूह सुल्तानपुरी यांचे निधन झाले. हिंदी चित्रपटांचे प्रसिद्ध गीतकार आणि कवी मजरूह सुल्तानपुरी हे 'हमे तुमसे प्यार कितना', 'एक लडकी भीगी भागी सी', 'ओ मेरे दिल के चैन', 'चुरा लिया है तुमने जो दिल को' यांसारख्या सदाबहार गाण्यांचे गीतकार आहेत. सुल्तानपुरी यांनी चित्रपट गीतकार म्हणून खूप प्रसिद्धी आणि नाव कमावले. गीतकार असण्याबरोबरच ते उत्तम गझलकारही होते. चित्रपटसृष्टीत दिलेल्या योगदानासाठी त्यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरवण्यात आले होते. सुल्तानपुरी यांनी लिहिलेली गझल, गीते आजही रसिकांच्या स्मरणात आहेत. 

इतर महत्त्वाच्या घटना:

1543: पोलिश खगोलशास्त्रज्ञ आणि गणितज्ञ निकोलस कोपर्निकस यांचे निधन. 

1686: फॅरनहाइट तापमान प्रणाली चे जनक डॅनियल फॅरनहाइट यांचा जन्म. 

1994: 26 फेब्रुवारी 1993 रोजी न्यूयॉर्क येथील वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणणार्‍या चार मुस्लीम दहशतवाद्यांना प्रत्येकी 240 वर्षे कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली.

1999 : पद्मश्री आणि द्रोणाचार्य पुरस्कार विजेते कुस्ती प्रक्षिशक विजयपाल लालाराम तथा गुरू हनुमान यांचे निधन. 

2000 : भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (ISRO) विकसित केलेला इन्सॅट-3बी हा उपग्रह पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते राष्ट्राला अर्पण.

2001: माऊंट एव्हरेस्ट शिखर सर करणारा शेर्पा तेब्बा त्रेथी 18 व्या वर्षी सर्वात लहान व्यक्ती ठरला.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

लोकसभा निवडणुकीत 14 मतदारसंघात व्होट जिहाद, फडणवीसांचा दावा, संजय राऊतांचा जोरदार पलटवार; म्हणाले...
लोकसभा निवडणुकीत 14 मतदारसंघात व्होट जिहाद, फडणवीसांचा दावा, संजय राऊतांचा जोरदार पलटवार; म्हणाले...
Maharashtra Rainfall: महाराष्ट्रात यंदा सरासरीहून अधिक पावसाची नोंद, परतीच्या पावसाचा मुक्काम अजून किती दिवस? 
महाराष्ट्रात यंदा सरासरीहून अधिक पावसाची नोंद, परतीच्या पावसाचा मुक्काम अजून किती दिवस? 
Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस मध्यरात्री एकटेच घराबाहेर पडले, स्वत: गाडी चालवत मातोश्रीवर गेले? वंचितचा खळबळनजक दावा
वंचितचा खळबळजनक दावा, देवेंद्र फडणवीस 'मातोश्री'वर जाऊन उद्धव ठाकरेंना भेटले, दाव्यात किती तथ्य?
Sarva Pitri Amavasya 2024 : 2 की 3 ऑक्टोबर? कधी आहे सर्वपित्री अमावस्या? याच दिवशी वर्षातील शेवटचं सूर्यग्रहण; अचूक तिथी, श्राद्ध वेळ जाणून घ्या
2 की 3 ऑक्टोबर? कधी आहे सर्वपित्री अमावस्या? याच दिवशी वर्षातील शेवटचं सूर्यग्रहण; अचूक तिथी, श्राद्ध वेळ जाणून घ्या
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Laxman Hake - Manoj Jarange : मारामाऱ्या कोण लावतं हे जनतेला कळतं - मनोज जरांगेManoj Jarange Sambhajinagar PC : काही जणांना थुंका चाटायची सवय असते,  लक्ष्मण हाकेंना टोलाABP Majha Headlines :  12 PM : 1 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सDeepak Sawant Meet Govinda :  माजी आरोग्यमंत्री डॉ.दीपक सावंतांकडून गोविंदाची विचारपूस

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लोकसभा निवडणुकीत 14 मतदारसंघात व्होट जिहाद, फडणवीसांचा दावा, संजय राऊतांचा जोरदार पलटवार; म्हणाले...
लोकसभा निवडणुकीत 14 मतदारसंघात व्होट जिहाद, फडणवीसांचा दावा, संजय राऊतांचा जोरदार पलटवार; म्हणाले...
Maharashtra Rainfall: महाराष्ट्रात यंदा सरासरीहून अधिक पावसाची नोंद, परतीच्या पावसाचा मुक्काम अजून किती दिवस? 
महाराष्ट्रात यंदा सरासरीहून अधिक पावसाची नोंद, परतीच्या पावसाचा मुक्काम अजून किती दिवस? 
Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस मध्यरात्री एकटेच घराबाहेर पडले, स्वत: गाडी चालवत मातोश्रीवर गेले? वंचितचा खळबळनजक दावा
वंचितचा खळबळजनक दावा, देवेंद्र फडणवीस 'मातोश्री'वर जाऊन उद्धव ठाकरेंना भेटले, दाव्यात किती तथ्य?
Sarva Pitri Amavasya 2024 : 2 की 3 ऑक्टोबर? कधी आहे सर्वपित्री अमावस्या? याच दिवशी वर्षातील शेवटचं सूर्यग्रहण; अचूक तिथी, श्राद्ध वेळ जाणून घ्या
2 की 3 ऑक्टोबर? कधी आहे सर्वपित्री अमावस्या? याच दिवशी वर्षातील शेवटचं सूर्यग्रहण; अचूक तिथी, श्राद्ध वेळ जाणून घ्या
Maharashtra Assembly Election 2024 : मोठी बातमी : मविआचं ठरलं, दसऱ्याला जागावाटप जाहीर करणार, 250 जागांवर एकमत!
मोठी बातमी : मविआचं ठरलं, दसऱ्याला जागावाटप जाहीर करणार, 250 जागांवर एकमत!
Govinda Gunfire: गोविंदाच्या गुडघ्यातून डॉक्टरांनी बंदुकीची गोळी काढली; प्रचंड रक्तस्राव, नेमकं घडलं काय?
गोविंदाच्या गुडघ्यातून डॉक्टरांनी बंदुकीची गोळी काढली; प्रचंड रक्तस्राव, नेमकं घडलं काय?
ऐश्वर्याला झालाय 'हा' आजार, सारखं वाढतंय वजन? सोशल मीडियावर दावा, नेटकरी म्हणाले,
दुर्धर आजारानं ग्रस्त ऐश्वर्या, सारखं वाढतंय वजन? नेटकरी म्हणाले, "अच्छा, म्हणूनच अभिषेकसोबत घटस्फोट..."
Weekly Lucky Zodiacs : पुढचे 7 दिवस 5 राशींसाठी ठरणार चमत्कारी; उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले, वेळोवेळी धनलाभाचे संकेत
पुढचे 7 दिवस 5 राशींसाठी ठरणार चमत्कारी; उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले, अपार धनलाभाचे संकेत
Embed widget