![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Golden Globe Awards 2024 : गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळ्यात 'ओपनहाइमर' अन् 'बार्बी'चा बोलबाला; पाहा विजेत्यांची संपूर्ण यादी
Golden Globe Awards 2024 Winners Name : 'गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळा 2024'मध्ये 'ओपनहाइमर' (Oppenheimer) आणि 'बार्बी' (Barbie) या सिनेमांचा चांगलाच बोलबाला पाहायला मिळत आहे.
![Golden Globe Awards 2024 : गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळ्यात 'ओपनहाइमर' अन् 'बार्बी'चा बोलबाला; पाहा विजेत्यांची संपूर्ण यादी Golden Globe Awards 2024 winners list know who gets best actor actress title Oppenheimer Barbie movie Bollywood Hollywood Entertainement Latest Update Golden Globe Awards 2024 : गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळ्यात 'ओपनहाइमर' अन् 'बार्बी'चा बोलबाला; पाहा विजेत्यांची संपूर्ण यादी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/08/4e52ce02898967d8be795f97e478e2601704681053185254_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Golden Globe Awards 2024 Winners List : 'गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळा 2024' (Golden Globe Awards 2024) हा जगभरातील लोकप्रिय पुरस्कार सोहळा आहे. या पुरस्कार सोहळ्याची जगभरातील सिनेप्रेमींमध्ये चर्चा आहे. यंदाचं पुरस्कार सोहळ्याचं 81 वं वर्ष आहे. सिनेसृष्टीतील हा प्रतिष्ठित पुरस्कार सोहळा आहे. अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये या पुरस्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. यंदा या पुरस्कार सोहळ्यात 'ओपनहाइमर' (Oppenheimer) आणि 'बार्बी' (Barbie) या सिनेमांचा चांगलाच बोलबाला पाहायला मिळत आहे. जाणून घ्या विजेत्यांची संपूर्ण यादी
गोल्डन ग्लोब पुरस्कार पटकावणाऱ्या विजेत्यांची संपूर्ण यादी (Golden Globe Awards 2024 Winners List)
सर्वोत्कृष्ट मोशन सिनेमा (नॉन इंग्लिश लँग्वेज) - एनाचमी ऑफ अ फॉल (नीयोन)
सर्वोत्कृष्ट विनोदवीर (टीव्ही विभाग) - रिकी गर्विस (Ricky Gervais)
सर्वोत्कृष्ट अभिनेता (टीव्ही विभाग) - जेरेमी ऍलन व्हाइट (Jeremy Allen White)
सर्वोत्कृष्ट पटकथा - जस्टिन ट्रायट, आर्थर हरारी (Justin Triet, Arthur Harari) - एनाटमी ऑफ अ फॉल
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता टीव्ही विभाग - मॅथ्यू मॅकफॅडियन (Matthew Macfadyen )
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता - रॉबर्ड डाउनी (ओपनहाइमर)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री - डा वाइन जॉय रैंडोल्फ
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक - क्रिस्तोफर नोलन
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - एलिजाबेथ डेबिकी
सर्वोत्कृष्ट अॅनिमेशन सिनेमा - द बॉय अँड द हेरॉन
सर्वोत्कृष्ट विनोदवीर अभिनेत्री - एम्मा स्टोन
सिनेमॅटिक आणि बॉक्स ऑफिस अॅचिवमेंट अवॉर्ड - बार्बी
👏 Congratulations to the Best Supporting Male Actor – Motion Picture winner Robert Downey Jr. for his role in Oppenheimer! #GoldenGlobes pic.twitter.com/8qVYgcI1R5
— Golden Globe Awards (@goldenglobes) January 8, 2024
'ओपनहाइमर'बद्दल जाणून घ्या...
ख्रिस्तोफर नोलन दिग्दर्शित 'ओपनहाइमर' हा सिनेमा प्रेक्षकांना प्राईम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येईल. या सिनेमात सिलियन मर्फीने मुख्य भूमिका साकारली आहे. तसेच एमिली ब्लंट, मॅट डॅमन, रॉबर्ट डाउनी जूनियर, आणि फ्लॉरेन्स पग यांनी देखील या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे.
'बार्बी'बद्दल जाणून घ्या...
'बार्बी' या सिनेमात मार्गोट रॉबी आणि रयान गोस्लिंग मुख्य भूमिकेत आहेत. तर ग्रेटा गर्विनने (Greta Gerwig) या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. 'बार्बी' या सिनेमात अभिनेत्री मार्गोट रॉबीनं 'बार्बी' ही भूमिका साकारली आहे. तर केन ही भूमिका रायन गॉस्लिंगनं साकारली आहे.
संबंधित बातम्या
Golden Globe Awards 2023: 'प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटला'; गोल्डन ग्लोब पुरस्कार पटकावणाऱ्या RRR च्या टीमचं पतंप्रधानांकडून कौतुक
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)