(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Morning Headlines 22nd January: देश विदेशातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर, वाचा मॉर्निंग न्यूज
देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील
देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...
राम आएंगे! अनेक वर्षांची प्रतिक्षा आज संपणार; अयोध्येत रामराज्य परतणार; डोळे दिपवणाऱ्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याकडे अवघ्या जगाचं लक्ष
Ram Mandir Pran Pratishtha Ayodhya: अयोध्या : अयोध्येतील (Ayodhya) प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला आता अवघे तास उरले आहेत. अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर अवघ्या देशवासियांच्या स्वप्नातलं भव्य राम मंदिर (Ram Mandir) सत्यात अवतरलं आहे. आज याच भव्य राम मंदिरात प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची विधीवत प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. तर, आज पहाटे श्रीरामाची वर्षानुवर्षांपासून अयोध्येत असलेली मूर्ती राम मंदिरात आणण्यात आली आहे. गाभाऱ्याचे द्वार खुले करण्यात आले आहेत. प्रभू श्रीरामाच्या भव्य प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यासाठी संपूर्ण अयोध्या नगरी नववधूप्रमाणे सजली आहे... वाचा सविस्तर
Ram Mandir Pran Pratishtha: आजि सोनियाचा दिनु! अयोध्येतील भव्य मंदिरात प्रभू श्रीरामाची विधीवत प्रतिष्ठापना; कसा पार पडेल सोहळा? पाहा संपूर्ण वेळापत्रक
Ram Mandir Pran Pratishtha: आज ऐतिहासिक दिवस... आज प्रभू श्रीरामचंद्राची अयोध्येतील (Ayodhya) भव्य राम मंदिरात (Ram Mandir) विधीवर प्रतिष्ठापना होणार आहे. अयोध्येत सध्या रामनामाचा अखंड जप सुरू आहे. आज 12 वाजून 29 मिनिटांनी श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा (Ram Mandir Pran Pratishtha) होणार आहे. ज्या मंदिरात हा महामंगल सोहळा संपन्न होणार आहे, त्या नव्याकोऱ्या मंदिरालाही सजावटीचा साज बहाल करण्यात आला आहे. मंदिराच्या प्रत्येक भिंतीवर, प्रत्येक कोपऱ्यात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. तर बाहेरही आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. या सोहळ्याला अवघ्या देशातीलच नव्हे जगातील रामभक्तांच्या उपस्थितीनं वातावरण राममय झालं आहे... वाचा सविस्तर
Weather Forecast : पुढील तीन दिवसात अवकाळी पावसाचं संकट, 'या' भागात पावसाची शक्यता
Weather Update Today : देशात सध्या थंडीची लाट (Cold Wave) पसरली आहे. पुढील 48 तासात देशातील हवामानात आणखी बदल होण्याची शक्यता आहे. बांगलादेशावर चक्रीवादळाचे क्षेत्र 3.1 किमीपर्यंत पसरल्यामुळे मान्सूनसाठी अनुकूल परिस्थिती आहे. यामुळे देशासह राज्याच्या काही भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दक्षिण भारतातासह काश्मीर खोऱ्यात आज पावसाची शक्यता आहे. यासोबतच महाराष्ट्रावरही अवकाळी पावसाचं संकट घोंघावत आहे... वाचा सविस्तर
Maharashtra Weather : राज्यावर पुन्हा अवकाळी पावसाचं संकट! तीन दिवस पावसाची शक्यता
