Morning Headlines 8th January: देश विदेशातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर, वाचा मॉर्निंग न्यूज
देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील
देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...
Lok Sabha Election 2024 : जागावाटपाआधीच महाविकास आघाडीतील धुसफूस चव्हाट्यावर; दक्षिण मुंबईसाठीही काँग्रेस आग्रही, ठाकरेंसमोर पेच?
Lok Sabha Election 2024 : मुंबई : यंदाचं वर्ष निवडणुकांचं वर्ष असणार आहे. आगामी काळात पार पडणाऱ्या लोकसभा निवडणुकांसाठी (Lok Sabha Elections 2024) सर्वच पक्षांनी आपापल्या परीनं तयारी सुरू केली आहे. अशातच अनेक पक्षांनी आपपले उमेदवारही जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. राज्यात महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीकडे (Maha Vikas Aghadi) सर्वांचं लक्ष लागलं आहे. लोकसभा जागा वाटपासंदर्भात सर्वच पक्षांसह, महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये काहीसे हेवेदावे पाहायला मिळत आहेत... वाचा सविस्तर
MLA Disqualification Case: शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल तयार? सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार, 10 जानेवारीपर्यंत निकाल अनिवार्य
Shiv Sena MLA Disqualification Case: मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यासह 16 आमदारांच्या अपात्रतेचा (MLA Disqualification Case) निकाल तयार झाल्याची चर्चा आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Vidhan Sabha Speaker Rahul Narwekar) यांनी त्यांच्या निकालपत्राचा मसुदा कायदेशीर अभिप्रायासाठी दिल्लीतील तज्ज्ञांकडे पाठवल्याचं समजतं. दरम्यान सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार 10 जानेवारीपर्यंत निकाल देणं अनिवार्य आहे... वाचा सविस्तर
Narendra Modi : खिलाडी कुमार, भाईजान ते कंगना रनौत; बॉलिवूडकरांचा पंतप्रधान नरेंद्र मोंदीना पाठिंबा; लक्षद्वीपकडे लक्ष देण्याचं आवाहन
Bollywood Stars Support PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी नव्या वर्षाच्या सुरुवातीला लक्षद्वीप (Lakshadweep) दौरा केला आहे. लक्षद्वीप दौऱ्याचे फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यानंतर लक्षद्वीप जगभरात ट्रेडिंगमध्ये आहे. लक्षद्वीपच्या सौंदर्यावर मोदींनी भाष्य केल्यानंतर मालदीवच्या नेत्यांनी भारतासंबंधित वादग्रस्त भाष्य केलं. त्यानंतर नेटकऱ्यांनी मालदीवला बायकॉट करण्याचा ट्रेंड सुरू केला. अशातच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्षद्वीप पर्यटन स्थळाकडे लक्ष देण्याचं आवाहन केलं असून अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी यासाठी त्यांना पाठिंबा दिला आहे... वाचा सविस्तर
Golden Globe Awards 2024 : गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळ्यात 'ओपनहाइमर' अन् 'बार्बी'चा बोलबाला; पाहा विजेत्यांची संपूर्ण यादी
Golden Globe Awards 2024 Winners List : 'गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळा 2024' (Golden Globe Awards 2024) हा जगभरातील लोकप्रिय पुरस्कार सोहळा आहे. या पुरस्कार सोहळ्याची जगभरातील सिनेप्रेमींमध्ये चर्चा आहे. यंदाचं पुरस्कार सोहळ्याचं 81 वं वर्ष आहे. सिनेसृष्टीतील हा प्रतिष्ठित पुरस्कार सोहळा आहे. अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये या पुरस्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. यंदा या पुरस्कार सोहळ्यात 'ओपनहाइमर' (Oppenheimer) आणि 'बार्बी' (Barbie) या सिनेमांचा चांगलाच बोलबाला पाहायला मिळत आहे. जाणून घ्या विजेत्यांची संपूर्ण यादी... वाचा सविस्तर
Vivah Muhurta 2024 : विवाहासाठी सर्वोत्तम मुहूर्त फेब्रुवारी 2024 मध्ये! मे, जून मध्ये मुहूर्त नाहीत? तुमच्याकडेही यंदा कर्तव्य असेल तर एकदा पाहाच...
Vivah Muhurta 2024 : 2024 मध्ये 2023 च्या तुलनेत 4 दिवस कमी लग्नाचा शुभ मुहूर्त असेल. विशेष म्हणजे जे लोक उन्हाळ्यात लग्न करण्याचा विचार करत आहेत, त्यांना ही संधी मिळणार नाही, कारण मे आणि जूनमध्ये लग्नाचा एकही दिवस शुभ नसेल. याचे कारण या दोन महिन्यांतील शुक्राचा अस्त असेल, त्यानंतर जुलैमध्येच शुभ मुहूर्त सुरू होईल... वाचा सविस्तर
Ram Mandir: 22 जानेवारीला आसाममध्ये दारू विक्रीवर बंदी; राम मंदिराच्या उद्घाटनानिमित्त 'ड्राय डे' जाहीर
Dry Day in Assam on 22 January: अयोध्येतील (Ayodhya) भव्य राम मंदिराचं (Ram Mandir) उद्घाटन 22 जानेवारीला आयोजित करण्यात आला आहे. रामललाच्या अभिषेक सोहळ्यासाठी देश-विदेशातील अनेक दिग्गज उपस्थित राहणार आहेत. या दिमाखदार सोहळ्यासाठी संपूर्ण अयोध्या नगरी सज्ज झाली आहे. अशातच देशातही 22 जानेवारीला मोठा उत्सव साजरा केला जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर आसाम सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. आसाम सरकारनं 22 जानेवारीचा दिवस 'ड्राय डे' म्हणून घोषित केला आहे. म्हणजेच, या दिवशी राज्यात दारूची दुकानं बंद राहणार आहेत. संपूर्ण राज्यात 22 जानेवारीला दारूविक्रीसाठी बंदी असेल. आसामच्या एका मंत्र्यानं यासंदर्भात माहिती दिली आहे... वाचा सविस्तर
Horoscope Today 8 January 2024 : आजचा सोमवार खास! 'या' राशींना मिळणार आर्थिक लाभ, आजचे राशीभविष्य जाणून घ्या
Horoscope Today 8 January 2024 : राशीभविष्यनुसार आज म्हणजेच 8 जानेवारी 2024 रोजी सोमवार हा महत्त्वाचा दिवस आहे. ग्रहांच्या चालीनुसार मकर राशीच्या लोकांनी आपल्या आजूबाजूला काम करणाऱ्या लोकांवर आज लक्ष ठेवावे, मीन राशीच्या लोकांनी संपर्क वाढवावा, हे लोक त्यांच्या भविष्यात उपयोगी पडू शकतात आणि तुम्ही तुमच्यासाठी प्रगतीचे मार्ग शोधू शकता. सर्व राशीच्या लोकांसाठी सोमवार कसा राहील? सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या... वाचा सविस्तर