Salman Khan : स्पर्धकाने सांगून सलमानला रडवलं, व्हिडीओ होतोय व्हायरल; काय झालं होतं नेमकं?
Salman Khan Viral Video : सोशल मीडियावर सलमान खानचा एक व्हिडीओ व्हायरल होत असून त्यात तो भावूक होत असल्याचे दिसत आहे.
Salman Khan Viral Video : बॉलीवूडचा भाईजान सलमान खान (Salman Khan) आपल्या नवीन चित्रपटांमुळे नेहमीच चर्चेत असतो. अलीकडेच, जामनगरमध्ये अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंग फंक्शनमध्ये अभिनेता शाहरुख खान (Shahrukh Khan) आणि आमिर खानसोबत (Aamir Khan) डान्स करताना दिसला. लवकरच अभिनेत्याचा नवा चित्रपट 'द बुल' मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची चाहत्यांना प्रचंड उत्सुकता आहे. दरम्यान, सध्या सलमान खानचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत सलमान खान भावूक झाल्याचे दिसते.
काय घडलं सलमानसोबत?
सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडीओ खूपच जुना आहे. हा व्हिडिओ 'सा रे ग मा पा' या सिंगिंग रिॲलिटी शोच्या एका एपिसोडची छोटी क्लिपिंग आहे. या व्हिडिओमध्ये एक स्पर्धक सलमान आणि ऐश्वर्या राय यांच्या 'हम दिल दे चुके सनम' चित्रपटातील गाणे गाताना दिसत आहे.
गाणं सादर करण्यापूर्वी स्पर्धक पूनमने सलमानशी संवाद साधला. त्यावेळी तिने आपल्याला इस्माईल सरांनी यांनी हे गाणं ऐकताना सलमानच्या डोळ्यात अश्रू आले पाहिजे असे सांगितले होते. त्यावर सलमान खान तू वाईट गायले तरी मी चांगला अभिनय करू शकतो, असे म्हणतो. त्यावर इस्माईल यांनी सेटवरचा अनुभव सांगताना यापुढे मी गाणं कोणाला सांगणार नसल्याचे म्हटले.
त्यानंतर स्पर्धक पूनमने 'तडप- तडप के इस दिल से आ निकले लागी' हे गाणे सादर करण्यास सुरुवात केली. हे गाणे सादर होऊ लागताच सलमान खान भावूक झाला आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले.
'हम दिल दे चुके है सनम' चित्रपटात सलमान खान आणि ऐश्वर्या राय एकत्र झळकले होते. व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ यूट्यूबवर खूप पूर्वी अपलोड करण्यात आला आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत 40 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे.
सलमान-ऐश्वर्याचे ब्रेकअप
एका वृत्तानुसार, सलमान आणि ऐश्वर्या यांचे प्रेमप्रकरण सुरू होते. जवळपास दोन वर्षापर्यंत त्यांचे प्रेमसंबंध होते. मात्र, त्यानंतर दोघांमध्ये वाद वाढू लागल्यानंतर त्यांचे ब्रेकअप झाले. या ब्रेकअपनंतर सलमान आणि ऐश्वर्या यांनी कधीही एकत्र काम केले नाही. ऐश्वर्या रायने 20 एप्रिल 2007 रोजी अभिनेता अभिषेक बच्चन सोबत विवाह केला.