Maharashtra Weather Update : देशासह राज्यात पुढील काही दिवस पावसाची शक्यता (Rain Alert) वर्तवण्यात आली आहे. बांगलादेशवर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे याचा परिणाम दक्षिण भारतासह महाराष्ट्रातही पाहायला मिळणार आहे. उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे राज्यातील तापमानात प्रचंड घट झाली आहे. मुंबई, ठाणे, पालघर, नवी मुंबईमध्ये पहाटे कडाक्याची थंडी पाहायला मिळत आहे. नाशिक, निफाडमध्ये गारठा वाढला आहे. मराठवाडा, विदर्भातही तापमानात मोठी घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान, पुढील तीन दिवस राज्यात काही ठिकाणी पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे... वाचा सविस्तर
81 टक्के लोक 'वन नेशन-वन इलेक्शन'च्या बाजूनं; कोविंद कमिटीकडे देशभरातून 21 हजार सूचना
One Nation One Election : नवी दिल्ली : 'वन नेशन, वन इलेक्शन'च्या (One Nation, One Election) मुद्द्यावरुन आधीपासूनच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये मतमतांतरं दिसून येत आहेत. अशातच 'वन नेशन, वन इलेक्शन'बाबत निर्णय घेण्यासाठी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या समितीचं निवेदन समोर आलं आहे. या निवेदनात समितीला लोकांकडून तब्बल 21 हजार बदल सुचवण्यात आले आहेत. यापैकी 81 टक्के लोकांनी एकाचवेळी निवडणुका घेण्याच्या कल्पनेला सहमती दर्शवली आहे. समितीनं रविवारी दिलेल्या निवेदनात 46 राजकीय पक्षांकडूनही सूचना मागवल्याचं म्हटलं आहे. आतापर्यंत 17 राजकीय पक्षांकडून सूचना प्राप्त झाल्याचं निवेदनातून सांगण्यात आलं आहे... वाचा सविस्तर
दर्शनापासून ते राहण्यापर्यंत ; 22 जानेवारी अन् प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यासंदर्भातील 22 प्रश्न; तुमच्या मनातील प्रत्येक प्रश्नाचं उत्तर!
अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळा आज पार पडणार आहे. रामाची जुनी मूर्ती राममंदिरात आणण्यात आली. गाभाऱ्याचे द्वार खुले करण्यात आले आहे. दरम्यान राममंदिर परिसरात चैतन्याचं आनंदाचं वातावरण आहे. अयोध्येत सध्या रामनामाचा अखंड जप सुरू आहे. कारण सर्वांच्या लाडक्या रामरायाची आज प्राणप्रतिष्ठा होणार आहे. 12 वाजून 29 मिनिटांनी श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे आणि ज्या मंदिरात हा महामंगल सोहळा संपन्न होणार आहे. त्या नव्याकोऱ्या मंदिरालाही सजावटीचा साज बहाल झालाय. राम मंदिराच्या प्रत्येक भिंतीवर आकर्षक फुलांची सजावट केली गेलीय. तर बाहेरही आकर्षक रोषणाई करण्यात आलीय.. या सोहळ्याला अवघ्या देशातीलच नव्हे जगातील रामभक्तांच्या उपस्थितीने वातावरण राममय झालंय. परंतु राम मंदिराच्या उद्घाटनानंतर तुमच्या आमच्या मनात अनेक प्रश्न असतील तर आज आम्ही तुम्हाला तुमच्या मनातील 22 प्रश्नांची उत्तरे देणार आहे. वाचा सविस्तर
Horoscope Today 22 January 2024 : आजचा दिवस भाग्याचा! प्रभू रामाची कोणत्या राशीवर असणार कृपा? आजचे राशीभविष्य जाणून घ्या
Horoscope Today 22 January 2024 : जन्मकुंडलीनुसार आज म्हणजेच 22 जानेवारी 2024 रोजी सोमवार हा महत्त्वाचा दिवस आहे. ग्रहांच्या चालीनुसार आजचा दिवस वृषभ राशीच्या लोकांसाठी ऑफिसमध्ये खूप आनंददायी जाणार आहे, आज सिंह राशीचे लोक नवीन वाहन खरेदी करण्याचा विचार करू शकतात. सर्व राशीच्या लोकांसाठी सोमवार कसा राहील? सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या... वाचा सविस्तर