एक्स्प्लोर

Petrol and Diesel Price: तेल कंपन्यांकडून आजचे दर जाहीर, तुमच्या शहरात एक लिटर पेट्रोल किती रुपयांना? जाणून घ्या

Petrol Diesel Rate: आज 512वा दिवस असून आजही देशातील पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत.

Petrol Diesel Rate on 31st August 2023: कच्च्या तेलाच्या दरांत पुन्हा एकदा वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. अमेरिकेत पुरवठ्यापेक्षा कच्च्या तेलाचा जास्त वापर होत असल्याचं पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे चिनी अर्थव्यवस्थेबाबत जागतिक चिंताही काहीशी कमी झाली आहे. त्यामुळे बुधवारी कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये पुन्हा एकदा वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. यापूर्वी मंगळवारी कच्च्या तेलाच्या किमतींत एक डॉलरपेक्षा जास्त वाढ पाहायला मिळत होती. याच पार्श्वभूमीवर देशातील दरांबाबत बोलायचं झालं तर, आज देशातील पेट्रोल-डिझेलच्या दरांत (Petrol Diesel Price) कोणताही बदल झालेला नाही. आज देशातील पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर आहेत. 

आज 512 वा दिवस आहे, जेव्हा पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत कोणताही बदल झालेला नाही. भारतीय तेल वितरण कंपन्यांनी (Government OMCs) पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये आज म्हणजेच गुरुवारीही कोणताही बदल केला नाही. 

देशांतील महानगांतील पेट्रोल-डिझेलच्या किमती काय? 

देशाच्या राजधानी दिल्लीबद्दल बोलायचं झालं तर, येथे पेट्रोलची किंमत प्रति लिटर 96.72 आणि डिझेलची किंमत 89.62 प्रति लिटर आहे. याशिवाय मुंबईत पेट्रोलचा दर प्रति लिटर 106.31 तर डिझेलचा दर 94.27 प्रति लिटर आहे. तर चेन्नईमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 102.63 तर डिझेलचा दर 94.24 प्रति लिटर आहे. तर कोलकात्यात पेट्रोल 106.03 आणि डिझेल 92.76 प्रति लिटरनं विकलं जात आहे.

राज्यात पेट्रोल-डिझेलचे दर काय? 

  • पुणे : पेट्रोल 106.22 प्रति लिटर, डिझेल 92.73 रुपये प्रति लिटर 
  • नाशिक : पेट्रोल 106.51 रुपये प्रति लिटर, डिझेल 93.02 रुपये प्रति लिटर 
  • रत्नागिरी : पेट्रोल 107.79 रुपये प्रति लिटर, डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर 
  • सिंधुदुर्ग : पेट्रोल 107.97 रुपये प्रति लिटर, डिझेल 94.45 रुपये प्रति लिटर 
  • कोल्हापूर : पेट्रोल 107.45 रुपये प्रति लिटर, डिझेल 93.94 रुपये प्रति लिटर 
  • नागपूर : पेट्रोल 106.04 रुपये प्रति लिटर, डिझेल 92.59 रुपये प्रति लिटर
  • गोंदिया : पेट्रोल 107.56 रुपये प्रति लिटर, डिझेल 94.05 रुपये प्रति लिटर

दररोज सकाळी 6 वाजता होतात दर अपडेट 

दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल होतो. नवे दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होणार आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीपेक्षा जवळपास दुप्पट होते. त्यामुळेच पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढलेले दिसत आहेत.

Petrol Diesel Price Today : तुमच्या शहरांतील पेट्रोल-डिझेलच्या किमती जाणून घ्या

इंडियन ऑईलचं IndianOil ONE Mobile App तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.

इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Price) सोप्या पद्धतीने पाहता येतील.

