एक्स्प्लोर

Morning Headlines 21st September: देश विदेशातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर, वाचा Morning News

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील... 

आदिवासी आणि विधवा असल्यामुळेच राष्ट्रपतींना नव्या संसदेच्या उद्घाटनासाठी आमंत्रण नव्हतं; सनातन धर्मावर टीका करत उदयनिधींची मोदी सरकावर निशाणा

Udhayanidhi Stalin Attack On Sanatan Dharma: तामिळनाडूचे मंत्री आणि द्रमुकचे (DMK) नेते उदयनिधी स्टॅलिन (Udhayanidhi Stalin) यांनी बुधवारी पुन्हा एकदा सनातन धर्म (Sanatan Dharma) आणि अप्रत्यक्षरित्या मोदी सरकारवर (Modi Government) निशाणा साधला आहे. संसदेच्या नव्या इमारतीच्या (New Parliament Building) उद्घाटन सोहळ्यावरुन उदयनिधी स्टॅलिन यांनी मोदी सरकारला घेरलं आहे. संसदेच्या नव्या इमारतीच्या उद्घाटन सोहळ्याला देशाच्या राष्ट्रपती द्रौपजी मुर्मू यांना आमंत्रित न केल्याबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. उदयनिधी स्टॅलिन म्हणाले की, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निमंत्रित करण्यात आलं नाही, कारण त्या विधवा आहे आणि आदिवासी समाजातील आहेत. यालाच आपण सनातन धर्म म्हणतो का? असं म्हणत उदयनिधी स्टॅलिन यांनी प्रश्नही उपस्थित केला आहे. वाचा सविस्तर 

Women Reservation Bill: महिला आरक्षण विधेयक लोकसभेत 454 मतांनी मंजूर; विरोधात केवळ दोन मतं, आज विधेयकावर राज्यसभेत चर्चा

Women Reservation Bill Passed Lok Sabha: महिला आरक्षण विधेयक (Women Reservation Bill) बुधवारी (20 सप्टेंबर) संसदेच्या विशेष अधिवेशनात लोकसभेत मंजूर करण्यात आलं. या विधेयकावरील मतदानावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) लोकसभेत (Lok Sabha) उपस्थित होते. आता गुरुवारी (21 सप्टेंबर) हे विधेयक राज्यसभेत मांडलं जाणार आहे. वाचा सविस्तर 

NIA कडून कॅनडाशी संबंधित 43 दहशतवादी आणि गँगस्टर्सचा तपशील जारी, लॉरेन्स बिश्नोई आणि गोल्डी ब्रार यांचा समावेश

नवी दिल्ली: राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए)  बुधवारी कॅनडाशी संबंध असणाऱ्या 43 दहशतवादी आणि गँगस्टर्सचा तपशील केला जारी. त्याचबरोबर संबंधित आरोपींच्या मालमत्ता आणि संपत्तीबाबतची माहिती लोकांनी एनआयएला द्यावी, असं आवाहनही केलंय. एनआयएने जारी केलेल्या  यादीतील काही गँगस्टर हे तुरुंगात आहे तर काही फरार असून परदेशात दहशतवादी कृत्यांमध्ये सहभागी आहे. या यादीमध्ये  पंजाबी गायक सिद्धू मूसवाला यांच्या हत्येतील सूत्रधार लॉरेन्स बिश्नोई आणि गोल्डी ब्रार यांचा समावेश होता. वाचा सविस्तर 

यंदाच्या प्रजासत्ताक दिनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन प्रमुख पाहुणे असण्याची शक्यता; वर्षभरात दुसऱ्यांदा भारत दौरा करणार?

Joe Biden Republic Day Invitation: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष (America) जो बायडन (Joe Biden) यांना 26 जानेवारी रोजी पार पडणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या (Republic Day) समारंभासाठी आमंत्रित केलं आहे. अमेरिकेचे भारतातील राजदूत एरिक गार्सेटी यांनी बुधवारी (20 सप्टेंबर) यासंदर्भात माहिती दिली. वाचा सविस्तर 

Shubhneet Singh : शुभनीत सिंहला खालिस्तानींना पाठिंबा देणं पडलं महागात; भारत दौरा रद्द.. नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या...

Shubhneet Singh : भारत (India) आणि कॅनडा (Canada) वादादरम्यान बुक माय शो या ऑनलाइन तिकीट बुकिंग अॅपने गायक शुभनीत सिंहच्या (Shubhneet Singh) भारतातील सर्व मैफिली रद्द केल्या आहेत. शुभनीत सिंहच्या सोशल मीडियावरील एका वादग्रस्त पोस्टनंतर बुक माय शोने टोकाचं पाऊल उचललं आहे. वाचा सविस्तर

21 September In History : भारताची गुप्तचर संस्था 'रॉ'ची स्थापना, शेवटचा मुघल सम्राट बादशाह बहादूर शहा यांना ब्रिटिशांकडून अटक; आज इतिहासात...

21 September In History :  इतिहासात प्रत्येक दिवसाचे महत्त्व आहे. आजचा दिवस भारताच्या इतिहासाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. 1857 च्या उठावाचे नेतृत्व करणारे शेवटचे मुघल सम्राच बहादूर शहा जफर यांना आजच्या दिवशी ब्रिटिशांनी अटक केली होती. जगभरात नावाजलेली, दरारा असणारी भारताची गु्प्तचर संस्था 'रॉ'चा आज स्थापना दिन आहे. वाचा सविस्तर 

Horoscope Today 21 September 2023 : आजचा दिवस 'या' राशींसाठी सावध राहण्याचा! आजचे राशीभविष्य जाणून घ्या

Horoscope Today 21 September 2023 : ज्योतिषशास्त्रानुसार 21 सप्टेंबर 2023, गुरुवार हा महत्त्वाचा दिवस आहे. पंचागानुसार, षष्ठी तिथी नंतर आज दुपारी 02:15 पर्यंत सप्तमी तिथी असेल. आज दुपारी 3.35 पर्यंत अनुराधा नक्षत्र पुन्हा ज्येष्ठ नक्षत्र राहील. आज वाशी योग, आनंदादी योग, सनफा योग, पराक्रम योग, सर्वार्थसिद्धी योग, प्रीति योग यांच्या ग्रहयोगाने सहकार्य मिळेल. जर तुमची राशी वृषभ, सिंह, वृश्चिक, कुंभ असेल तर तुम्हाला षष्ठ योगाचा लाभ मिळेल. चंद्र वृश्चिक राशीत असेल. आजचा गुरुवार 12 राशींसाठी काय घेऊन येणार? आजचे राशीभविष्य जाणून घेऊया... वाचा सविस्तर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMajha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
Embed widget