एक्स्प्लोर

Morning Headlines 20 August: देश विदेशातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर, वाचा मॉर्निंग न्यूज

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...

Agricultural law : वादग्रस्त कृषी कायदे करण्याची कल्पना शरद मराठेंची, द रिपोर्टर्स कलेक्टिव्हच्या अहवालातून माहिती समोर 

Agricultural law : केंद्र सरकारला तीन वादग्रस्त कृषी कायदे करण्याची कल्पना एका अनिवासी भारतीय व्यक्तीनं दिली आहे. शरद मराठे असे या व्यक्तीचे नाव आहे. द रिपोर्टर्स कलेक्टिव्हनं (The Reporters Collective)  प्रकाशित केलेल्या दोन भागाच्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे. शरद मराठे हे अमेरिकेतील युनिव्हर्सल टेक्निकल सिस्टिम्स नावाच्या कंपनीची मालक आहेत. या कंपनीची एक शाखा भारतातदेखील आहे. वादग्रस्त कृषी कायदे संमत होण्यामागे कृषी क्षेत्राशी काहीही संबंध नसलेल्या उद्योजकांची मोठी लॉबी असल्याचं या अहवालात सांगण्यात आलं आहे. वाचा सविस्तर 

Chandrayaan-3 : चांद्रयान-3 चंद्रापासून अवघ्या 25 किमी अंतरावर; लँडिंगचा शेवटचा टप्पा पार केला

Chandrayaan-3 : भारताची महत्त्वाकांक्षी मोहिम चांद्रयान-3 (Chandrayaan-3) ही अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यात आहे. चंद्राच्या पृष्ठभागावर चांद्रयान-3 उतरण्यासाठी फक्त 3 दिवस उरले आहेत. अशा परिस्थितीत, विक्रम लँडर आता त्याची उंची आणि वेग कमी करत आहे. चांद्रयान-3 ने रात्री उशिरा म्हणजेच रविवारी (20 ऑगस्ट) पहाटे 2 ते 3 च्या दरम्यान आणखी एक महत्त्वाचा टप्पा पार केला आहे. विक्रम लँडर चंद्राच्या जवळ पोहोचले आहे. आता विक्रम लॅंडर चंद्रापासून फक्त 25 किलोमीटर अंतरावर आहे. वाचा सविस्तर 

IMD Weather Update : देशात मान्सून पुन्हा सक्रिय, उत्तर भारताला पावसाचा फटका; वाचा हवामान विभागाचा अंदाज

IMD Weather Update : अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर देशभरात पुन्हा एकदा मुसळधार पावसाला (Monsoon) सुरुवात झाली आहे. हवामान विभाच्या माहितीनुसार, आज (20 ऑगस्ट रोजी) राजधानी दिल्लीत हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर, अंदाजानुसार, 21 आणि 22 ऑगस्ट रोजी मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यानंतर साधारणपणे 23 ऑगस्टच्या दरम्यान हवामानात थंडावा असेल. दिल्लीत आज कमाल तापमान 36 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 25 अंश राहण्याचा अंदाज आहे. वाचा सविस्तर 

India Weather : हिमाचलसह उत्तराखंडमध्ये पावसाची संततधार कायम, आज देशातील 'या' राज्यांमध्ये जोरदार पावसाचा इशारा 

India Weather : हवामान विभागानं (IMD) दिलेल्या अंदाजानुसार देशाच्या काही भागात जोरदार पाऊस (Rain) कोसळत आहे. विशेषत: उत्तर भारतात पावसाचा जोर वाढला आहे. तर काही भागात पावसामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आजही देशातील विविध भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. आज राजधानी दिल्लीसह उत्तर भारतात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. वाचा सविस्तर 

Petrol-Diesel Price Today: महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत पेट्रोल-डिझेलच्या किमतींत किरकोळ बदल; जाणून घ्या आजचे दर

Petrol Diesel Rate on 20th August 2023: आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत आज कोणताही बदल झालेला नाही. WTI क्रूड प्रति बॅरल 81.25 डॉलरनं विकलं जात आहे. तसेच, ब्रेंट क्रूड प्रति बॅरल 84.80 डॉलरवर व्यापार करत आहे. देशातील तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर (Petrol Diesel Price) जाहीर केले आहेत. भारतात दररोज सकाळी 6 वाजता इंधनाचे दर सुधारित केले जातात. जून 2017 पूर्वी दर 15 दिवसांनी किमतीत सुधारणा केली जात होती. वाचा सविस्तर 

20th August In History : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची गोळ्या झाडून हत्या; आज इतिहासात...

20th August In History : आजच्या दिवशी इतिहासात अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडल्या. राजाराममोहन रॉय, द्वारकानाथ टागोर, कालिनाथ रॉय यांनी आजच्या दिवशी ब्राह्मो समाजाची स्थापना केली, समाजातील चुकीच्या रुढी, प्रथा बंद करण्यासाठी ब्राह्मो समाजाने मोठे काम केले. भारतात माहिती तंत्रज्ञानाचे अवकाश खुले करणारे, देशाचे सहावे आणि सगळ्यात तरुण पंतप्रधान राजीव गांधी यांचा आज जन्मदिन आहे. तर, आजच्या दिवशी महाराष्ट्राला सुन्न करणारी घटना घडली. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात  आली. वाचा सविस्तर 

Horoscope Today 20 August 2023 : मेष, कर्कसह 'या' राशीच्या लोकांना होणार आर्थिक लाभ; जाणून घ्या सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य

Horoscope Today 20 August 2023 : आजचा दिवस कोणत्या राशींसाठी शुभ असणार आहे? मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस कसा असेल? राशीभविष्य जाणून घ्या. वाचा सविस्तर 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar :
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : "निलेश लंके यांच्याशी चर्चा करण्याची माझी तयारी"
Neetu Kapoor Birthday : वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11PM 07 July 2024Navi Mumbai Rain Special Report : मुसळधार पावसानं नवी मुंबईला अक्षरश: धुतलंDada Bhuse On Ladki Bahin : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे महाराष्ट्राने स्वागत केले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar :
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : "निलेश लंके यांच्याशी चर्चा करण्याची माझी तयारी"
Neetu Kapoor Birthday : वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
Embed widget