एक्स्प्लोर

Morning Headlines 24th January: देश विदेशातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर, वाचा मॉर्निंग न्यूज

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील... 

Rohan Bopanna: 44 वर्षांच्या टेनिस स्टारनं रचला इतिहास, रोहन बोपन्नाची ऑस्ट्रेलियन ओपनच्या सेमीफायनलमध्ये धडक

Rohan Bopanna & Matt Ebden: मुंबई : भारतीय टेनिस (Tennis) स्टार रोहन बोपन्ना (Rohan Bopanna) यानं इतिहास रचला आहे. रोहन बोपन्ना आणि मॅट एबडेन (Matthew Ebden) यांनी ऑस्ट्रेलियन ओपनची (Australian Open) सेमीफायनल गाठली आहे. 44 वर्षांच्या रोहन बोपन्ना आणि मॅट एबडेन यांनी क्वॉर्टरफायनलचा सामना 6-4, 7-6 (7-5) नं जिंकत सेमीफायनलमध्ये दणक्यात प्रवेश केला. रोहन आणि मॅटनं आपल्या या विजयासोबतच आणखी एक विक्रम रचला आहे. रोहन आणि मॅट मेन्स डबल्समध्ये जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी पोहोचले आहेत. वाचा सविस्तर 

अयोध्येत सलग दुसऱ्या दिवशी कडाक्याच्या थंडीत भाविकांची गर्दी; मंदिर उघडण्याआधीच भाविकांच्या लांबच लांब रांगा

Ayodhya Ram Mandir: अयोध्या : अयोध्येतील (Ayodhya) प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर रामललाच्या (Shree Ram) दर्शनाचा आजचा दुसरा दिवस आहे. आणि आजही अयोध्येत रामभक्तांची गर्दी कायम असल्याचं पहायला मिळतंय. राम मंदिर (Ram Mandir) खुलं होण्याआधीच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केल्याचं पहायला मिळतंय. पहाटेपासूनच भाविकांनी मंदिर परिसरात गर्दी करायला सुरुवात केलीये. दर्शनासाठी मंदिर सुरु झाल्यानंतर पहिल्याच दिवशी 5 लाख भाविकांनी रामललाचं दर्शन घेतलं. काल मोठ्या प्रमाणावर भाविक दर्शनासाठी आल्याने चेंगराचेंगरीचीही परिस्थिती निर्माण झाली होती. भाविकांची ही गर्दी पांगवणं पोलिसांसाठीही मोठी कसरत होती. वाचा सविस्तर 

PM Modi Letter: मी माझ्या मनात अयोध्या घेऊन परतलोय, अशी जी कधीच माझ्यापासून वेगळी होऊ शकत नाही; राष्ट्रपतींच्या पत्राला पंतप्रधानांचं उत्तर

PM Modi to President Droupadi Murmu: नवी दिल्ली : अयोध्येतील (Ayodhya) राम मंदिराचा (Ram Mandir) भव्यदिव्य उद्घाटन सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. या सोहळ्याला देश-विदेशातील दिग्गजांनी हजेरी लावली होती. अशातच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Droupadi Murmu) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना (PM Narendra Modi) पत्र लिहून त्यांचं अभिनंदन केलं होतं. राष्ट्रपतींच्या पत्राला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पत्रातून उत्तर दिलं आहे. राम मंदिरात प्रभू श्रीरामाचा अभिषेक होणं, हा त्याच्या आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय क्षणांपैकी एक होता आणि तिथून परतताना एक वेगळी अयोध्या मनात साठवून मी परतलो, जिच्यापासून मी कधीच दूर जाऊ शकत नाही, असं मोदींनी पत्रात लिहिलं आहे... वाचा सविस्तर 

Maharashtra Cold Wave : पुढील 24 तासात 'या' भागात पावसाची हजेरी; राज्यात अवकाळी पावसाने हजेरी, बळीराजा चिंतेत

Maharashtra Weather Update Today : महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचे (Unseasonal Rain) सावट आहे. हवामानात अचानक बदल झाल्याचं दिसत आहे. राज्यात सर्वत्र थंडीची लाट (Cold Wave) पसरली आहे. तर काही भागात पाऊस (Rain Prediction) पाहायला मिळत आहे. पुढील 24 तासात राज्यात काही भागात पावसाचा अंदाज आयएमडीने (IMD) वर्तवला आहे. हवामानात बदल झाल्याने राज्यात काही ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली. विदर्भातील काही शहरात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे, यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पुढील दोन दिवसांत राज्यात मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात तापमानात घट होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे... वाचा सविस्तर 

Gold Rate Today : सोने-चांदीच्या दरवाढीतून सलग तिसऱ्या दिवशी दिलासा! आज 24 कॅरेट सोन्याचा दर काय माहितीय?

