एक्स्प्लोर

Morning Headlines 25th September: देश विदेशातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर, वाचा Morning News

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील... 

Asian Games Updates: आशिया गेम्समध्ये भारतीय नेमबाजांचा सुवर्णवेध; तर रोईंगमध्ये कांस्यपदक

Asian Games 2023 Day 2: 19व्या आशिया क्रीडा स्पर्धेचा आज दुसरा दिवस... पहिल्या दिवशी भारताच्या खात्यात पाच पदकं आली, पण त्यात एकही सुवर्णपदक नव्हतं. पण आजच्या दुसऱ्या दिवशी भारतीय खेळाडूंनी देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. आशिया गेम्समधील भारताची दुसऱ्या दिवसाची सुरुवात सुवर्णकामगिरीनं झाली. पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफल प्रकारात ऐश्वर्या प्रताप सिंह तोमर, रुद्रांक्ष पाटील आणि दिव्यांश पनवार या त्रिकुटानं सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं. तर रोइंगमध्येही भारतानं कांस्यपदक जिंकलं आहे. त्यामुळे आशिया गेम्समधील एकुण पदकांची संख्या आता सातवर पोहोचली आहे. वाचा सविस्तर 

India vs Australia 2nd ODI Score: श्रेयस-गिलची शानदार शतकी खेळी, त्यानंतर स्पिनर्सचं जाळं... टीम इंडियानं नेमकं कसं कांगारूंना नमवलं?

India vs Australia 2nd ODI Score: टीम इंडियानं (Team India) कांगारूंना (Australia) नमवत दुसरा वनडे सामनाही खिशात घातला. दुसऱ्या वनडे सामन्यात (India vs Australia 2nd ODI) कांगारूंचा टीम इंडियाच्या शिलेदारांनी दारूण पराभव केला. तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना रविवारी (24 सप्टेंबर) इंदूरच्या होळकर स्टेडियमवर खेळवण्यात आला. पावसाच्या व्यत्ययामुळे डकवर्थ लुईस नियम लागू करण्यात आला आणि टीम इंडियानं 99 धावांनी सामना जिंकला. वाचा सविस्तर 

नागालँडमधील अजित पवार गटाच्या आमदारांविरोधात शरद पवार गट आक्रमक, पक्षविरोधी कृती केल्याचा ठपका ठेवत कारवाई करण्याची मागणी

मुंबई : अजित पवार (Ajit Pawar) यांनी बंड केल्यानंतर थेट राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हावर दावा केला आहे. अजित पवार  यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) आणि चिन्हावर दावा केल्यानंतर शरद पवार (Sharad Pawar) आक्रमक झाले आहेत. एकीकडे अजित पवार गटाच्या विधानसभेतील आमदारांचा अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्षांकडे कारवाई सुरू असताना आता नागालँडमध्ये देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाने आमदारांविरोधात आक्रमक भूमिका घेती आहे. महाराष्ट्रानंतर नागालँडमध्ये देखील शेड्युल 10 अंतर्गत आमदारांवर कारवाईची  मागणी शरद पवार गटाने केली आहे. आमदार कारवाईबाबत एबीपी माझाला विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. वाचा सविस्तर 

ABP Snap Poll 2023: जनगणना अन् सीमांकनाची अट, यामुळे महिला आरक्षण लागू करण्याच्या सरकारच्या हेतूबद्दल शंका निर्माण होते?

ABP Cvoter Survey: 128 वं घटनादुरुस्ती विधेयक (महिला आरक्षण विधेयक) संसदेनं मंजूर केल्यानंतर, अनेक विरोधी पक्षांकडून सरकारच्या हेतूंवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. कारण महिला आरक्षण विधेयक (Women's Reservation Bill) संसदेकडून मंजूर झाल्यानंतरही त्याच्या अंमलबजावणीसाठी दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. महिला आरक्षण विधेयक (नारी शक्ती वंदन विधेयक) 20 सप्टेंबर रोजी लोकसभेनं आणि 21 सप्टेंबर रोजी राज्यसभेनं मंजूर केलं आहे. तरतुदींमध्ये असं म्हटलं आहे की, जनगणना आणि त्यानंतरची मतदारसंघांची पुनर्रचनेनंतर महिला आरक्षण कायद्याच्या रुपात लागू केलं जाईल. त्यानंतरच लोकसभा आणि विधानसभांमध्ये महिलांना 33 टक्के आरक्षण मिळेल. वाचा सविस्तर 

