एक्स्प्लोर

Morning Headline 2nd March 2024 : देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर, वाचा मॉर्निंग न्यूज

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...

Rain Alert : पुढील 48 तासांत पावसाची शक्यता! मुंबई, ठाण्यातही अवकाळी पावसाच्या सरी

Unseasonal Rain : राज्यासह देशात गेल्या दोन दिवसांपासून पावसाची हजेरी (Rain Update) पाहायला मिळत आहे. आजही देशात काही भागात पावसाची शक्यता आहे. पंजाब, छत्तीसगड, झारखंड, उत्तराखंडमध्ये आज मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. तर जम्मू काश्मीर आणि हिमाचल प्रदेशात पाऊस आणि बर्फवृष्टी होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. राज्यातही काही ठिकाणी आज पावसाची रिमझिम पाहायला मिळेल. वाचा सविस्तर...

कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ, पेट्रोल-डिझेलच्या किंमती पुन्हा वाढणार? सर्वसमान्यांना झटका बसणार

Petrol and Diesel Prices : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत (crude oil prices) 2 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यानंतर आखाती देशांचे कच्चे तेल प्रति बॅरल 84 डॉलरच्या आसपास पोहोचले आहे. दुसरीकडे, अमेरिकन कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल 80 डॉलरच्या जवळपास पोहोचल्या आहेत. त्यामुळं देशात पुन्हा पेट्रोल डिझेलचे दर वाढणार का? अशी चर्चा सुरु आहे. देशाच्या प्रमुख महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमती काय? वाचा सविस्तर...

मोठी बातमी! मनोज जरांगे यांच्या छातीत दुखू लागल्याने उपचार सुरू; संभाजीनगरमधील डॉक्टरांचं पथक आंतरवालीला पोहचलं

जालना (आंतरवाली सराटी) : मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या छातीत दुखू लागल्याने रात्री त्यांच्यावर आंतरवालीतच उपचार सुरू करण्यात आले आहेत. जरांगे यांच्या छातीत दुखत असल्याने छत्रपती संभाजीनगरमधील (Chhatrapati Sambhaji Nagar) एका खाजगी रुग्णालयातील डॉक्टर तात्काळ आंतरवालीत पोहचले. जरांगे यांच्यावर रात्रीच तातडीने उपचार सुरु करण्यात आले. वाचा सविस्तर...

Bengaluru Blast : 'आईचा फोन आला नसता तर, आज मी जगात नसतो...', बेंगळुरू स्फोटाच्या साक्षीदाराने सांगितला थरारक अनुभव

Bengaluru Blast : कर्नाटकची राजधानी बेंगळुरू येथील रामेश्वरम कॅफेमध्ये शुक्रवारी स्फोट झाला. या स्फोटात नऊ जण जखमी झाले आहेत. कॅफेमध्ये झालेल्या स्फोटाच्या काही वेळापूर्वी पटनाचा सॉफ्टवेअर इंजिनिअर कुमार अलंकृतही तिथे उपस्थित होता. अलंकृत या व्यक्तीने कॅफेमध्ये झालेल्या स्फोटाचा पहिला व्हिडीओ शेअर केला होता. या संपूर्ण घटनेचे वर्णन करताना अलंकृतने सांगितले की, अचानक माझ्या आईने फोन केला, तेव्हा मी माझी ऑर्डर घेतली होती. मी फूड काउंटरपासून 10-15 मीटर दूर गेलो. काही सेकंदांनंतर मला एक मोठा आवाज ऐकू आला आणि मला आजूबाजूला धूर दिसला. वाचा सविस्तर...

Anganewadi Yatra : कोकणातील प्रसिद्ध आंगणेवाडीची यात्रेला सुरुवात, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हजेरी लावणार

Sindhudurg Anganewadi Yatra : कोकणातील (Konkan)  प्रति पंढरपूर म्हणून ओळखले जाणाऱ्या आंगणेवाडीच्या (Aanganewadi)  भराडी देवीची (Bharadi Devi)  यात्रेला आज 2 मार्चपासून सुरुवात होत आहे. कोकणातील प्रसिद्ध आंगणेवाडीची यात्रा अवघ्या काही तासांवर येऊन ठेपली आहे. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री भराडी देवीच्या यात्रेला दरवर्षी चार ते पाच लाख भाविक दर्शनासाठी येतात. वाचा सविस्तर... 

