एक्स्प्लोर

Horoscope Today 20 August 2023 : मेष, कर्कसह 'या' राशीच्या लोकांना होणार आर्थिक लाभ; जाणून घ्या सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य

Horoscope Today 20 August 2023 : आजचा दिवस कोणत्या राशींसाठी शुभ असणार आहे? मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस कसा असेल? राशीभविष्य जाणून घ्या.

Horoscope Today 20 August 2023 : आज रविवार हा महत्त्वाचा दिवस आहे. ग्रहांच्या चालीनुसार मेष राशीचे लोक व्यवसायाबरोबर काही नवीन काम सुरू करू शकतात, तर, सिंह राशीच्या सोकांचा आजचा दिवस चांगला जाईल. एकूणच मेष ते मीन राशीसाठी आजचा रविवार नेमका कसा असेल? काय सांगतात तुमच्या नशिबाचे भाग्यवान तारे? जाणून घ्या आजचं राशीभविष्य.

मेष

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस उत्साही असणार आहे. तुमचे मन आज एखाद्या कामाकडे वळेल. तुम्ही तुमच्या कुटुंबीयांबरोबर धार्मिक स्थळाला भेट देऊ शकता.  अविवाहित लोकांसाठी चांगले लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात. जर तुम्ही नवीन काम सुरू करण्याचा विचार करत असाल, तर काही काळ वाट पाहणे योग्य ठरेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामांची प्रशंसा केली जाईल. आर्थिक लाभाची संधी मिळेल. राजकारणात काम करणाऱ्या लोकांना भेटण्याची संधी मिळेल. 

वृषभ

वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस नुकसानकारक ठरू शकतो. कामाच्या ठिकाणी तुम्हाला मानसिक तणाव जाणवेल. कुटुंबातील एखाद्या सदस्याबरोबर तुमचा वाद होऊ शकतो. त्यामुळे रागावर आणि वाणीवर नियंत्रण ठेवा. कोणत्याही ठिकाणी गुंतवणूक करण्याआधी घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला घ्या. तुमच्या कलागुणांना वाव मिळेल. पण तुम्ही तुमच्या कामात हलगर्जीपणा टाळावा.  तुम्ही पूजा आणि भजन कीर्तन इत्यादींवर खूप पैसे खर्च कराल. मुलांकडून चांगली बातमी ऐकायला मिळेल.

मिथुन

मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र असेल. आज तुम्हाला संपत्तीशी संबंधित कोणत्याही अडचणी येऊ शकतात, त्यामुळे कोणत्याही योजनेत पैसे गुंतवण्याआधी तुम्ही अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्यावा. कोणतीही महत्त्वाची माहिती कोणाशीही शेअर करू नका. काही नवीन काम सुरू करणेही तुमच्यासाठी फायदेशी राहील. आज तुम्ही तुमच्या प्रियजनांबरोबर थोडा वेळ घालवाल, त्यामुळे तुमच्या मनातील गोंधळही दूर होईल. 

कर्क 

कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असेल. व्यवसायात, तुम्ही जुनी योजना पुन्हा सुरू करू शकता. आज अविवाहित लोकांच्या लग्नाच्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब होईल. तुम्ही मित्रांबरोबर फिरायला जाऊ शकता. तुमचे वैवाहिक जीवन चांगले राहील. तुम्ही काही मोठे काम सुरू करण्याचा विचार करू शकता. आर्थिक लाभाची संधी मिळेल. तसेच, नवीन वाहनही खरेदी करू शकता. आज तुमची रखडलेली कामे वेळेत पूर्ण होतील. 

