एक्स्प्लोर

Morning Headlines 4th February : देश विदेशातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर, वाचा मॉर्निंग न्यूज

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...

IMD Weather Update : महाराष्ट्रासह केरळ, तामिळनाडूत मुसळधार पावसाची शक्यता; वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे हवामानात पुन्हा बदल

Weather Update Today : आज वायव्य भारताला ताज्या वेस्टर्न डिस्टर्बन्सचा सामना करावा लागेल. त्यामुळे थंडीचा जोर कमी होणार असून काही भागात पावसाची शक्यता असल्याचं आयएमडीने म्हटलं आहे. भारतीय हवामान विभागाच्या (IMD)  ताज्या अंदाजानुसार, आज पंजाब, हरियाणा, चंडीगड, दिल्लीमध्ये सकाळच्या वेळी दाट ते अत्यंत दाट धुके दिसण्याची शक्यता आहे. त्यासोबत काही भागात हलक्या पावसाची शक्यता आहे. महाराष्ट्रातही काही भागात तुरळक पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. वाचा सविस्तर...

Maharashtra Weather : वीकेंडला पावसाची हजेरी! राज्यात 'या' भागात पावसाची शक्यता; पुढच्या आठवड्यात थंडीचा जोर वाढणार

Maharashtra Weather Forecast Today : उत्तरेत थंड हवेचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने (IMD) वर्तवली आहे. उत्तरेकडील थंड वाऱ्यांच्या वाढत्या प्रभावामुळे देशासह राज्याच्या हवामानावरही परिणाम होणार आहे. आयएमडीच्या अंदाजानुसार, वीकेंडला पावसाची हजेरी पाहायला मिळेल. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, राज्यात काही ठिकाणी पावसाची हजेरी पाहायला मिळेल. दरम्यान, आज वीकेंडला पावसाची शक्यता असून त्यानंतर उद्यापासून राज्यातील तापमान घट होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. वाचा सविस्तर...

सत्ताधारी नेत्यांमध्ये कायदा मोडण्याची स्पर्धा, महाराष्ट्रात कायदा, सुव्यवस्था ढासळलीय का?

मुंबई : सत्तेतले नेते थेट कायद्याला आव्हान देऊ लागले आहेत.  गेल्या काही दिवसात सत्ताधारी नेत्यांकडून कायदा हातात घेण्याची अनेक उदाहरणं घडली आहेत. आमदार गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad)  यांनी पोलीस ठाण्यात केलेल्या गोळीबारानंतर विरोधकांनी या प्रकरणांची पुन्हा एकदा उजळणी केलीय. वाचा सविस्तर...

Gautami Patil : गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात हुल्लडबाजी; तरुणाच्या डोक्यात लागला दगड

Gautami Patil : नृत्यांगणा गौतमी पाटीलचा (Gautami Patil) कार्यक्रम म्हटला की राडा, गोंधळ या गोष्टी आल्याच. नुकतचं उदगीर (Udgir) येथे गौतमीचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात पुन्हा एकदा गोंधळ झालेला पाहायला मिळाला. कार्यक्रम सुरू असताना हुल्लडबाज तरुणांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. नेत्यांचे बॅनर फाडत तरुण टॉवरवर चढले होते. दरम्यान एका तरुणाच्या डोक्यात दगड लागला. गौतमीच्या कार्यक्रमाला कॅबिनेट मंत्री संजय बनसोडे, माजी आमदार सुधाकर भालेराव आणि भाजपा जिल्हाध्यक्षांनी हजेरी लावली होती. वाचा सविस्तर...

PM Suryoday Yojana : सोलर पॅनल योजनेद्वारे 18 हजार कोटी रुपयांची बचत, मोठ्या प्रमाणात नोकऱ्या उपलब्ध होणार

PM Suryodaya Scheme : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendr Modi) यांनी देशवासियांना दिलासा देत सौर पॅनेल (Solar Panel) बसवण्यासाठी PM सूर्योदय योजना (PM Suryoday Yojana) जाहीर केली होती. पंतप्रधान सूर्योदय योजना म्हणजेच सोलर पॅनल योजनेद्वारे जनतेची 18 हजार कोटी रुपयांची बचत होणार आहेत. त्यासोबत मोठ्या प्रमाणात नोकऱ्यादेखील उपलब्ध होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या पीएम सूर्योदय योजनेबाात अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी अंतरिम अर्थसंकल्प 2024 मध्ये अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. पंतप्रधान सूर्योदय योजनेशी संबंधित अनेक महत्त्वाच्या गोष्टींची माहिती अर्थमंत्र्यांनी दिली आहे. वाचा सविस्तर...

