एक्स्प्लोर

Ethanol Price : इथेनॅालच्या दरात प्रतिलिटर तीन रुपये 71 पैशांची वाढ, 15 दिवसात दुसऱ्यांदा दरवाढ

Ethanol Price : केंद्र सरकारनं इथेनॉलच्या दरात पुन्हा वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

Ethanol Price : केंद्र सरकारनं  2025 पर्यंत पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल (Ethanol) मिसळण्याचे लक्ष्य ठेवले आहे. त्यादृष्टीनं सरकारचे प्रयत्न देखील सुरु आहेत. दरम्यान, येणाऱ्या नवीन 2024 या वर्षात 12 टक्के इथेनॉल मिश्रित पेट्रोल (petrol) मिळणार मिळणार आहे. 2023 पर्यंत पेट्रोलमध्ये 12 टक्के इथेनॉल मिश्रित करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले होते. पण सध्या 11.77 टक्के इथेनॉल मिसळले जाते. दरम्यान, तांदूळ आणि मक्यापासून बनविल्या जाणाऱ्या इथेनॉलच्या खरेदी दरात (Ethanol Price) देखील केंद्र सरकारने प्रतिलिटर तीन रुपये 71 पैशांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. पंधरा दिवसात दुसऱ्यांदा ही वाढ करण्यात आली आहे.  

तांदळापासून तयार होणारं इथेनॉल 64 रुपये लिटर तर मक्यापासूनचे 66 रुपये लिटर

दरम्यान, केंद्र सराकरनं दिलेल्या माहितीनुसार खराब तांदळापासून तयार होणारे इथेनॉल 64 रुपये लिटर आणि मक्यापासून तयार होणारे पेट्रोल 66 रुपयाने मिळणार आहे. पंधरा दिवसात दुसऱ्यांदा केंद्र सरकारनं इथेनॉलच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारनं 7 ऑगस्ट रोजीच तांदळापासूनच्या इथेनॉलला 4 रुपये 75 पैसे, तर मक्यापासूनच्या इथेनॉलला 6 रुपये 1 पैसा प्रोत्साहन म्हणून जादा देण्याची घोषणा केली होती. त्यानंतर पंधरा दिवसांतच पुन्हा दरवाढ करण्यात आली आहे. इथेनॉलची निर्मिती करणाऱ्या उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि इथेनॉल मिश्रणाचा वेग कायम ठेवण्यासाठी दरवाढ आवश्यक असल्याची माहिती देण्यात आली आहे. केंद्र सरकार आता मक्याला प्रोत्साहन देत आहे. मक्यापासून तयार केलेल्या इथेनॉलच्या किमतीत वाढ केल्यास नफा वाढण्यास हातभार लागणार आहे. .

तांदूळ आणि मक्यापासून 21.25 कोटी लिटर इथेनॉल तयार करण्याचे उद्दिष्ट 

केंद्र सरकारनं दिलेल्या माहितीनुसार, सरकारनं तांदूळ आणि मक्यापासून 21.25 कोटी लिटर इथेनॉल तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. 31 ऑक्टोबरपर्यंत चालणाऱ्या चालू हंगामात, तेल विपणन कंपन्यांना धान्य-आधारित डिस्टिलरीजमधून 21.25 कोटी लिटर इथेनॉल खरेदी करावे लागेल. मात्र आत्तापर्यंत डिस्टिलरींनी केवळ 9.52 कोटी लिटर इथेनॉलचा पुरवठा केल्याची माहिती केंद्र सरकारकडून देण्यात आली आहे. भारतीय अन्न महामंडळ इथेनॉल तयार करण्यासाठी डिस्टिलरीजना तांदूळ पुरवठा करते. मात्र जुलैमध्ये हा पुरवठा बंद करण्यात आला आहे. कारण तांदळाची भाववाढ पाहता महामंडळाने डिस्टिलरीजना पुरवठा करणे बंद केले. त्यामुळं इथेनॉलचे उत्पादन कमी झाले आहे. तांदळाच्या कमतरतेमुळे अनेक डिस्टिलरीज बंद आहेत.

महत्त्वाच्या बातम्या:

Ethanol Fueled Car: पूर्णपणे इथेनॉलवर धावणारी जगातील पहिली कार! नितीन गडकरींनी केली नवीन कार लाँच; पाहा फिचर्स

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: जंतर मंतरवर काही काळ गदारोळ, पुन्हा तणावपूर्ण शांतता
Maharashtra Live News Updates: जंतर मंतरवर काही काळ गदारोळ, पुन्हा तणावपूर्ण शांतता
Narendra Modi on CJP Protest Delhi Jantar Mantar: काँकरोच जनता पार्टीच्या आंदोलनावर नरेंद्र मोदींची पहिली प्रतिक्रिया, NEET पेपरफुटी प्रकरणावर महत्वाचे आदेश
काँकरोच जनता पार्टीच्या आंदोलनावर नरेंद्र मोदींची पहिली प्रतिक्रिया, NEET पेपरफुटी प्रकरणावर महत्वाचे आदेश
Divija Fadnavis on CJP Protest Delhi Jantar Mantar: काँकरोच जनता पार्टीच्या जंतर मंतरवरील आंदोलनावर दिविजा फडणवीस यांनी रोखठोक मत मांडलं; काय काय म्हणाल्या?
काँकरोच जनता पार्टीच्या जंतर मंतरवरील आंदोलनावर दिविजा फडणवीस यांनी रोखठोक मत मांडलं; काय काय म्हणाल्या?
CJP : 'जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' CJPचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, म्हणाले, सरकारकडे एकच पर्याय...
'जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' कॉक्रोच जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, सरकारला इशारा

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CJP : 'जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' CJPचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, म्हणाले, सरकारकडे एकच पर्याय...
'जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' कॉक्रोच जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, सरकारला इशारा
Parth Pawar : तुम्ही आज आमच्यात नाही, ही उणीव फक्त पवार कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
प्रत्येक पावलावर तुमची उणीव जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
Embed widget