search
×

APY Scheme: उतारवयात पैशांची चिंता मिटेल; उत्तम सरकारी पेन्शन स्किम, दररोज फक्त 7 रुपये गुंतवा!

जर तुम्ही तरुण असाल तर दर महिन्याला थोडी थोडी रक्कम जमा करून तुम्ही तुमचं वृद्धापकाळ आर्थिकदृष्ट्या सुखकर करू शकता. यानंतर, तुम्हाला दर महिन्याला पेन्शन म्हणून निश्चित रक्कम मिळत राहील. आणि उतारवयात दैनंदिन खर्चासाठी तुम्हाला कोणावरही अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही. 

FOLLOW US: 
Share:

Atal Pension Yojana: वृद्धापकाळात पेन्शन (Pension) हा मोठा आधार असतो. पण पेन्शनचा आधार तेव्हाच मिळतो, जेव्हा तुम्ही त्यासाठी योग्य तिथे आणि योग्य वेळी गुंतवणूक (Invest) कराल. अनेकदा लोकांना वृद्धापकाळाची चिंता नसते, विशेषत: गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून. मात्र याच चुकीमुळे वृद्धापकाळात लोकांना पश्चाताप करावा लागतो. त्यामुळे उतारवयातील आयुष्य सुखकर करण्यासाठी योग्य पर्याय निवडणं तितकंच आवश्यक आहे. जाण

जर तुम्ही तरुण असाल तर दर महिन्याला थोडी थोडी रक्कम जमा करून तुम्ही तुमचं वृद्धापकाळ आर्थिकदृष्ट्या सुखकर करू शकता. यानंतर, तुम्हाला दर महिन्याला पेन्शन म्हणून निश्चित रक्कम मिळत राहील. आणि उतारवयात दैनंदिन खर्चासाठी तुम्हाला कोणावरही अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही. 

उतारवयासाठी योग्य ठिकाणी गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर अटल पेन्शन योजना (Atal Pension Yojana)  योग्य पर्याय ठरेल. ही सरकारी पेन्शन योजना (Sarkari Pension Scheme) आहे. त्यामुळे ही योजना अत्यंत सुरक्षित आणि या योजनेत तुम्हाला गॅरेंटेड रिटर्न मिळतात. गुंतवणुकीच्या दृष्टीकोनातून तुम्ही दर महिन्याला एक हजार रुपयांपासून 5 हजार रुपयांपर्यंत पेन्शन मिळवू शकता. 

एवढंच नाहीतर अटल पेन्शन योजनेत सहभागी होऊन पती-पत्नी दोघेही दरमहा 10 हजार रुपयांपर्यंत पेन्शन घेऊ शकतात. भारतातील कोणताही नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतो. तुमचं वय 40 वर्षांपेक्षा कमी असल्यास, अटल पेन्शन योजनेत त्वरित खातं उघडा. कारण 40 वर्षांवरील लोक या योजनेत सहभागी होऊ शकत नाहीत.

Atal Pension Yojana Age: या योजनेत सामील होण्याचं वय 18 ते 40 वर्ष निश्चित करण्यात आलेलं आहे. या योजनेंतर्गत पेन्शन मिळवण्यासाठी किमान 20 वर्ष गुंतवणूक करावी लागेल. तुम्ही वयाची 60 वर्ष पूर्ण करताच तुम्हाला दरमहा पेन्शनची रक्कम मिळू लागेल.

किती मिळणार पेन्शन? 

जर तुमचं वय 18 वर्ष आहे, तर या योजनेत दरमाहा 210 रुपये म्हणजेच, दररोज 7 रुपये गुंतवून वृद्धापकाळात पाच हजार रुपये महिना पेन्शन मिळवू शकता. तसेच, जर वयाच्या साठाव्या वर्षानंतर एक हजार रुपये महिना पेन्शन हवी असेल, तर त्यासाठी वयाच्या अठराव्या वर्षी दरमाहा 42 रुपये जमा करावे लागतील. 

जर गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे वयाच्या 60 वर्षे होण्यापूर्वीच काढायचे असतील तर काही विशिष्ट परिस्थितीत ते शक्य आहे. जर एखाद्या महिलेच्या पतीचा 60 वर्षांपूर्वी मृत्यू झाला तर पत्नीला पेन्शनची सुविधा मिळेल. पती आणि पत्नी दोघांच्या मृत्यूनंतर, नॉमिनीला संपूर्ण पैसे परत मिळतील.

Atal Pension Yojana Account Open Process: अटल पेन्शन योजनेत सामील होण्यासाठी, तुमचे बँक (Bank) किंवा पोस्ट ऑफिसमध्ये (Post Office) खातं असणं आवश्यक आहे. आधार कार्ड  (Aadhaar Card)  आणि अॅक्टिव्ह मोबाईल क्रमांक (Active Mobile Number) आवश्यक असेल. या योजनेत मासिक, त्रैमासिक आणि सहामाही पैसे जमा करण्याची सुविधा उपलब्ध आहे. तसेच, ऑटो डेबिट सुविधा उपलब्ध आहे. म्हणजेच, तुमच्या खात्यातून पैसे आपोआप कापले जातील.

Atal Pension Yojana Tax Saving: अटल पेन्शन योजनेत गुंतवणूक करून तुम्ही पेन्शन मिळण्यासोबतच करही वाचवू शकता. या योजनेत गुंतवणूक करून तुम्ही 1.5 लाख रुपयांपर्यंत कर वाचवू शकता. ही सूट आयकर कलम 80C अंतर्गत उपलब्ध आहे. मोदी सरकारनं मे 2015 मध्ये अटल पेन्शन योजना सुरू केली.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Post Office Scheme : 114 महिने पैसे गुंतवा अन् दुप्पट मिळवा; पोस्टाची धमाकेदार योजना, सोबत आकर्षक परतावाही

Published at : 31 Oct 2023 07:44 AM (IST) Tags: pension invest Atal Pension Yojana central government pension rule Yojana government pension Yojanapension

आणखी महत्वाच्या बातम्या

इन्स्टंट लोन ॲपची 5 वैशिष्ट्ये, जी आपत्कालीन परिस्थितीत ठरतात आदर्श निवड

इन्स्टंट लोन ॲपची 5 वैशिष्ट्ये, जी आपत्कालीन परिस्थितीत ठरतात आदर्श निवड

1 टन एसी निवडताना विचारात घेण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स

1 टन एसी निवडताना विचारात घेण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स

Salman Khan : कधी मध्येच अभिनेत्रीचं लग्न तर कधी दिग्दर्शकाचा मृत्यू; सलमानचे 'हे' पाच चित्रपट रिलीज झालेच नाहीत

Salman Khan : कधी मध्येच अभिनेत्रीचं लग्न तर कधी दिग्दर्शकाचा मृत्यू; सलमानचे 'हे' पाच चित्रपट रिलीज झालेच नाहीत

बजाज फायनान्सच्या गोल्ड लोन व्याजदराचा प्रभाव समजून घेणे

बजाज फायनान्सच्या गोल्ड लोन व्याजदराचा प्रभाव समजून घेणे

Gold Price Today: सोनं पुन्हा कडाडलं, चांदीही वधारली; सातत्यानं का वाढताहेत दर?

Gold Price Today: सोनं पुन्हा कडाडलं, चांदीही वधारली; सातत्यानं का वाढताहेत दर?

टॉप न्यूज़

आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो

आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो

कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम

कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम

पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार

पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार

और एक फायनल...एक कप की ओर

और एक फायनल...एक कप की ओर