एक्स्प्लोर

Morning Headlines 4th November: देश विदेशातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर, वाचा Morning News

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...

Urfi Javed Viral Video Case: उर्फी जावेद व्हायरल व्हिडीओमुळे अडचणीत; गुन्हा दाखल होताच दुबईला पळाली?

Urfi Javed Viral Video Case: मुंबई पोलिसांची (Mumbai Police) बदनामी केल्या संदर्भात अभिनेत्री उर्फी जावेदवर (Urfi Javed) झाला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोशल मीडियात (Social Media) व्हायरल झालेल्या व्हिडीओवरून उर्फी जावेद आणि तिच्या इतर सहकाऱ्यांच्या विरोधात मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मात्र, ओशिवरा पोलिसांनी गुन्हा दाखल होताच, उर्फीनं केवळ मुंबईतूनच नाहीतर चक्क देशातून काढता पाय घेतल्याची माहिती मिळत आहे. गुन्हा दाखल होताच, उर्फी जावेद देशाबाहेर दुबईमध्ये निघून गेली. दरम्यान, या प्रकरणातील तोतया पोलीस निरीक्षकाला अटक करण्यात आली असून स्वस्त प्रसिद्धीसाठी कायद्याचं उल्लंघन करू शकत नाही, असं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. वाचा सविस्तर 

Earthquake: भूकंपामुळे नेपाळ उध्वस्त, आतापर्यंत 72 जणांनी गमावले प्राण, मृतांचा आकडा वाढण्याची भीती

Earthquake at Nepal : नेपाळमध्ये (Nepal News) शुक्रवारी रात्री उशिरा तीव्र भूकंपानं हाहाकार माजवला. 6.4 रिश्टर स्केलच्या भूकंपानं (Earthquake Updates) नेपाळमध्ये मृत्यूतांडव पाहायला मिळालं. भूकंपात आतापर्यंत 72 लोकांचा मृत्यू झाला आहे. ढिगाऱ्याखाली दबल्यामुळे अनेकजण गंभीर जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. रुकुम पश्चिम आणि जाजरकोटमध्ये भूकंपामुळे सर्वाधिक लोकांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे. वाचा सविस्तर 

BJP Manifesto : 500 रुपयांत गॅस सिलेंडर, एक लाख सरकारी नोकऱ्या; छत्तीसगडसाठी भाजपचा जाहीरनामा

Chhattisgarh Election 2023 : पाच राज्यांच्या निवडणुकांच्या (Assembly Election 2023) रणधुमाळीला सुरुवात झाली असून सर्व पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरु आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर (Chhattisgarh Assembly Election 2023) छत्तीसगडसाठी भाजपने जाहीरनामा (Chhattisgarh BJP Manifesto) प्रसिद्ध केला आहे. रायपूरमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी 'छत्तीसगड 2023 साठी मोदींची हमी' नावाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. या जाहीरनाम्यात जनतेला 20 आश्वासने देण्यात आली आहेत. या जाहीरनाम्यात भाजप (BJP) ने 500 रुपयांत गॅस सिलेंडर, एक लाख सरकारी नोकऱ्या देण्याचं आश्वासन दिलं आहे. तसेच, विवाहित महिलांना वार्षिक आर्थिक सहाय्य देण्याचंही घोषणापत्रात म्हटलं आहे. वाचा सविस्तर

Weather Update : महाराष्ट्र गारठला! 'या' जिल्ह्यात पावसाचा अंदाज, राज्यभरात गुलाबी थंडीची चाहूल

