एक्स्प्लोर

Morning Headlines 01st February: देश विदेशातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर, वाचा मॉर्निंग न्यूज

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...

Union Budget 2024: मोदी सरकारच्या पेटाऱ्यातून जनतेला सरप्राईजेसची अपेक्षा; आजच्या अर्थसंकल्पात 'या' मोठ्या घोषणांची शक्यता?

Union Budget 2024: नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारामण (Nirmala Sitharaman) 1 फेब्रुवारी रोजी देशाचा अंतरिम अर्थसंकल्प (Interim Budget 2024) सादर करणार आहेत. यंदाचं वर्ष निवडणुकीचं असल्यामुळे येत्या काही महिन्यांनी देशात लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे आज सादर होणाऱ्या मिनी बजेटकडून (Budget 2024) जनतेच्या मोठ्या अपेक्षा आहेत. आता मोदी सरकार जनतेच्या अपेक्षांवर कितीपत खरं उतरणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे... वाचा सविस्तर 

अर्थसंकल्पाचा 163 वर्षांचा इतिहास तुम्हाला माहिती आहे का ? बजेटबद्दल A टू Z माहिती सोप्या शब्दात समजून घ्या

Union Budget 2024 : अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) आज अंतरीम अर्थसंकल्प सादर करणार आहेत. मोदी सरकारच्या (Modi Government) दुसऱ्या टर्मचा हा अखेरचा अर्थसंकल्प (Union Budget 2024) असणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण सलग सहाव्यांदा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. एप्रिल-मे महिन्यात निवडणुका होणार असल्याने केंद्राकडून सर्वसामान्यांना खूश करण्याचा प्रयत्न होताना दिसेल.  अर्थसंकल्पाचा 163 वर्षांचा इतिहास तुम्हाला माहितेय का ? अर्थसंकल्पाचे फायदे काय? बजेटचा आठ शब्दांत अर्थ माहितेय का ? अर्थसंकल्प सकाळी 11 वाजताच का सादर करतात ? आतापर्यंत कुणी कुणी अर्थसंकल्प सादर केला? या सर्व प्रश्नांची उत्तर जाणून घेऊयात.... वाचा सविस्तर 

LPG Cylinder Price Hike: बजेटपूर्वीच महागाईचा भडका; एलपीजी महागला, नवे दर काय?

LPG Cylinder Price Hike: नवी दिल्ली : आज अर्थमंत्री निर्मला सीतारामण (Nirmala Sitharaman) संसदेत अंतरिम अर्थसंकल्प  (Interim Budget 2024) सादर करणार आहेत. यापूर्वीही देशात महागाईचा धक्का बसला आहे, प्रत्यक्षात 19 किलोचा व्यावसायिक गॅस सिलेंडर (LPG Cylinder Price Hike) तेल विपणन कंपन्यांमुळे महाग झाला आहे. IOCL च्या वेबसाईटवर देण्यात आलेल्या माहितीनुसार, व्यावसायिक सिलेंडरच्या किमती 14 रुपयांनी वाढवण्यात आल्या आहेत, त्यानंतर राजधानी दिल्लीत व्यावसायिक सिलेंडरची किंमत 1769.50 रुपये झाली आहे. नवे दर आज 1 फेब्रुवारी 2024 पासून लागू झाले आहेत... वाचा सविस्तर 

Budget 2024 Panchang : आज देशाचा अंतरिम अर्थसंकल्प, 1 फेब्रुवारीचे पंचांग काय सांगते? मुहूर्त, योग, नक्षत्र जाणून घ्या

Budget 2024 Panchang : हिंदू धर्म आणि ज्योतिषशास्त्रात (Astrology) शुभ मुहूर्त आणि योग इत्यादींना महत्त्व दिले गेले आहे, त्यामुळे शुभ कार्ये पंचांगानुसार केली जातात. गुरुवार, 1 फेब्रुवारी रोजी देशाचा अंतरिम अर्थसंकल्प सादर होईल तेव्हा ग्रहांची स्थिती कशी असेल ते जाणून घेऊया. आज कोणते शुभ, अशुभ योग आणि शुभ मुहूर्त असतील? वाचा सविस्तर 

Budget 2024 : बजेटमध्ये स्वस्त घरांना चालना मिळण्याची शक्यता, रिअल इस्टेट क्षेत्राला 'या' आहेत अपेक्षा

