Morning Headlines 31st October: देश विदेशातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर, वाचा Morning News
देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...
देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...
"आता 200 नाही, 400 कोटी द्या, नाहीतर..."; मुकेश अंबानींना तीन दिवसांत तिसऱ्यांदा धमकीचा ईमेल
Mukesh Ambani Threat: भारतातील उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांना येणाऱ्या धमकीच्या ईमेलचं सत्र काही थांबण्याचं नाव घेत नाहीय. मुकेश अंबानी यांना तीन दिवसांत तिसऱ्यांदा धमकीचा ईमेल आला आहे. ईमेलमधून पुन्हा एकदा मुकेश अंबानींना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या ईमेमध्ये अज्ञातांनी खंडणीची रक्कम वाढवून मागितली आहे. आधीच्या ईमेलमध्ये धमकी देणाऱ्यांनी 200 कोटींची मागणी केली होती. मात्र, त्यानंतर खंडणीची रक्कम 400 कोटींपर्यंत वाढवून मागण्यात आली आहे. वाचा सविस्तर
Weather Update : गारठा वाढला! काही भागात उन्हाचे चटके, तर 'या' भागात पावसाचा अंदाज
Cold Weather : राज्यात 'ऑक्टोबर हिट'चा (Heat) तडाखा कमी होत असून पारा (Cool Temperature) घसरताना दिसत आहे. अनेक भागात उन्हाची तीव्रता कमी होत असून थंडी वाढू लागली (Cold Weather) आहे. असं असलं तरी काही भागात उन्हाची झळ बसत आहे. महाराष्ट्रात किनारी भागात तापमान वाढणार आहे. मध्य आणि पश्चिम महाराष्ट्रात थंडीला सुरुवात झाली आहे. मुंबई आणि ठाण्यात सकाळी हवेत गारवा जाणवत आहे, पण दुपारी मात्र उन्हाचा चटका बसत आहे, तापमान 35-36 डिग्री सेल्सियसच्या आसपास राहण्याचा अंदाज आहे. मुंबईकरांना थंडीचा आनंद घेण्यासाठी डिसेंबरपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. वाचा सविस्तर
PM Modi in Gujrat : पंतप्रधान मोदी गुजरात दौऱ्यावर, स्टॅच्यू ऑफ यूनिटीला देणार भेट; विविध योजनांचं उद्घाटन
PM Modi Gujrat Tour : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) सध्या दोन दिवसीय गुजरात दौऱ्यावर (Gujrat Visit) आहेत. आज पंतप्रधान मोदी सरदार वल्लभभाई पटेल (Sardar Vallabhbhai Patel) यांच्या 148 व्या जयंतीनिमित्त स्टॅच्यू ऑफ युनिटी (Statue Of Unity) येथे राष्ट्रीय एकता दिन (National Unity Day) सोहळ्यात सहभागी होतील. लोहपुरुष सरदार वल्लभ भाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आज पंतप्रधान मोदी केवाडिया येथे स्टॅच्यू ऑफ यूनिटीला भेट देत अभिवादन करतील आणि पुष्पांजली अर्पण करतील. वाचा सविस्तर
Onion Price: कांद्याच्या किमतींत दुप्पट वाढ, केंद्र सरकारकडून आणखी एक महत्त्वाचा निर्णय, दर घटणार?
Onion Price Latest Update: काही दिवसांपूर्वी देशभरात टॉमेटोनं (Tomato Price Hike) सर्वसामान्यांच्या खिशाला चिमटा काढलेला. आता आधाचीपासूनच महागाईमुळे पिचलेल्या सर्वसामान्यांना कांदा (Onion Price Hike) रडवण्याच्या तयारीत आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये कांद्याचे भाव झपाट्यानं वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. महाराष्ट्र (Maharashtra), दिल्ली एनसीआरसह अनेक शहरांमध्ये कांदा 80 रुपये किलोच्या आसपास विकला जात आहे. गेल्या आठवड्यापासून कांद्याच्या दरात दुपटीनं वाढ झाली आहे. जिथे काही दिवसांपूर्वी कांदा 30 ते 35 रुपये किलोनं विकला जात होता. तिथे आता 75 ते 80 रुपये किलोनं विकला जात आहे. वाचा सविस्तर
Aadhaar Data Leak : मोठी बातमी! 81.5 कोटी भारतीयांची आधार आणि पासपोर्ट संबंधित माहिती चोरीला
Aadhaar Data Cyber Attack : भारतीयांची आधार कार्ड (Aadhaar Card) आणि पासपोर्ट (Passport) संबंधित माहिती चोरीला (Data Leak) गेल्याची मोठी माहिती समोर आली आहे. एका अमेरिकन फर्मने डेटा लीक झाल्याचा दावा केल्याने खळबळ माजली आहे. डार्क वेबवर आधार डेटा लीक झाल्याची मोठी माहिती समोर आली आहे. डार्क वेबवर 81.5 कोटी भारतीयांचा आधार कार्ड आणि पासपोर्ट संबंधित डेटा लीक झाल्याचा दावा अमेरिकन कंपनीने केला आहे. बिझनेस स्टँडर्डच्या रिपोर्टनुसार, अमेरिकन कंपनी रिसिक्युरिटीचा दावा आहे की, 81.5 कोटी भारतीयांचा आधार आणि पासपोर्ट संबंधित डेटा डार्क वेबवर लीक झाला आहे. वाचा सविस्तर
APY Scheme: उतारवयात पैशांची चिंता मिटेल; उत्तम सरकारी पेन्शन स्किम, दररोज फक्त 7 रुपये गुंतवा!