IREDA Multibagger Share : सरकारच्या निर्णयामुळे गुंतवणूकदारांची चांदी! 'या' निर्णयामुळे IREDA चे शेअर्स दोन महिन्यांत 32 रुपयांवरून 195 रुपयांवर

IREDA Multibagger Stock : सरकारच्या निर्णयामुळे काही शेअर मार्केट (Share Market) गुंतवणूकदारांची चांदी झाली आहे. इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड (IREDA) या भारत सरकारच्या कंपनीच्या गुंतवणूकदारांची दररोज चांदी होत आहे. सरकारच्या एका निर्णयामुळे IREDA चे शेअर्स दोन महिन्यांत 32 रुपयांवरून 195 रुपयांवर पोहोचले आहेत. आयआरईडीए (IREDA) चा आयपीओ (IPO) नोव्हेंबर 2023 मध्ये आला होता. ज्या गुंतवणूकदारांना IPO वाटप करण्यात आले, त्यांना 32 रुपये दराने शेअर्स मिळाले आणि आता हा शेअर 195 रुपयांवर पोहोचला आहे. वाचा सविस्तर...

Anushka Sharma Virat Kohli : अनुष्का शर्मा - विराट कोहली दुसऱ्यांदा आई-बाबा होणार! माजी खेळाडूने दिली गोड बातमी

Virat Kohli Anushka Sharma Second Child : बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) काही दिवसांपासून मनोरंजनसृष्टीपासून दूर आहे. अनुष्का सध्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. अनुष्का शर्मा आणि क्रिकेटर विराट कोहली (Virat Kohli) दुसऱ्यांदा आई-बाबा होणार आहेत. माजी खेळाडू एबी डिव्हिलियर्सने (AB de Villiers) गोड बातमी सांगितली आहे. वाचा सविस्तर...

4th february In History : तानाजी मालुसरे यांचा मृत्यू, गांधीजींना असहकार आंदोलन मागे घेतले, पंडित भीमसेन जोशी यांचा जन्म, आज इतिहासात  

आजच्या दिवशी इतिहासात अनेक महत्त्वपूर्ण घटना घडल्या आहेत. आजच्याच दिवशी सिंहगडावर तानाजी मालुसरे यांनी जीवाची बाजी लावली आणि अखेरचा श्वास घेतला. तसेच आजच्या दिवशी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असलेल्या फेसबुकची स्थापना करण्यात आली होती.  चौरी चौरा येथे झालेल्या हिंसक आंदोलनानंतर महात्मा गांधींनी ३ दिवस उपोषण करुन असहकार आंदोलन मागे घेतले.चलो दिल्ली चा नारा देत आझाद हिन्द सेनेचे दिल्लीकडे कूच केली. आजचा दिवस विश्व कर्करोग म्हणून साजरा केला जातो. आजच्या दिवशी इतिहासात कोणत्या महत्त्वाच्या घडामोडी घडल्या याविषयी वाचा सविस्तर...

Horoscope Today 4 February 2024 : आजचा रविवार खास! 12 राशीच्या लोकांसाठी दिवस कसा राहील? आजचे राशीभविष्य जाणून घ्या

Horoscope Today 4 February 2024 : राशीभविष्यानुसार, आज म्हणजेच 4 फेब्रुवारी 2024, रविवार हा महत्त्वाचा दिवस आहे. ग्रहांच्या चालीनुसार, वृषभ राशीच्या लोकांना आज कामाच्या ठिकाणी थोडा थकवा जाणवू शकतो, ज्यामुळे तुम्ही थोडे अस्वस्थ असाल, आज सिंह राशीचे लोक विनाकारण गोंधळात अडकू शकतात, ज्यातून त्यांना त्रास सहन करावा लागेल. सर्व राशीच्या लोकांसाठी रविवार कसा राहील? सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य वाचा सविस्तर...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 26 June 2024Nagesh Patil Ashtikar Lok Sabha Oath : बाळासाहेबांना स्मरुन शपथ, अध्यक्षांनी रोखलंRamesh Kir on Eknath Shinde : मी कोण हे मुख्यमंत्र्यांना हळूहळू कळेल, रमेश किर यांचा इशाराNilesh Lanke Oath : इंग्रजीत शपथ, निलेश लंकेंनी करुन दाखवलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
Amol Mitkari : प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
Pune : पुण्यात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही तरूणांची ओळख पटली, मुंबईचा तरूण आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर
पुण्यात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही तरूणांची ओळख पटली, मुंबईचा तरूण आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर
''बेट्या, तुझा टांगा उलटवणार'', मनोज जरांगेंचा भुजबळांना इशारा; मराठा-ओबीसी समाजाला महत्त्वाचं आवाहन
''बेट्या, तुझा टांगा उलटवणार'', मनोज जरांगेंचा भुजबळांना इशारा; मराठा-ओबीसी समाजाला महत्त्वाचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जून 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जून 2024 | मंगळवार
Embed widget