सिंह

सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे. तुम्हाला कार्यक्षेत्रात काही जबाबदार काम सोपवले जाऊ शकते, जे तुम्हाला वेळेत पूर्ण करणं गरजेचं आहे. भावा-बहिणीच्या नात्यात गोडवा असेल. कार्यक्षेत्रात विरोधकांपासून सावध राहणे आवश्यक आहे, अन्यथा अडचणी येऊ शकतात. तुम्ही तुमच्या वागण्यात संयम ठेवावा, अन्यथा घरातील सदस्यांबरोबर तुमचा वाद होऊ शकतो. मित्रांचं सहकार्य तुमच्यासाठी मोलाचं ठरणार आहे.

कन्या

कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र जाणार आहे. रोजगाराच्या शोधात फिरणाऱ्या लोकांना काही काळ संघर्ष करावा लागेल.  कार्यक्षेत्रात तुमचे काही विरोधक तुमच्या कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न करू शकतात. कुटुंबातील सदस्याच्या आरोग्यामुळे तुम्ही चिंतेत असाल. तुमची आर्थिक स्थिती ढासळू शकते. तुम्ही भविष्यासाठी काही पैसे गुंतवण्याचाही विचार करू शकता. विद्यार्थ्यांनी त्यांच्या अभ्यासावर पूर्ण लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे.  

तूळ 

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. तुम्ही कुटुंबातील सदस्यांसह काही शुभ कार्यक्रमात सहभागी व्हाल. तुम्हाला जोडीदाराचा पूर्ण पाठिंबा मिळेल. तुम्हाला तुमच्या विचारात सकारात्मकता आणणं गरजेचं आहे. तरच तुम्ही तुमचं ध्येय गाठू शकता. अन्यथा तुमचे काही नुकसान होऊ शकते. व्यावसायिक लोक कोणत्याही योजनेत पैसे गुंतवण्याचा विचार करत असतील तर काही काळ थांबणे चांगले होईल. आई-वडिलांच्या आशीर्वादाने तुमची सगळी कामे पूर्ण होतील.  

वृश्चिक 

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. व्यवसाय करणाऱ्या लोकांना कामानिमित्त प्रवासाला जाण्याची संधी मिळू शकते. कुटुंबातील सदस्यांमधील  भांडणामुळे तुम्ही तणावात राहाल. कार्यक्षेत्रात तुमच्यावर काही जबाबदार काम सोपवले जाऊ शकते, ज्यामध्ये तुम्ही हलगर्जीपणा करू नये. तुमच्या मुलांबरोबर आज तुम्ही चांगला वेळ घालवू शकाल. ज्यामुळे तुमच्या मनाला मानसिक शांती मिळेल. राजकारणातही चांगली संधी आहे. 

धनु 

आजचा दिवस धनु राशीच्या लोकांसाठी लाभदायक असेल. आज तुम्हाला एखाद्या खास व्यक्तीला भेटण्याची संधी मिळेल. तुम्ही तुमच्या कुटुंबीयांबरोबर कुठेतरी धार्मिक स्थळाला भेट देण्याची योजना आखू शकता. जर तुम्ही बऱ्याच दिवसांपासून पैशांशी संबंधित समस्यांमुळे चिंतेत असाल तर तुम्हाला त्यांच्यापासून मोठ्या प्रमाणात आराम मिळेल. विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाचा मार्ग मोकळा होईल आणि त्यांना कोणत्याही स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळेल. तुम्हाला जोडीदाराचा पूर्ण पाठिंबा मिळेल. कामात हलगर्जीपणामुळे तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

मकर 

मकर राशीचा व्यवसाय करणाऱ्या लोकांनी थोडी सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे. एखाद्या चांगल्या प्रोजेक्टमध्ये गुंतवणूक करणं फायदेशीर ठरेल. संध्याकाळचा वेळ मित्र-मैत्रीणींबरोबर चांगला जाईल. विद्यार्थ्यांसाठी येणारा काळ चांगला असणार आहे. अनेक नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल. तसेच, आज तुम्ही तुमच्या आरोग्याबाबत काळजी घेणं गरजेचं आहे. पोटाशी संबंधित विकार असल्यास वेळीच डॉक्टरांशी संपर्क साधा. मित्रांचं सहकार्य तुमच्यासाठी मोलाचं ठरणार आहे. वैवाहिक जीवनात गोडवा असेल.