Budget 2024 : देशाचा अर्थसंकल्प (India Budget 2024) सादर होण्यासाठी अवघे काही तास शिल्लक आहेत. पुढील आर्थिक वर्षासाठी देशाच्या बहुआयामी विकासाची रूपरेषा ही अर्थसंकल्पात मांडण्यात येते. मात्र यावेळी चित्र थोडे वेगळे असेल कारण येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीमुळे संपूर्ण अर्थसंकल्पाऐवजी अंतरिम अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. त्यामुळे लोकही निवडणुकीच्या अर्थसंकल्पाची अपेक्षा करत आहेत. देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी तसेच सर्वसामान्यांसाठी विशेष महत्त्व असलेल्या रिअल इस्टेट क्षेत्राला (Real Estate) या अर्थसंकल्पाकडून काय अपेक्षा आहेत ते जाणून घेऊया... वाचा सविस्तर 

Budget 2024: जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असणाऱ्या चीनचं वर्षाचं बजेट किती?

Budget 2024: आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी (Lok Sabha Elections 2024) अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) गुरुवारी (1 फेब्रुवारी) अंतरिम अर्थसंकल्प (Union Budget 2024) सादर करणार आहेत. करदाते, शेतकरी आणि सरकारी कर्मचाऱ्यांना आकर्षित करण्यासाठी अर्थसंकल्पात अनेक महत्त्वाच्या  घोषणा केल्या जाऊ शकतात. चालू आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये, मोदी सरकारनं अनेक पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी भांडवली खर्चासाठी 10 लाख कोटी रुपयांची तरतूद केली होती, जेणेकरून देशात जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा निर्माण करता येतील. त्यामुळे आजच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांच्या पोतडीतून जनतेसाठी काय बाहेर पडणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे... वाचा सविस्तर 

VIDEO : लडाखमध्ये चिनी सैनिकांची घुसखोरी, मेंढपाळांसोबत घातला वादला

Chinese Army Incursion: लेह-लडाखमधील (ladakh) डोंगराळ भागात पुन्हा एकदा चीनच्या सैनिकांनी घुसखोरी केल्याचं समोर आलेय. चीनच्या पीपुल्‍स लिब्रेशन आर्मी (PLA) जवानांनी भारतीय मेंढपाळांना अडवण्याचा प्रयत्न केला. यावेळी हाणामारी आणि बाचाबाची झाल्याचं समोर आलेय. निशस्त्र असलेल्या भारतीय मेंढपाळांनी चिनी सैनिकांना धडा शिकवला. या प्रकरणाचा व्हिडीओ (Viral Video) सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. चिनी सैनिकांच्या भारतीय हद्दीतील घुसखोरीवरुन विरोधकांनी सत्ताधारी भाजपवर निशाणा साधलाय. काँग्रेसनं (Congress) व्हिडीओ पोस्ट करत टीकास्त्र सोडलेय. वाचा सविस्तर 

Horoscope Today 1 February 2024 : फेब्रुवारीचा पहिला दिवस खास! 12 राशीच्या लोकांसाठी कसा राहील? आजचे राशीभविष्य जाणून घ्या

Horoscope Today 1 February 2024 : राशीभविष्यानुसार, आज म्हणजेच 1 फेब्रुवारी 2024, गुरूवार हा महत्त्वाचा दिवस आहे. ग्रहांच्या चालीनुसार, वृषभ राशीच्या लोकांनी आज कोणालाही पैसे उधार देऊ नयेत, अन्यथा तुमचे पैसे अडकू शकतात. सिंह राशीच्या लोकांनी आज पैशाच्या बाबतीत थोडे सावध राहावे. सर्व राशीच्या लोकांसाठी गुरुवार कसा राहील? सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य जाणून घेऊया... वाचा सविस्तर 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis Office : उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या मंत्रालयातील कार्यालयाबाहेर महिलेकडून तोडफोडMaharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 04 PM 27 Sept 2024ABP Majha Headlines : 04 PM: 27 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Shirsat Mumbai : राऊतांवर दलाल नंबर 1 पिक्चर यायला हवा, शिरसाटांचा टोला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Haribhau Bagde: हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Devendra Fadnavis : मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
Sangli News : कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
Pune Gang Rape : पुण्यात धनदांडग्या बापांच्या पोरांच्या विकृतीचा कळस; प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करत नग्नावस्थेत फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाला टाकले
पुण्यात विकृतीचा कळस; प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करत नग्नावस्थेत फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाला टाकले
Embed widget