Maharashtra Weather Update : राज्यात गुलाबी थंडी (Cold Weather) ची चाहूल लागली असून सर्वत्र गारठा (Winter) वाढला आहे. वाढत्या तापमानापासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान, राज्यात (Maharashtra) काही भागात पावसाची शक्यता हवामान विभाग (IMD) ने वर्तवली आहे. नोव्हेंबर (November) महिन्यात गारठा वाढला असली तरी, आणखी पारा घसरणार आहे. राज्यात सिंधुदुर्ग (Sindhudurg) आणि कोल्हापूर (Kolhapur) त पावसाची शक्यता (Rain Alert) हवामान विभागाने वर्तवली आहे. या भागात मेघगर्जनेसह पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे. यासोबत गोव्यातही (Goa) पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. वाचा सविस्तर 

Afghanistan Semi Final Chances : अफगाण संघाची उपांत्य फेरीच्या दिशेने वाटचाल, पाहा आता काय असेल समीकरण

ICC World Cup 2023 : अफगाणिस्तान संघाने सलग चौथ्या विजयाची नोंद करत विश्वचषकात खळबळ माजवली आहे. अफगाणिस्तान संघाने आठ गुणासह सेमीफायनलकडे पावले टाकली आहत. अफगाणिस्तानचा संघ गुणतालिकेत पाचव्या क्रमांकावर विराजमान आहे. भारतीय संघ अव्वल स्थानावर विराजमान आहे, तर ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान संघाचे समान गुण आहेत, पण ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडचा रनरेट अफगाणिस्तानपेक्षा चांगलाय. त्यामुळे ते आघाडीच्या चार संघामध्ये आहे. वाचा सविस्तर 

04 November In History : वासुदेव बळवंत फडके आणि शकुंतला देवी यांचा जन्म, बराक ओबामा अमेरिकेचे पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष; आज इतिहासात

मुंबई : इतिहासात आज काय घडलं याची आपल्या सर्वांना उत्सुकता असते. आज म्हणजे 4 नोव्हेंबर रोजी देखील भारतात आणि जगात खूप महत्वाच्या घटना घडल्या होत्या. भारतीय क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचा तसेच ह्यूमन काॅम्पूटर अशी ओळख असलेल्या शकुंतला देवी जन्म आजच्या दिवशी झाला होता. इतिहासात आजचा दिवस महत्वाचा आहे. पुण्यात डेक्कन सभेची स्थापना आजच्या दिवशी झाली होती तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यक्ष असणाऱ्या घटना समितीने आजच्याच दिवशी घटनेचा मसुदा सादर केला होता.आजच्याच दिवशी बराक ओबामा हे अमेरिकेचे पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष बनले.  तसेच, आजच्या दिवशी असणारे दिग्गजांचे जन्मदिवस आणि निधन झालेल्या महत्वपूर्ण व्यक्तींबद्दल थोडक्यात जाणून घेणार आहोत. वाचा सविस्तर 

Horoscope Today 4 November 2023 : आज शनि मार्गी होणार, शनिवारी 12 राशींवर काय परिणाम होणार? आजचे राशीभविष्य जाणून घ्या.

