Rohan Bopanna: 44 वर्षांच्या टेनिस स्टारनं रचला इतिहास, रोहन बोपन्नाची ऑस्ट्रेलियन ओपनच्या सेमीफायनलमध्ये धडक
Rohan Bopanna: 44 वर्षांच्या रोहन बोपन्ना आणि मॅट एबडेन यांनी क्वॉर्टरफायनलचा सामना 6-4, 7-6 (7-5) नं जिंकत सेमीफायनलमध्ये दणक्यात प्रवेश केला.
Rohan Bopanna & Matt Ebden: मुंबई : भारतीय टेनिस (Tennis) स्टार रोहन बोपन्ना (Rohan Bopanna) यानं इतिहास रचला आहे. रोहन बोपन्ना आणि मॅट एबडेन (Matthew Ebden) यांनी ऑस्ट्रेलियन ओपनची (Australian Open) सेमीफायनल गाठली आहे. 44 वर्षांच्या रोहन बोपन्ना आणि मॅट एबडेन यांनी क्वॉर्टरफायनलचा सामना 6-4, 7-6 (7-5) नं जिंकत सेमीफायनलमध्ये दणक्यात प्रवेश केला. रोहन आणि मॅटनं आपल्या या विजयासोबतच आणखी एक विक्रम रचला आहे. रोहन आणि मॅट मेन्स डबल्समध्ये जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी पोहोचले आहेत.
अर्जेंटिनाच्या मॅक्सिमो गोन्झालेझ, आंद्रेस मोल्टेनीचा पराभव (Maximo Gonzalez, Andres Molteni)
ऑस्ट्रेलियन ओपनच्या क्वॉर्टरफायनलच्या सामन्यात अर्जेंटिनाच्या मॅक्सिमो गोन्झालेझ आणि आंद्रेस मोल्टेनी यांचा सामना रोहन बोपन्ना आणि मॅट एबडेन यांच्यासोबत खेळवण्यात आला. मात्र रोहन बोपण्णा आणि मॅट एबडेन यांनी विरोधी खेळाडूंना संधीच दिली नाही. सामना सुरू झाल्यापासूनच रोहन आणि मॅट मॅक्सिमो गोन्झालेझ आणि आंद्रेस मोल्टेनी यांच्यावर अक्षरशः तुटून पडले. या सामन्यात मॅक्सिमो गोन्झालेझ आणि आंद्रेस मोल्टेनी यांचा 6-4, 7-6 (7-5) असा पराभव झाला. रोहन बोपण्णा आणि मॅट एबडेननं ऑस्ट्रेलियन ओपनच्या सेमीफायनलमध्ये दणक्यात प्रवेश केला. तसेच रोहन बोपन्ना आणि मॅट एबडेन हे पुरुष दुहेरीत जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी पोहोचले आहेत.
Congrats to Rohan Bopanna 🇮🇳 who reaches the Australian Open Men's Doubles semi finals with partner Matt Ebden
— Chris Goldsmith (@TheTennisTalker) January 24, 2024
The 43 year old Indian becomes the ATP number 1 doubles player on Monday for the 1st time
Never too late! Amazing achievement pic.twitter.com/6fHvdrfYDX
याआधी रोहन बोपन्ना आणि त्याचा जोडीदार ऑस्ट्रेलियाचा मॅट एबडेन यांनी नेदरलँडच्या वेस्ली कूलहॉफ आणि क्रोएशियाच्या निकोला मेक्टिक या जोडीचा सरळ सेटमध्ये पराभव केला होता. भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या सीडेड जोडीनं कूलहॉफ आणि मेक्टिक या माजी जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकाच्या जोडीचा 7-6, 7-6 असा पराभव केला. आता सेमीफायनल्सच्या सामन्यात रोहन बोपन्ना आणि मॅट एबडेन यांनी अर्जेंटिनाच्या मॅक्सिमो गोन्झालेझ आणि आंद्रेस मोल्टेनी यांचा 6-4, 7-6 (7-5) असा पराभव केला आहे.