Anushka Sharma Virat Kohli : अनुष्का शर्मा - विराट कोहली दुसऱ्यांदा आई-बाबा होणार! माजी खेळाडूने दिली गोड बातमी
Anushka Sharma Pregnancy News : बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटर विराट कोहली (Virat Kohli) दुसऱ्यांदा आई-बाबा होणार आहेत.
Virat Kohli Anushka Sharma Second Child : बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) काही दिवसांपासून मनोरंजनसृष्टीपासून दूर आहे. अनुष्का सध्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. अनुष्का शर्मा आणि क्रिकेटर विराट कोहली (Virat Kohli) दुसऱ्यांदा आई-बाबा होणार आहेत. माजी खेळाडू एबी डिव्हिलियर्सने (AB de Villiers) गोड बातमी सांगितली आहे.
अनुष्का शर्मा दुसऱ्यांदा आई होणार असल्याची चर्चा काही दिवसांपासून सुरू आहे. अद्याप अभिनेत्रीने किंवा विराट कोहलीने यासंदर्भात अधिकृत माहिती दिलेली नाही. पण विराटचा मित्र आणि दक्षिण आफ्रिकाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू एबी डिव्हिलियर्सने अनिष्काच्या प्रेग्नंसीबाबत भाष्य केलं आहे.
एबी डिव्हिलियर्सचा व्हिडीओ व्हायरल (AB de Villiers Video Viral)
दक्षिण आफ्रिका क्रिकेट टीमचा माजी कर्णधार एबी डिव्हिलियर्सचा (AB Villiers) एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एबी डिव्हिलियर्स म्हणाला की, विराट कोहली सध्या त्याच्या कुटुंबियांसोबत वेळ घालवत आहे. अनुष्का आणि विराट दुसऱ्यांदा आई-बाबा होणार आहेत. विराटसाठी कुटुंब खूप महत्त्वाचं आहे. त्याने योग्य निर्णय घेतला आहे". विराट आणि एबी डिव्हिलियर्स एकमेकांचे चांगले मित्र आहेत.
Ab De Villiers said - "Virat Kohli and Anushka Sharma expecting their second child, so Virat Kohli is spending his time with his family". (On ABD YT)#viratkohli #anushkasharma pic.twitter.com/XDqx76ZfeX
— 𝙒𝙧𝙤𝙜𝙣🥂 (@wrogn_edits) February 3, 2024
अनुष्का शर्मा दुसऱ्यांदा प्रेग्नंट असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. विराट-अनुष्काच्या घरी दुसऱ्यांदा पाळणा हलणार आहे. अनुष्का-विराट 2017 मध्ये लग्नबंधनात अडकले होते. 2021 मध्ये अनुष्काने वामिकाला जन्म दिला. नुकताच त्यांनी त्यांच्या लाडक्या लेकीचा तिसरा वाढदिवस साजरा केला आहे. अनुष्काचा 'चकदा एक्सप्रेस' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात ती भारतीय महिला क्रिकेटर झूलन गोस्वामी यांच्या भूमिकेत झळकणार आहे.
विरुष्काला काही दिवसांपूर्वी एका मॅटर्निटी क्लिनिकबाहेर स्पॉट करण्यात आलं होतं. त्यावेळी पापराझींकडे त्यांनी फोटो लीक न करण्याची विनंती केली होती. तसेच आम्ही लवकरच यासंदर्भात घोषणा करू असं ते म्हणाले होते. त्यानंतर विरुष्काच्या घरी पाळणा हालणार असल्याच्या चर्चांना सुरुवात झाली.
Virushka in Bangalore 🧿💘 pic.twitter.com/feLpF35i09
— Alaska (@alaskawhines) November 9, 2023
संबंधित बातम्या