Gold Rate Today In India, 24 January 2024 : पुढील महिन्यात लग्नाचा हंगाम सुरु होणार असल्याने बाजारात सोने-चांदी (Gold Silver Price) खरेदीसाठी लगबग पाहायला मिळत आहे. मागील वर्ष सरताना सोन्याच्या दराने (Gold Rate) उच्चांक गाठला, त्यानंतर आता मात्र, सोन्याच्या दरात घसरण होताना पाहायला मिळत आहे. तुम्हीही आज सोने-चांदी खरेदीचा विचार करत असाल तर, आज तुमच्या शहरातील सोने-चांदीचा भाव काय, जाणून घ्या... वाचा सविस्तर 

24th January In History : डॉ. होमी भाभा यांचे अपघाती निधन, पंडित भीमसेन जोशी यांचा स्मृतीदिन; आज इतिहासात

24th  January In History :  अनेक चांगल्या वाईट घटनांनी इतिहासातील तारखा नोंदलेल्या (Today History) असतात. आज म्हणजे 24 जानेवारी रोजी इतिहासात अनेक महत्वाच्या घटना घडल्या होत्या. भारताच्या अणू संशोधन कार्यक्रमाचे जनक म्हणून ओळखले जाणारे, भौतिकशास्त्रज्ञ डॉ. होमी भाभा जहांगीर यांचा स्मृतीदिन आहे. त्याशिवाय, ब्रिटनचे माजी पंतप्रधान, नोबेल पुरस्कार विजेत विस्टन चर्चिल, स्वर भास्कर पंडित भीमसेन जोशी यांचाही स्मृतीदिन आहे. तर, मराठी अभिनेत्री हंसा वाडकर यांची जयंती आणि चित्रपट निर्माते सुभाष घई यांचा वाढदिवस आहे... वाचा सविस्तर 

Horoscope Today 24 January 2024 : आजचा बुधवार खास! 12 राशीच्या लोकांसाठी दिवस कसा असेल? आजचे राशीभविष्य जाणून घ्या

Horoscope Today 24 January 2024 : राशीभविष्यानुसार आज, म्हणजेच 24 जानेवारी 2024 बुधवार हा महत्त्वाचा दिवस आहे. ग्रहांच्या चालीनुसार, मिथुन राशीच्या लोकांना आज आर्थिक लाभ मिळू शकतो, त्यासोबतच तुमचा मान-प्रतिष्ठा देखील वाढू शकतो. कन्या राशीच्या लोकांनी आपले शरीर निरोगी ठेवण्यासाठी नियमित व्यायाम करणे आवश्यक आहे. सर्व राशीच्या लोकांसाठी बुधवार कसा राहील? सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या... वाचा सविस्तर 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
Rahul Gandhi : एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Bhaskar Jadhav On Nana Patole : Chhatrapati Sambhaji Nagar : गुगल मॅपने केला गोंधळ, UPSC चे विद्यार्थी परीक्षेपासून वंचितABP Majha Headlines : 2 PM : 16 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सTop 50 : टॉप 50 बातम्यांचं अर्धशतक राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा :16 June 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
Rahul Gandhi : एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
तुम्ही 500 पार जरी गेला असतात, तरी...; टी राजाच्या वक्तव्यावरुन मिटकरींचा पलटवार, राष्ट्रवादी-भाजप आमने सामने
तुम्ही 500 पार जरी गेला असतात, तरी...; टी राजाच्या वक्तव्यावरुन मिटकरींचा पलटवार, राष्ट्रवादी-भाजप आमने सामने
राहुल गांधीं जबाबदारीपासून का पळत आहेत?
राहुल गांधीं जबाबदारीपासून का पळत आहेत?
Lok Sabha Result 2024: रवींद्र वायकरांच्या मेहुण्याकडील मोबाईल फोन EVM मशीनला कनेक्ट, धक्कादायक दाव्याने एकच खळबळ
रवींद्र वायकरांच्या मेहुण्याकडील मोबाईल फोन EVM मशीनला कनेक्ट, धक्कादायक दाव्याने एकच खळबळ
Embed widget