एक्स्प्लोर

Morning Headline 7th March 2024 : देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर, वाचा मॉर्निंग

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...

Rain News : विदर्भ, मराठवाड्यावर अवकाळी पावसाचे ढग कायम, 'या' भागात पावसाची हजेरी

IMD Rain Alert : वेस्टर्न डिस्टबर्न्समुळे देशासह राज्याच्या हवामानात मोठा बदल झाल्याचं दिसून येत आहे. आजही देशात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता (Unseasonal Rain) आहे. भारतीय हवामान विभागाच्या (IMD) अंदाजानुसार, देशात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता (IMD Rain Alert) आहे. काश्मीर खोऱ्यात आज जोरदार बर्फवृष्टी आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. हिमाचल प्रदेश, अरुणाचल प्रदेश आणि उत्तराखंड भागातही आज पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. पुढील 24 तासात देशाच्या विविध भागात पावसाचा अंदाज हवामान विभागाने (IMD) वर्तवला आहे. देशासह राज्यातही पावसाची शक्यता कायम आहे. वाचा सविस्तर...

मोठी बातमी! शिवसेना आणि भाजपामध्ये वादाची ठिणगी! केसाने गळा कापू नका, राज्यातल्या भाजप नेत्यांना रामदास कदमांचा इशारा

Maharashtra Politics , Ratnagiri News : लोकसभेच्या जागा वाटपावरून (Lok Sabha Election 2024) शिवसेना (Shiv Sena) आणि भाजपामध्ये (BJP) वादाची ठिणगी पडल्याचं दिसत आहे. केसाने आमचा गळा कापू नका, विश्वासघात करू नका, असा इशारा शिवसेनेचे माजी पर्यावरण मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी दिला आहे. 'माझं नाव रामदास कदम आहे, हे लक्षात ठेवा', असं म्हणत रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी राज्यातल्या भाजप नेत्यांना इशारा दिला आहे. वाचा सविस्तर...

Gokhale Bridge : पालिकेच्या चुकीमुळे 100 कोटींचा चुराडा! गोखले - बर्फीवाला पुलाचे सूत काही जमेना

Gokhale-Barfiwala Flyover Issue : मुंबईकरांचा वेळ वाचवणारा, वाहतूक कोंडीतून मुंबईकरांची सुटका करणारा ब्रीज अर्थात अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा गोखले ब्रीज. या एका पुलामुळे वाहनचालकांचा बराच वेळ वाचतो. पण ब्रिटीशकालीन हा पूल जीर्ण झाला आणि वाहतुकीसाठी बंद कऱण्यात आला. पुलाच्या पुनर्विकासानंतर एक मार्गिका वाहतुकीसाठी खुली झाली. 200 कोटी खर्चून बीएमसीने नव्याने पूल बांधला खरा पण त्यातही घोळ झाला. बांधकामात चूक झाल्याने 100 कोटींचा अधिक फटका बसणार आहे. वाचा सविस्तर...

PM किसानच्या 16व्या हप्त्याची रक्कम मिळाली का? मिळाली नसेल तर शेतकऱ्यांनी कुठे करावी तक्रार?

Pradhan Mantri Kisan Samman Nidhi: देशातील शेतकऱ्यांना (Farmers) आर्थिक पाठबळ देण्यासाठी सरकार विविध योजना राबवते. यातीलच एक महत्वाची योजना म्हणजे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना (Pradhan Mantri Kisan Samman Nidhi). या योजनेच्या माध्यमातून दरवर्षी शेतकऱ्यांना 6000 रुपयांची मदत केली जाते. यामध्ये चार महिन्याला 2000 रुपयांचा हप्ता दिला जातो. आत्तापर्यंत 16 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. दरम्यान, अनेक शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा 16 वा हप्ता मिळाला नाही. हा हप्ता मिळाला नसेल तर तक्रार कशी आणि कुठे कराल? यासंदर्भातील सविस्तर माहिती वाचा सविस्तर...