Horoscope Today 4 November 2023 : राशीभविष्यानुसार आज म्हणजेच 04 नोव्हेंबर 2023 रोजी शनिवार हा महत्त्वाचा दिवस आहे. या दिवशी शनीची चाल देखील बदलत असते. या दिवशी शनि मार्गी होत आहे, ज्यामुळे सर्व 12 राशींवर परिणाम होईल. ग्रहांच्या चालीनुसार, आज मिथुन राशीची लोकांसाठी एखादी व्यक्ती मदतीसाठी आली तर त्या व्यक्तीला निराश करू नका, त्याला मदत करण्याचा पूर्ण प्रयत्न करा. आपले नशीब शोधण्याऐवजी आपल्या कर्मावर लक्ष केंद्रित करा आणि कर्म करत राहा, परिणामांची चिंता करू नका. इतर राशीच्या लोकांसाठी गुरुवार कसा राहील? सर्व १२ राशींचे आजचे राशीभविष्य जाणून घेऊया. वाचा सविस्तर 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Malegaon Bajar Samiti :  विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
Nashik Encroachment : कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे;  नाशिककरांची सुटका कधी?
कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे; नाशिककरांची सुटका कधी?
धक्कादायक! पुण्यात स्टील कंपनीच्या मालकावर दिवसाढवळ्या गोळीबार; दुचाकीवरुन आले अन् निघून गेले
धक्कादायक! पुण्यात स्टील कंपनीच्या मालकावर दिवसाढवळ्या गोळीबार; दुचाकीवरुन आले अन् निघून गेले
जिल्ह्यात बीडची लॉबी काम करतेय, मंत्री नितेश राणे संतापले; पत्रकार परिषदेतून थेट इशारा, गाठ माझ्याशी
जिल्ह्यात बीडची लॉबी काम करतेय, मंत्री नितेश राणे संतापले; पत्रकार परिषदेतून थेट इशारा, गाठ माझ्याशी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mumbai High Court On Akshay Shinde : माझा मुलगा निर्दोष होता..अक्षय शिंदेंच्या आईची प्रतिक्रियाABP Majha Marathi News Headlines 4PM TOP Headlines 04 PM 20 January 2025Rahul shewale On MVA : ठाकरेंच्या शिवसेनेचे 15 आमदार आणि काँग्रेसचे 10 आमदार शिवसेनेच्या संपर्कात-राहुल शेवाळेUddhav Thackeray Meet Sharad Pawar : उद्धव ठाकरेंनी घेतली शरद पवार यांची भेट, दीड तास झाली चर्चा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Malegaon Bajar Samiti :  विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
Nashik Encroachment : कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे;  नाशिककरांची सुटका कधी?
कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे; नाशिककरांची सुटका कधी?
धक्कादायक! पुण्यात स्टील कंपनीच्या मालकावर दिवसाढवळ्या गोळीबार; दुचाकीवरुन आले अन् निघून गेले
धक्कादायक! पुण्यात स्टील कंपनीच्या मालकावर दिवसाढवळ्या गोळीबार; दुचाकीवरुन आले अन् निघून गेले
जिल्ह्यात बीडची लॉबी काम करतेय, मंत्री नितेश राणे संतापले; पत्रकार परिषदेतून थेट इशारा, गाठ माझ्याशी
जिल्ह्यात बीडची लॉबी काम करतेय, मंत्री नितेश राणे संतापले; पत्रकार परिषदेतून थेट इशारा, गाठ माझ्याशी
युवक काँग्रेसच्या 60 पदाधिकाऱ्यांची उचलबांगडी, पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; वरिष्ठ नेत्यांपर्यंत वादाची ठिणगी?
युवक काँग्रेसच्या 60 पदाधिकाऱ्यांची उचलबांगडी, पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; वरिष्ठ नेत्यांपर्यंत वादाची ठिणगी?
Kolkata Rape Case : कोलकाता बलात्कार प्रकरणातील 'राक्षसा'ला जन्मठेप, ड्युटीवर असलेल्या महिला डॉक्टरची केली होती हत्या  
कोलकाता बलात्कार प्रकरणातील 'राक्षसा'ला जन्मठेप, ड्युटीवर असलेल्या महिला डॉक्टरची केली होती हत्या  
राजकीय अस्त झाला तरी चालेल पण आम्ही तटकरे फॅमिलीला स्वीकारणार नाही, शिंदे गटाच्या आमदाराचा हल्लाबोल
राजकीय अस्त झाला तरी चालेल पण आम्ही तटकरे फॅमिलीला स्वीकारणार नाही, शिंदे गटाच्या आमदाराचा हल्लाबोल
Jalgaon Crime : माझ्या लेकराला मारलं, त्यांना फाशीचीच शिक्षा व्हावी, मुकेशच्या आईने फोडला टाहो; पोलिसांवरही गंभीर आरोप
माझ्या लेकराला मारलं, त्यांना फाशीचीच शिक्षा व्हावी, मुकेशच्या आईने फोडला टाहो; पोलिसांवरही गंभीर आरोप
Embed widget