आजच्या लकी राशी कोणत्या? आजचा शनिवार 'या' राशींसाठी अतिशय खास, वाचा मेष ते मीन राशींचे राशीभविष्य

Horoscope 2nd March 2024:  आजचं माझं  भविष्य काय? आज  काय होणार?  किंवा आजचा  आपला दिवस कसा असणार प्रत्येक जण कधी ना कधी हा विचार करतच असतो. लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांनाच  भविष्यात काय होणार हे जाणून घेण्याची प्रबळ इच्छा असते. यासाठीच  आपल्या राशी आपल्याला मदत करतात. आज मेष ते मीन राशीमध्ये काय लिहीले आहे. कोणासाठी  आजचा दिवस कोणासाठी शुभ किंवा  अशुभ कोणासाठी हे  समजण्यासाठी आजचे राशीभविष्य वाचा सविस्तर...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पंकजा मुंडेंबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या युवकास अटक; परभणी पोलिसांनी उचललं, परळीत स्वाधीन केलं
पंकजा मुंडेंबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या युवकास अटक; परभणी पोलिसांनी उचललं, परळीत स्वाधीन केलं
Malegaon : अखेर 'त्या' तरुणाला मिळाली 20 लाखांची मदत, पॉवर सप्लाय कंपनीच्या गलथान कारभारामुळे गमावले होते हात
अखेर 'त्या' तरुणाला मिळाली 20 लाखांची मदत, पॉवर सप्लाय कंपनीच्या गलथान कारभारामुळे गमावले होते हात
MEA On Passport Verification : पासपोर्टसाठी अर्ज करणाऱ्यांना खुशखबर; जाणून घ्या आता किती लवकर मिळणार पासपोर्ट?
पासपोर्टसाठी अर्ज करणाऱ्यांना खुशखबर; जाणून घ्या आता किती लवकर मिळणार पासपोर्ट?
शुभमन गिल कर्णधार, रियान पराग-अभिषेक शर्माला संधी; झिम्बॉब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा
शुभमन गिल कर्णधार, रियान पराग-अभिषेक शर्माला संधी; झिम्बॉब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Anil Parab Full PC : मुंबईत मराठी माणूस टिकला पाहिजे : अनिल परब : ABP MajhaPune Drugs Video Exclusive : पुण्यातील मॉलमध्ये ड्रग्जचं सेवन, 2 तरुणींचा धक्कादायक व्हिडीओBhandara : गोसीखुर्द जल पर्यटन प्रकल्पाच्या फलकावरुन फडणवीसांचे नावच गायब!ABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05 PM 24 June 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पंकजा मुंडेंबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या युवकास अटक; परभणी पोलिसांनी उचललं, परळीत स्वाधीन केलं
पंकजा मुंडेंबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या युवकास अटक; परभणी पोलिसांनी उचललं, परळीत स्वाधीन केलं
Malegaon : अखेर 'त्या' तरुणाला मिळाली 20 लाखांची मदत, पॉवर सप्लाय कंपनीच्या गलथान कारभारामुळे गमावले होते हात
अखेर 'त्या' तरुणाला मिळाली 20 लाखांची मदत, पॉवर सप्लाय कंपनीच्या गलथान कारभारामुळे गमावले होते हात
MEA On Passport Verification : पासपोर्टसाठी अर्ज करणाऱ्यांना खुशखबर; जाणून घ्या आता किती लवकर मिळणार पासपोर्ट?
पासपोर्टसाठी अर्ज करणाऱ्यांना खुशखबर; जाणून घ्या आता किती लवकर मिळणार पासपोर्ट?
शुभमन गिल कर्णधार, रियान पराग-अभिषेक शर्माला संधी; झिम्बॉब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा
शुभमन गिल कर्णधार, रियान पराग-अभिषेक शर्माला संधी; झिम्बॉब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा
अमोल मिटकरींनी तोंडाला आवर घालावी, दरेकरांचा संताप; रोहित पवारांवरही बोचरा पलटवार
अमोल मिटकरींनी तोंडाला आवर घालावी, दरेकरांचा संताप; रोहित पवारांवरही बोचरा पलटवार
T20 World Cup 2024 : इंग्लंड की दक्षिण आफ्रिका, उपांत्य फेरीत भारताचा सामना कुणासोबत?  
T20 World Cup 2024 : इंग्लंड की दक्षिण आफ्रिका, उपांत्य फेरीत भारताचा सामना कुणासोबत?  
Ram Mandir : पहिल्याच पावसात राम मंदिरातील रामलल्लांच्या गाभाऱ्यात पाण्याची गळती; मुख्य पुजारींनी केली चौकशीची मागणी
पहिल्याच पावसात राम मंदिरातील रामलल्लांच्या गाभाऱ्यात पाण्याची गळती; मुख्य पुजारींनी केली चौकशीची मागणी
मोठी बातमी : पुणे ड्रग्स प्रकरणातील आरोपींना 29 जूनपर्यंत पोलिस कोठडी
मोठी बातमी : पुणे ड्रग्स प्रकरणातील आरोपींना 29 जूनपर्यंत पोलिस कोठडी
Embed widget