(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Gautami Patil : गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात हुल्लडबाजी; तरुणाच्या डोक्यात लागला दगड
Gautami Patil : गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात पुन्हा एकदा गोंधळ पाहायला मिळाला. कार्यक्रम सुरू असताना हुल्लडबाज तरुणांनी गोंधळ घालायला सुरुवात केली.
Gautami Patil : नृत्यांगणा गौतमी पाटीलचा (Gautami Patil) कार्यक्रम म्हटला की राडा, गोंधळ या गोष्टी आल्याच. नुकतचं उदगीर (Udgir) येथे गौतमीचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात पुन्हा एकदा गोंधळ झालेला पाहायला मिळाला. कार्यक्रम सुरू असताना हुल्लडबाज तरुणांनी गोंधळ घालायला सुरुवात केली.
गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात हुल्लडबाजी
गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात हुल्लडबाजी पाहायला मिळाली. नेत्यांचे बॅनर फाडत तरुण टॉवरवर चढले होते. दरम्यान एका तरुणाच्या डोक्यात दगड लागला. गौतमीच्या कार्यक्रमाला कॅबिनेट मंत्री संजय बनसोडे, माजी आमदार सुधाकर भालेराव आणि भाजपा जिल्हाध्यक्षांनी हजेरी लावली होती.
उदगीर येथील गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात बेधुंद तरुणांनी तुफान राडा केला. मागे बसलेल्या प्रेक्षकाना कार्यक्रम दिसत नसल्यामुळे मागून मारलेल्या दगडात एक तरुण जबर जखमी झाला आहे. जखमी अवस्थेत त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. औषध उपचारानंतर तरुणाच्या प्रकृतीत सुधारणा झाली.
उदगीर येथे गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला कॅबिनेट मंत्री संजय बनसोडे (Sanjay Bansode) तसेच उदगीरचे माजी आमदार सुधाकर भालेराव (Sudhakar Bhalerao) आणि भाजपाचे जिल्हा अध्यक्ष दिलीपराव देशमुख (Diliprao Deshmukh) यांच्या अनेक राजकारणी लोकांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाची जय्यत तयारी करण्यात आली होती. कार्यक्रम स्थळी नेत्यांची मोठी बॅनर लावण्यात आली होती.
गौतमीचा कार्यक्रम सुरू झाल्यानंतर तरुणांनी गर्दी केली. कार्यक्रम व्यवस्थित पाहता यावा यासाठी तरुणांनी नेत्यांची बॅनर फाडून टॉवरवर उभं टाकणं पसंत केलं. यासाठी नेत्यांचे बॅनर फाडत तरुण टॉवरवर चढले होते. आयोजकांनी अनेक वेळेस तरुणांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला मात्र सर्व व्यर्थ होत होतं.
गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात गोंधळ
सबसे कातील गौतमी पाटील यांच्या दिलखेच नृत्यावर तरुणाई बेधुंद होऊन नाचत होती. यात काही तरुणांच्या नृत्यामुळे पाठीमागील लोकांना दिसत नव्हतं. यातून काही खोडसाळ तरुणांनी समोरील तरुणावर दगड मारले. या प्रकारामुळे एका तरुणाच्या डोक्यात मागील बाजूस दगड लागल्याने तो जबर जखमी झाला. त्याला तात्काळ दवाखान्यात नेऊन उपचार करण्यात आले. औषध उपचारानंतर तरुणाच्या प्रकृतीत सुधारणा दिसून आली. एकाच वेळी अनेक ठिकाणी गोंधळ सुरू असल्याने नेमकं काय झालं हे कोणालाही लक्षात आलं नाही. प्रचंड गोंधळातच कार्यक्रम पार पडला.
भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाच्या तालुका अध्यक्षांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमात भाजप नेत्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. उदगीर आणि आसपासच्या परिसरातून आलेल्या प्रेक्षकांमध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती. काही तरुणांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला असता त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि काही वेळानंतर सोडून दिलं.
संबंधित बातम्या