Morning Headlines 31st August : मॉर्निंग न्यूजमध्ये वाचा देश विदेशातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर
देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील
देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील
मुंबईत 28 विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीची बैठक, तर मुख्यमंत्र्यांनीही महायुतीची बैठक बोलावली
INDIA vs Mahayuti : विरोधकांच्या इंडिया आघाडीची (INDIA) आज 31 ऑगस्ट आणि उद्या 1 सप्टेंबर रोजी मुंबईत बैठक होणार आहे. तर या बैठकीला प्रत्युत्तर म्हणून महायुतीचीही (Mahayuti) मुंबईत आज आणि उद्या बैठक आयोजित करण्यात आली आहे. इंडिया आघाडीची बैठक विमानतळाजवळील 'ग्रॅण्ड हयात' या पंचतारांकित हॉटेलामध्ये होणार आहे. तर महायुतीची बैठक वरळीमध्ये पार पडणार आहे. वाचा सविस्तर
दोनदा पंतप्रधान होण्याची संधी शरद पवारांकडे होती, पण आता त्यांनी निवृत्त व्हावं : सायरस पुनावाला यांचा सल्ला
मुंबई : सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे व्यस्थापकीय संचालक सायरस पुनावाला यांनी बुधवारी (30 ऑगस्ट) रोजी एका कार्यक्रमात राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि त्यांचे जिवलग मित्र शरद पवार यांना एक मोलाचा सल्ला दिला आहे. त्यांनी बोलताना म्हटलं आहे की, "शरद पवार यांचं वय झालं आहे, त्यांनी आता निवृत्त व्हावं." वाचा सविस्तर
इथेनॉलच्या दरात प्रतिलिटर तीन रुपये 71 पैशांची वाढ, 15 दिवसात दुसऱ्यांदा दरवाढ
Ethanol Price : केंद्र सरकारने 2025 पर्यंत पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल मिसळण्याचे लक्ष्य ठेवले आहे. त्यादृष्टीने सरकारचे प्रयत्न देखील सुरु आहेत. दरम्यान, येणाऱ्या नवीन 2024 या वर्षात 12 टक्के इथेनॉल मिश्रित पेट्रोल मिळणार मिळणार आहे. 2023 पर्यंत पेट्रोलमध्ये 12 टक्के इथेनॉल मिश्रित करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले होते. पण सध्या 11.77 टक्के इथेनॉल मिसळले जाते. पंधरा दिवसात दुसऱ्यांदा ही वाढ करण्यात आली आहे. वाचा सविस्तर
तेल कंपन्यांकडून आजचे दर जाहीर, मुंबईत एक लिटर पेट्रोलची किंमत काय?
Petrol Diesel Rate on 31st August 2023: कच्च्या तेलाच्या दरांत पुन्हा एकदा वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. अमेरिकेत पुरवठ्यापेक्षा कच्च्या तेलाचा जास्त वापर होत असल्याचं पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे चिनी अर्थव्यवस्थेबाबत जागतिक चिंताही काहीशी कमी झाली आहे. त्यामुळे बुधवारी कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये पुन्हा एकदा वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. यापूर्वी मंगळवारी कच्च्या तेलाच्या किमतींत एक डॉलरपेक्षा जास्त वाढ पाहायला मिळत होती. याच पार्श्वभूमीवर देशातील दरांबाबत बोलायचं झालं तर, आज देशातील पेट्रोल-डिझेलच्या दरांत कोणताही बदल झालेला नाही. आज देशातील पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर आहेत. वाचा सविस्तर
'राष्ट्रीय पोषण सप्ताह' नेमका का साजरा केला जातो? वाचा यामागचा इतिहास आणि महत्त्व
National Nutrition Week 2023 : भारतात दरवर्षी 1 ते 7 सप्टेंबर दरम्यान पोषण सप्ताह साजरा केला जातो. हा सप्ताह साजरा करण्यामागचा उद्देश हा आहे की, लोकांनी त्यांच्या आरोग्याबाबत आणि आहाराबाबत जागरूक राहावे. पोषण ही मूलभूत गरज आहे आणि निरोगी जीवन जगण्यासाठी देखील खूप महत्वाचे आहे. लोकांमध्ये आरोग्यविषयक जागरूकता नसल्यामुळे, रुग्णांची संख्या आरोग्य सुविधांपेक्षा जास्त आहे. आजची बिघडलेली जीवनशैली आणि चुकीचे खाणे हे याचे प्रमुख कारण आहे. निरोगी राहण्यासाठी पौष्टिक आहार घेणे आवश्यक आहे. पोषणाच्या पूर्ततेबद्दल लोकांना जागरूक करण्यासाठी, भारत सरकारने राष्ट्रीय पोषण सप्ताह साजरा करण्यास सुरुवात केली होती. वाचा सविस्तर
कर्क, कन्या, धनुसह 'या' राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आर्थिक भरभराटीचा; जाणून घ्या सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य
Horoscope Today 31 August 2023 : आज गुरुवार हा महत्त्वाचा दिवस आहे. ग्रहांच्या चालीनुसार आज मेष राशीच्या लोकांच्या घरातील वडीलधारी मंडळी तुमच्या भविष्याबाबत थोडे चिंतेत असतील. तर, वृश्चिक राशीच्या लोकांना धावपळीचा मोठा फायदा होणार आहे. एकूणच मेष ते मीन राशीसाठी आजचा दिवस नेमका कसा राहील? काय सांगतात तुमच्या नशिबाचे भाग्यवान तारे? जाणून घ्या आजचं राशीभविष्य. वाचा सविस्तर
विरोधकांच्या 'इंडिया' आघाडीची मुंबईत बैठक, प्रो-गोविंदा स्पर्धेचा थरार; आज दिवसभरात...
31st August Headlines: आज दिवसभरात बऱ्याच महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत. केंद्रातील सत्ताधारी भाजपच्या पराभवासाठी देशपातळीवरील विरोधी पक्षांनी एकत्रित मोट बांधत 'इंडिया' आघाडीची घोषणा केली आहे, या आघाडीची आज मुंबईत बैठक होणार आहे. तर याच पार्श्वभूमीवर महायुतीची देखील बैठक होणार आहे. मुख्यमंत्री शिंदेंनी देखील महायुतीतील सर्व पक्षांची तातडीची बैठक बोलावली आहे. यासह आजच्या इतर घडामोडींवर देखील नजर टाकूया. वाचा सविस्तर
शिक्षण तज्ज्ञ मारिया माँटेसॉरी, कवयित्री अमृता प्रीतम यांचा जन्म, प्रणव मुखर्जी यांचे निधन; आज इतिहासात...
31st August In History : इतिहासात प्रत्येक दिवसाचे महत्त्व असते. आजचा दिवसही इतिहासाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. आजच्या दिवशी अनेक घडामोडी घडल्या आहेत. माँटेसॉरी नावाने भारतात असलेली शिक्षण पद्धत ज्यांच्या नावावरून आल्या त्या शिक्षण तज्ज्ञ मारिया माँटेसॉरी यांचा जन्म आजच्या दिवशी झाला. प्रसिद्ध कवयित्री अमृता प्रीतम यांचा जन्मदिनही आज आहे. भारताचे 13 वे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे निधन आजच्या दिवशी झाले. वाचा सविस्तर