India-Canada Row : कॅनडाच्या पंतप्रधानांचा आरोप आता संरक्षणमंत्र्यांनी सूर बदलला, म्हणाले- 'भारताशी संबंध महत्त्वाचे'

मुंबई : सध्या भारत (India) आणि कॅनडा (Canada) या दोन्ही देशांमध्ये तणाव (India-Canada Diplomatic Row) पाहायला मिळत आहे. खलिस्तानी दहशतादी हरदीपसिंह निज्जर (Hardeep Singh Nijjar) च्या हत्येमुळे दोन्ही देशांमधील संबंध ताणले गेले आहेत. कॅनडाचे पंतप्रधान (Prime Minister of Canada) जस्टिन टुड्रो (Justin Trudeau) यांनी खलिस्तानी (Khalistani) दहशतादी हरदीपसिंह निज्जरच्या हत्येमध्ये भारताचा हात असल्याचा आरोप केला. यानंतर आता कॅनडाच्या संरक्षण मंत्र्यांनी मात्र, वेगळाच सूर लावला आहे. वाचा सविस्तर 

RBI कडून 4 सहकारी बँकांना 20 लाख रुपयांचा दंड; महाराष्ट्रातील 'या' बँकांचाही समावेश

RBI Imposes Rs20 Lakh Penalty: भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (Reserve Bank Of India) नियामकानं ठरवून दिलेल्या नियमांचं उल्लंघन केल्यामुळे RBI नं देशातील चार सहकारी बँकांना 20 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. यापैकी दोन बँका महाराष्ट्रातील (Maharashtra) आहेत, तर उत्तर प्रदेश (Utter Pradesh) आणि जम्मूमधील बँकांचाही समावेश आहे. आरबीआयनं या चारही बँकांपैकी उत्तर प्रदेशातील एचसीबीएल कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेडकडून तब्बल 11 लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे. वाचा सविस्तर

25 September In History : पंडित दीनदयाळ उपाध्याय, इस्रोचे अध्यक्ष सतीन धवन यांचा जन्म; आज इतिहासात...

25 September In History : इतिहासात प्रत्येक दिवस महत्त्वाचा असतो.  भारतीय जनसंघाच्या संस्थापंकापैकी एक असलेले पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचा आज जन्मदिन आहे. तर, भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत मोलाचे योगदान देणारे, शास्त्रज्ञ सतीन धवन यांचा जन्मदिनही आज आहे. कवी अरुण कोलटकर आणि साहित्यिक शं.ना. नवरे यांचा आज स्मृतीदिन आहे. वाचा सविस्तर 

Horoscope Today 25 September 2023: मिथुन, कर्क, मकर, राशीच्या लोकांना नोकरीत बढतीची शक्यता, आजचे राशीभविष्य