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती (Petrol Diesel Price) एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत). 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Mhada : मुंबईच्या नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर बीडीडी संकुलातील 864 सदनिकांचं वितरण 16 मार्चला, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सोहळा
मुंबईच्या नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील 864 सदनिकांचं वितरण 16 मार्चला, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सोहळा
Gratuity Rules :  'या' चुकीमुळे कंपनी रोखू शकते ग्रॅच्युइटीचे पैसे
Gratuity Rules :  'या' चुकीमुळे कंपनी रोखू शकते ग्रॅच्युइटीचे पैसे
Gold Price: इराण-इस्रायल युद्ध सुरू असताना सोन्याच्या किमतीत घसरण का? आता दर वाढणार की कमी होणार? जाणून घ्या सविस्तर
इराण-इस्रायल युद्ध सुरू असताना सोन्याच्या किमतीत घसरण का? आता दर वाढणार की कमी होणार? जाणून घ्या सविस्तर
Best Selling Car : SUV च्या लाटेतही मारुती 'डिझायर'चा जलवा कायम; ठरली देशातील सर्वाधिक विक्री होणारी कार
SUV च्या लाटेतही मारुती 'डिझायर'चा जलवा कायम; ठरली देशातील सर्वाधिक विक्री होणारी कार

व्हिडीओ

NCL Pune labrotary : पुण्याच्या नॅशनल केमिकल लॅबोरेटरीचं मोठं संशोधन, एलपीजीला पर्यायी इंधन शोधलं
Sangli News : IPS झालेल्या आटपाडीच्या सुपुत्राची हत्तीवरून वाजतगाजत मिरवणूक, पडळकरांनी वाटली साखर
Religion Convergence : बेकायदा धर्मांतराला चाप, विधानसभेत धर्मस्वातंत्र्य सादर Special Report
Akola School : अकोल्यातल्या शाळेत थर्मिक फ्लुईड हिटर सिस्टीम Special Report
Tree Cutting For Car Race : रेसचं फॅड, झाडांवर कुऱ्हाड, स्थानिकांचा विरोध Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण, चक्क पोलीस ठाण्यातच हाणामारी; पोलीस अधीक्षक घटनास्थळी
भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण, चक्क पोलीस ठाण्यातच हाणामारी; पोलीस अधीक्षक घटनास्थळी
Rohit Sharma : भारतीय क्रिकेट संघाच्या यशाचं मुख्य कारण काय? मुंबईतील कार्यक्रमात रोहित शर्माचं एका शब्दात उत्तर...
भारतीय क्रिकेट संघाच्या यशाचं मुख्य कारण काय? मुंबईतील कार्यक्रमात रोहित शर्माचं एका शब्दात उत्तर...
Video: गल्ली ते दिल्ली... ज्योती वाघमारेंनी माझा कट्टावर उलगडला संघर्ष; खासदारकी जाहीर, एकनाथ शिंदेंसमोरच डोळ्यात पाणी
Video: गल्ली ते दिल्ली... ज्योती वाघमारेंनी माझा कट्टावर उलगडला संघर्ष; खासदारकी जाहीर, एकनाथ शिंदेंसमोरच डोळ्यात पाणी
संतापजनक... घरात झोपलेल्या विवाहितेला उचलून नेत अत्याचार, खांबालाही बांधलं; नराधमाला बेड्या
संतापजनक... घरात झोपलेल्या विवाहितेला उचलून नेत अत्याचार, खांबालाही बांधलं; नराधमाला बेड्या
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 मार्च 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 मार्च 2026 | शनिवार
वातावरण फिरलंय... उन्हामुळे कुठं घामाच्या धारा, पण कोल्हापुरात वादळी वारा, पाऊस अन् गारवा
वातावरण फिरलंय... उन्हामुळे कुठं घामाच्या धारा, पण कोल्हापुरात वादळी वारा, पाऊस अन् गारवा
Pakistan : पाकिस्तानच्या सलमान आगावर आयसीसीची कारवाई, विचित्र पद्धतीनं धावबाद झाल्यानंतर हेल्मेट फेकणं महागात पडलं....
पाकिस्तानच्या सलमान आगावर आयसीसीची कारवाई, धावबाद झाल्यानंतर हेल्मेट फेकणं महागात पडलं....
कागलमध्ये ₹357.99 कोटींचा सर्व्हिस रोडसह 6 पदरी एलिव्हेटेड कॉरिडॉर मंजूर; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची घोषणा; सीएम फडणवीस म्हणाले, कोल्हापूरच्या विकासाला नवे पंख
कागलमध्ये ₹357.99 कोटींचा सर्व्हिस रोडसह 6 पदरी एलिव्हेटेड कॉरिडॉर मंजूर; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची घोषणा; सीएम फडणवीस म्हणाले, कोल्हापूरच्या विकासाला नवे पंख
Embed widget