Atal Pension Yojana: वृद्धापकाळात पेन्शन (Pension) हा मोठा आधार असतो. पण पेन्शनचा आधार तेव्हाच मिळतो, जेव्हा तुम्ही त्यासाठी योग्य तिथे आणि योग्य वेळी गुंतवणूक (Invest) कराल. अनेकदा लोकांना वृद्धापकाळाची चिंता नसते, विशेषत: गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून. मात्र याच चुकीमुळे वृद्धापकाळात लोकांना पश्चाताप करावा लागतो. त्यामुळे उतारवयातील आयुष्य सुखकर करण्यासाठी योग्य पर्याय निवडणं तितकंच आवश्यक आहे. वाचा सविस्तर
Israel Hamas War : हमासकडून बंदी बनवलेल्या महिलांचा व्हिडीओ जारी, इस्रायल-हमास युद्धात 9500 हून अधिक जणांचा मृत्यू
Israel Hamas War : इस्रायल आणि हमास (Israel Palestine War) यांच्यातील युद्धाचा आज 31 वा दिवस आहे. हा संघर्ष अद्यापही सुरुच आहे. इस्रायल (Israel) कडून गाझा पट्टी (Gaza Strip) त तीव्र हल्ले करण्यात येत आहेत. तर दुसरीकडे हमासने इस्रायलच्या नागरिकांना बंदी बनवलं आहे. अलजजिराच्या रिपोर्टनुसार, हमासने ओलिस ठेवलेल्या तीन महिलांचा व्हिडीओ जारी केला आहे. हमासने सुटकेसाठी आवाहन करणाऱ्या ओलिस ठेवलेल्या नागरिकांचा व्हिडीओ जारी केला आहे. 7 ऑक्टोबर रोजी हमासने इस्रायलवर केलेल्या हल्ल्यादरम्यान इस्रायली नागरिकांना बंदी बनवलं होतं. वाचा सविस्तर
Lionel Messi Wins Ballon d’Or: जग्गजेता मेस्सी! फुटबॉल जगतात लियोनेल मेस्सीच सुपरस्टार; आठव्यांदा पटकावला बॅलन डी'ओर अवॉर्ड
Lionel Messi Wins Ballon d’Or 2023 Award: प्रसिद्ध फुटबॉलपटू (Football) आणि जगभरातील चाहत्यांच्या गळ्यातील ताईत असणाऱ्या विश्वविक्रमी लियोनेल मेस्सी (Lionel Messi) यानं आणखी एक विक्रम आपल्या नावे केला आहे. मेस्सीनं विक्रमी आठ वेळा फुटबॉल जगतातील बॅलन डी'ओर अवॉर्ड (Ballon d’Or Award 2023) पटकावला आहे. मेस्सीच्या या विक्रमामुळे जगभरातील चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला असून मेस्सीवर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. वाचा सविस्तर
31 October In History : 'लोहपुरुष' सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्म, इंदिरा गांधी यांची हत्या; आज इतिहासात....
31 October In History : आजचा दिवस भारतासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. भारताचा इतिहास, राजकारणावर आपल्या कार्याने ठसा उमटवणाऱ्या दोन महान नेत्यांचा आजच्या दिवसाशी संबंध आहे. भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील नेते, स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्मदिन आहे. तर, 'आर्यन लेडी' इंदिरा गांधी यांची आजच्याच दिवशी हत्या झाली होती. वाचा सविस्तर
Horoscope Today 31 October 2023 : मंगळवारचा दिवस खास! मेष ते मीन राशीसाठी कसा असेल? आजचे राशीभविष्य जाणून घ्या
Horoscope Today 31 October 2023 : राशीभविष्यानुसार आज म्हणजेच 31 ऑक्टोबर 2023 मंगळवार हा महत्त्वाचा दिवस आहे. ग्रहांच्या चालीनुसार वृषभ राशीच्या लोकांनी आज आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवावे. तुमचे एकमेकांशी असलेले संबंध बिघडू शकतात, वृश्चिक राशीच्या लोकांनी आज त्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. तुमच्या पोटाशी संबंधित समस्या तुम्हाला त्रास देऊ शकतात. सर्व राशीच्या लोकांसाठी मंगळवार कसा राहील? सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य जाणून घेऊया... वाचा सविस्तर