Horoscope Today 25 September 2023 : ज्योतिष शास्त्रानुसार 25 सप्टेंबर 2023, सोमवार हा महत्त्वाचा दिवस आहे. दशमी तिथी नंतर आज सकाळी 07:56 पर्यंत एकादशी तिथी राहील. आज सकाळी 11.55 पर्यंत उत्तराषाढ नक्षत्र पुन्हा श्रावण नक्षत्र राहील. आज वाशी योग, आनंदादि योग, सनफा योग, पराक्रम योग, सर्वार्थसिद्धी योग, अतिगंड योग यांच्या ग्रहयोगाने सहकार्य मिळेल. जर तुमची राशी वृषभ, सिंह, वृश्चिक, कुंभ असेल तर तुम्हाला शश योगाचा लाभ मिळेल. चंद्र मकर राशीत राहील. आजचा सोमवार इतर राशींसाठी काय घेऊन येतो? जाणून घ्या आजचे राशीभविष्य... वाचा सविस्तर 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Beed: बीडच्या आष्टी तालुक्यात धक्कादायक प्रकार, HIV झाल्याच्या अफवेने कुटुंबाला वाळीत टाकलं
बीडच्या आष्टी तालुक्यात धक्कादायक प्रकार, HIV झाल्याच्या अफवेने कुटुंबाला वाळीत टाकलं
Who is Neeraj Chopra wife Himani Mor : सासऱ्यानं गावात स्टेडियम बांधलं, एकाच घरात तीन खेळ, मेव्हणा नागपुरात; नीरज चोप्राची बायको हिमानी आहे तरी कोण?
सासऱ्यानं गावात स्टेडियम बांधलं, एकाच घरात तीन खेळ, मेव्हणा नागपुरात; नीरज चोप्राची बायको हिमानी आहे तरी कोण?
Donald Trump : अध्यक्ष होताच डोनाल्ड ट्रम्प यांच्या अडचणीत वाढ, गुन्हा दाखल, एलन मस्क देखील संकटात
डोनाल्ड ट्रम्प यांना अध्यक्ष होताच पहिला धक्का, गुन्हा दाखल; एलन मस्क देखील संकटात
Kolhapur Guardian Minister : मुश्रीफ म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यातील लोकांच्या मनातील मीच पालकमंत्री, तिकडं क्षीरसागरांची सुद्धा खदखद काही केल्या थांबेना!
मुश्रीफ म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यातील लोकांच्या मनातील मीच पालकमंत्री, तिकडं क्षीरसागरांची सुद्धा खदखद काही केल्या थांबेना!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 10 AM TOP Headlines 10 AM 21 January 2024Jayant Patil on Akshay Shinde | शाळा मालकाला वाचवण्यासाठी अक्षय शिंदेला संपवलं, जयंत पाटलांची टीकाVijay Wadettiwar on Devendra Fadnavis|गडचिरोलीला 2 नाहीतर 3 पालकमंत्री द्या,वडेट्टीवारांची खोचक टीकाKho Kho World cup| खो-खोने आम्हाला नॅशनल लेव्हलपर्यंत पोहोचवलं, कर्णधार प्रतीक वायकरची प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed: बीडच्या आष्टी तालुक्यात धक्कादायक प्रकार, HIV झाल्याच्या अफवेने कुटुंबाला वाळीत टाकलं
बीडच्या आष्टी तालुक्यात धक्कादायक प्रकार, HIV झाल्याच्या अफवेने कुटुंबाला वाळीत टाकलं
Who is Neeraj Chopra wife Himani Mor : सासऱ्यानं गावात स्टेडियम बांधलं, एकाच घरात तीन खेळ, मेव्हणा नागपुरात; नीरज चोप्राची बायको हिमानी आहे तरी कोण?
सासऱ्यानं गावात स्टेडियम बांधलं, एकाच घरात तीन खेळ, मेव्हणा नागपुरात; नीरज चोप्राची बायको हिमानी आहे तरी कोण?
Donald Trump : अध्यक्ष होताच डोनाल्ड ट्रम्प यांच्या अडचणीत वाढ, गुन्हा दाखल, एलन मस्क देखील संकटात
डोनाल्ड ट्रम्प यांना अध्यक्ष होताच पहिला धक्का, गुन्हा दाखल; एलन मस्क देखील संकटात
Kolhapur Guardian Minister : मुश्रीफ म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यातील लोकांच्या मनातील मीच पालकमंत्री, तिकडं क्षीरसागरांची सुद्धा खदखद काही केल्या थांबेना!
मुश्रीफ म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यातील लोकांच्या मनातील मीच पालकमंत्री, तिकडं क्षीरसागरांची सुद्धा खदखद काही केल्या थांबेना!
Nashik Guardian Minister : नाशिकचं पालकमंत्रिपद गिरीश महाजनांकडेच राहणार, भाजपच्या गोटातून मोठी माहिती समोर
नाशिकचं पालकमंत्रिपद गिरीश महाजनांकडेच राहणार, भाजपच्या गोटातून मोठी माहिती समोर
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्याच दिवशीच्या 10 निर्णयांनी अमेरिका सोडाच, पण अवघ्या जगाला धडकी भरली!
डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्याच दिवशीच्या 10 निर्णयांनी अमेरिका सोडाच, पण अवघ्या जगाला धडकी भरली!
Beed News: बीड जिल्ह्यात मोठी घडामोड, 13 सरपंच आणि 418 ग्रामपंचायत सदस्यांना जिल्हाधिकाऱ्यांचा झटका; सदस्यत्त्व रद्द केले
मोठी बातमी: बीड जिल्ह्यातील 13 सरपंच आणि 418 ग्रामपंचायत सदस्यांना जिल्हाधिकाऱ्यांचा झटका
Mhada Lottery Konkan Board : म्हाडाच्या कोकण मंडळाच्या 2264 घरांच्या लॉटरीसाठी फेब्रुवारीत मुहूर्त, 31 जानेवारीची सोडत लांबणीवर
म्हाडाच्या कोकण मंडळाच्या लॉटरीसाठी फेब्रुवारीत मुहूर्त, 31 जानेवारीची सोडत लांबणीवर
Embed widget