कुंभ

कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. फक्त तुम्हाला तुमच्या आरोग्याबाबत जागरुक राहणं गरजेचं आहे. जर तुम्ही दीर्घकाळापासून कोणत्याही आजाराने त्रस्त असाल तर तुम्हाला त्यात हलगर्जीपणा टाळावा लागेल आणि वैद्यकीय सल्ला घ्यावा लागेल. कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या कारकिर्दीबाबत कोणताही निर्णय घ्यावा लागत असेल तर तुमचं मत काळजीपूर्वक मांडा. अन्यथा वाद निर्माण होऊ शकतो. आई-वडिलांच्या आशीर्वादाने तुमचे कोणतेही रखडलेले काम पूर्ण होऊ शकते.

मीन 

आजचा दिवस मीन राशीच्या लोकांसाठी आरोग्याच्या दृष्टीने थोडा त्रासदायक असू शकतो. आज मानसिक समस्यांचा सामना करावा लागेल. त्यामुळे तुमचे मन प्रसन्न नसेल.  मित्राच्या मदतीने तुम्हाला चांगले लाभ मिळू शकतात. जर तुम्ही नवीन वाहन घेण्याचा खूप दिवसांपासून प्रयत्न करत असाल तर आज तुमच्या प्रयत्नांना यश येईल. सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांचा सन्मान होईल. भविष्यात चांगल्या संधी निर्माण होतील.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या :

Horoscope Today 19 August 2023 : मेष, मकर, कुंभ राशीच्या लोकांसाठी दिवस चांगला, फक्त 'हे' काम करू नका; जाणून घ्या सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Chatur Maas 2026 : भगवान विष्णूच्या 'या' 4 आहेत प्रिय राशी; चातुर्मासात राहील विशेष कृपा, फक्त 'हे' कार्य करा...
भगवान विष्णूच्या 'या' 4 आहेत प्रिय राशी; चातुर्मासात राहील विशेष कृपा, फक्त 'हे' कार्य करा...
Weekly Horoscope : धनु आणि मकर राशींसाठी पुढचे 7 दिवस महत्त्वाचे, पैसा, करिअर, नोकरीत नशिबाचे दार उघडणार? साप्ताहिक राशीभविष्य
धनु आणि मकर राशींसाठी पुढचे 7 दिवस महत्त्वाचे, पैसा, करिअर, नोकरीत नशिबाचे दार उघडणार? साप्ताहिक राशीभविष्य
Shani Vakri 2026: 27 जुलैपासून 5 राशी ताकही फुंकून पितील! शनिची उलट चाल, पैसा, नोकरी, प्रेमात मोठे बदल, काय काळजी घ्याल?
27 जुलैपासून 5 राशी ताकही फुंकून पितील! शनिची उलट चाल, पैसा, नोकरी, प्रेमात मोठे बदल, काय काळजी घ्याल?
Weekly Horoscope : तूळ आणि वृश्चिक राशींना जुलैच्या शेवटच्या आठवड्यात मालामाल होण्याची संधी, लक्ष्मी-कुबेराच्या कृपेने श्रीमंतीचे योग; साप्ताहिक राशीभविष्य
तूळ आणि वृश्चिक राशींना जुलैच्या शेवटच्या आठवड्यात मालामाल होण्याची संधी, लक्ष्मी-कुबेराच्या कृपेने श्रीमंतीचे योग; साप्ताहिक राशीभविष्य