Salman Khan : स्पर्धकाने सांगून सलमानला रडवलं, व्हिडीओ होतोय व्हायरल; काय झालं होतं नेमकं?

Salman Khan Viral Video :   बॉलीवूडचा भाईजान सलमान खान (Salman Khan) आपल्या नवीन चित्रपटांमुळे नेहमीच चर्चेत असतो. अलीकडेच, जामनगरमध्ये अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंग फंक्शनमध्ये अभिनेता शाहरुख खान (Shahrukh Khan) आणि आमिर खानसोबत (Aamir Khan) डान्स करताना दिसला. लवकरच अभिनेत्याचा नवा चित्रपट 'द बुल' मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची चाहत्यांना प्रचंड उत्सुकता आहे. दरम्यान, सध्या सलमान खानचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत सलमान खान भावूक झाल्याचे दिसते. वाचा सविस्तर...

IND vs ENG : इंग्लंडनं नाणेफेक जिंकली, भारताच्या संघात दोन बदल, पाहा दोन्ही संघाची प्लेईंग 11

IND vs ENG Test :  इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स यानं अखेरच्या कसोटी सामन्यात नाणेफेक जिंकली आहे. बेन स्टोक्स याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यजमान भारतीय संघ प्रथम गोलंदाजीसाठी मैदानात उतरणार आहे. वाचा सविस्तर...

गुरुवारी होणार भरभराट; 'या' राशींना मिळणार फायदेशीर संधी, वाचा तुमचे राशीभविष्य!

Horoscope 7th March 2024:  आजचं माझं  भविष्य काय? आज  काय होणार?  किंवा आजचा  आपला दिवस कसा असणार प्रत्येक जण कधी ना कधी हा विचार करतच असतो. लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांनाच  भविष्यात काय होणार हे जाणून घेण्याची प्रबळ इच्छा असते. यासाठीच  आपल्या राशी आपल्याला मदत करतात. आज मेष ते मीन राशीमध्ये काय लिहीले आहे. कोणासाठी  आजचा दिवस कोणासाठी शुभ किंवा  अशुभ कोणासाठी हे  समजण्यासाठी आजचे राशीभविष्य वाचा सविस्तर... 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Shivaji Maharaj: महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख
महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
Adult Web Series On OTT : फक्त 'मस्तराम'च नाही तर 'या' वेब सीरिजमध्येही हॉट सीन्सचा भडिमार, कुटुंबासह चुकूनही पाहू नका
फक्त 'मस्तराम'च नाही तर 'या' वेब सीरिजमध्येही हॉट सीन्सचा भडिमार, कुटुंबासह चुकूनही पाहू नका
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
Advertisement
metaverse

व्हिडीओ

CM Eknath Shinde, Devendra Fadnavs आणि अजित पवार यांची 'वर्षा' बंंगल्यावर बैठकABP Majha Marathi News Headlines 07 AM TOP Headlines 26 June 2024Majha Gaon Majha Jilha : गावा-खेड्यातील बातम्या : माझं गाव माझा जिल्हा : 07 AM: 25 June 2024TOP 100 Headlines : सकाळच्या 100 बातम्यांचा वेगवान आढावा : 25 June 2024 : 07 AM :  ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shivaji Maharaj: महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख
महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
Adult Web Series On OTT : फक्त 'मस्तराम'च नाही तर 'या' वेब सीरिजमध्येही हॉट सीन्सचा भडिमार, कुटुंबासह चुकूनही पाहू नका
फक्त 'मस्तराम'च नाही तर 'या' वेब सीरिजमध्येही हॉट सीन्सचा भडिमार, कुटुंबासह चुकूनही पाहू नका
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
Amol Mitkari : प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
Pune : पुण्यात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही तरूणांची ओळख पटली, मुंबईचा तरूण आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर
पुण्यात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही तरूणांची ओळख पटली, मुंबईचा तरूण आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर
Embed widget