व्हिडीओ

Devendra Fadnavis & Delhi : दिल्ली दूर... महाराष्ट्र मंजूर! | Special Report ABP Majha
Sanjay Shirsat Meet Abhijeet Dipke Family : शिरसाट-दिपके भेटीमागचा अर्थ काय? | Special Report
Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा लढा, सरकारला लढा Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Melghat Food Poisoning : मेळघाटात आदिवासी विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ, टिटंबानंतर आता बिजुधावडी आश्रमशाळेत 50 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा
मेळघाटात आदिवासी विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ, टिटंबानंतर आता बिजुधावडी आश्रमशाळेत 50 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा
E20 Janta Party : 'कॉकरोच'च्या यशानंतर आता ई 20 जनता पार्टी स्थापन, इथेनॉल नको म्हणत 100 टक्के शुद्ध पेट्रोलसाठी उपोषण, नितीन गडकरींवर निशाणा
'कॉकरोच'च्या यशानंतर आता ई 20 जनता पार्टी स्थापन, इथेनॉल नको म्हणत 100 टक्के शुद्ध पेट्रोलसाठी उपोषण, काहीच वेळात लाखो फॉलोअर्स
Aditi Tatkare : लाडक्या बहिणींनी 1500 रुपये शॉपिंगवर खर्च करू नये, भविष्यासाठी बचत करावी; आदिती तटकरेंचा सल्ला
लाडक्या बहिणींनी 1500 रुपये शॉपिंगवर खर्च करू नये, भविष्यासाठी बचत करावी; आदिती तटकरेंचा सल्ला
Iran War Live Update: इराणवरील सर्वात मोठ्या हल्ल्यापासून ट्रम्प यांची सपशेल माघार, लष्कराला कारवाई थांबवण्याचे निर्देश
इराणवरील सर्वात मोठ्या हल्ल्यापासून ट्रम्प यांची सपशेल माघार, लष्कराला कारवाई थांबवण्याचे निर्देश
पोटाला सहा वर्षाला लेक, महिला टीचर ट्यूशनला येणाऱ्या 20 वर्षाच्या पोरासोबत रंगेहाथ सापडली; नवऱ्याला म्हणाली, तुला घटस्फोट देतो, पण त्याला सोडणार नाही, शेवटी नवऱ्याचं व्हायचं तेच झालं
पोटाला सहा वर्षाला लेक, महिला टीचर ट्यूशनला येणाऱ्या 20 वर्षाच्या पोरासोबत रंगेहाथ सापडली; नवऱ्याला म्हणाली, तुला घटस्फोट देतो, पण त्याला सोडणार नाही, शेवटी नवऱ्याचं व्हायचं तेच झालं
Zimbabwe vs India, 3rd T20I: वैभव सुर्यवंशीला शतकाची हुलकावणी; टीम इंडियाचे झिम्बाब्वेसमोर विजयासाठी 193 धावांचे आव्हान
वैभव सुर्यवंशीला शतकाची हुलकावणी; टीम इंडियाचे झिम्बाब्वेसमोर विजयासाठी 193 धावांचे आव्हान
Revanth Reddy on Election Age: देशातील जेन झीने दिल्ली अन् मोदी सरकार हादरवून सोडताच तेलंगणा सरकारच्या निर्णयाची भलतीच चर्चा! मोदी सरकार मान्यता देणार?
देशातील जेन झीने दिल्ली अन् मोदी सरकार हादरवून सोडताच तेलंगणा सरकारच्या निर्णयाची भलतीच चर्चा! मोदी सरकार मान्यता देणार?
भाजप खासदाराच्या लेकीचा धर्मेंद्र प्रधानांविरोधात एल्गार! म्हणाली, ती पोस्ट अजिबात डिलीट करणार नाही, दुसरीकडे चक्क भाजप मंत्र्याच्या लेकीची सुद्धा मोदींविरोधोत घोषणाबाजी!
भाजप खासदाराच्या लेकीचा धर्मेंद्र प्रधानांविरोधात एल्गार! म्हणाली, ती पोस्ट अजिबात डिलीट करणार नाही, दुसरीकडे चक्क भाजप मंत्र्याच्या लेकीची सुद्धा मोदींविरोधोत घोषणाबाजी!
Embed widget