एक्स्प्लोर

Budget 2024 : बजेटमध्ये स्वस्त घरांना चालना मिळण्याची शक्यता, रिअल इस्टेट क्षेत्राला 'या' आहेत अपेक्षा

Real Estate Budget Expectations : या अर्थसंकल्पाकडून प्रत्येक क्षेत्राला मोठ्या अपेक्षा आहेत. या अर्थसंकल्पाकडून रिअल इस्टेट क्षेत्राला गृहकर्जावरील व्याजदरात घट होण्याची अपेक्षा आहे.

Budget 2024 : देशाचा अर्थसंकल्प (India Budget 2024) सादर होण्यासाठी अवघे काही तास शिल्लक आहेत. पुढील आर्थिक वर्षासाठी देशाच्या बहुआयामी विकासाची रूपरेषा ही अर्थसंकल्पात मांडण्यात येते. मात्र यावेळी चित्र थोडे वेगळे असेल कारण येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीमुळे संपूर्ण अर्थसंकल्पाऐवजी अंतरिम अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. त्यामुळे लोकही निवडणुकीच्या अर्थसंकल्पाची अपेक्षा करत आहेत. देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी तसेच सर्वसामान्यांसाठी विशेष महत्त्व असलेल्या रिअल इस्टेट क्षेत्राला (Real Estate) या अर्थसंकल्पाकडून काय अपेक्षा आहेत ते जाणून घेऊया,

गृहकर्जावरील कर कमी होण्याची अपेक्षा

अंतरिम अर्थसंकल्पाकडून रिअल इस्टेटच्या अपेक्षांबाबत, नाइट फ्रँक इंडियाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक शिशिर बैजल म्हणतात की, सर्वात जास्त लक्ष गृहनिर्माण योजनेवर आहे. स्वतःचे घर हे प्रत्येकाचे स्वप्न असते. प्रधानमंत्री आवास योजनेमुळे अनेकांचे हे स्वप्न पूर्ण झाले असले तरी अजूनही मोठ्या प्रमाणात लोक वंचित आहेत. गृहकर्जाची मुद्दल रक्कम आणि व्याजावर कर कपात वाढवून, ज्यांचे घर घेण्याचे स्वप्न अद्याप अपूर्ण आहे अशा लोकांना मदत केली जाऊ शकते.

व्याजावरील अनुदान वाढवून मदत होईल

प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत लोकांना परवडणारे घर खरेदी करण्यासाठी सरकारकडून अनुदान उपलब्ध आहे. ही सबसिडी योजना डिसेंबर 2024 मध्ये संपत आहे. रिअल इस्टेट क्षेत्र डिसेंबर 2025 पर्यंत एक वर्ष वाढवण्याची मागणी करत आहे. सध्या योजनेंतर्गत व्याज अनुदान 2.3 लाख ते 2.7 लाख रुपये आहे. त्यात वाढ केल्याने लोकांवरील गृहकर्ज EMI चा बोजा कमी होईल आणि अधिकाधिक लोक परवडणाऱ्या घरांच्या योजनेअंतर्गत घरे खरेदी करू शकतील.

रिअल इस्टेट कंपनी रुणवाल ग्रुपच्या सेल्स मार्केटिंग हेड लुसी रॉयचौधरी म्हणाल्या, 2024 मधील केंद्रीय निवडणुका लक्षात घेता, अर्थसंकल्प विकासाला चालना देण्याबरोबरच लोकसंख्येचा असेल अशी अपेक्षा आहे. ते म्हणाले की, निवासी क्षेत्रात सुरू असलेली वाढ कायम ठेवण्यासाठी आयकर दरात कपात करणे अत्यंत आवश्यक आहे जेणेकरून घर खरेदीदारांची परवड वाढेल.

या अर्थसंकल्पाकडून रिअल इस्टेट क्षेत्राच्या इतर मुख्य अपेक्षा :

  • आयकर कायद्याच्या कलम 24 अंतर्गत गृहकर्जाच्या व्याजावरील कर सवलत 2 लाखांवरून 5 लाखांपर्यंत वाढवणे.
  • कलम 80C अंतर्गत मुद्दलाच्या परतफेडीवर 1.5 लाख रुपयांची स्वतंत्र वार्षिक वजावट.
  • भाड्याच्या घरांसाठी प्रोत्साहन, 3 लाखांपर्यंतच्या भाड्याच्या उत्पन्नावर 100 टक्के सूट.
  • शहरी भागात सैन्य आणि रेल्वेच्या जमिनींवर उच्च घनतेच्या भाड्याच्या घरांचा विकास.
  • निवासी मालमत्तेवर दीर्घकालीन भांडवली नफ्याचा विस्तार.

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनातील आरोपीला मुंबईतून जामीन, चेतन पाटीलची सुटका
मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनातील आरोपीला मुंबईतून जामीन, चेतन पाटीलची सुटका
धक्कादायक! उल्हासनगरमध्ये 3 वर्षीय मुलीचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला, परिसरात खळबळ 
धक्कादायक! उल्हासनगरमध्ये 3 वर्षीय मुलीचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला, परिसरात खळबळ 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bachchu Kadu on Vidhan Sabha : अपक्षांचं सरकार येईल,मोठ्या पक्षांना आमचा पाठिंबा घ्यावाच लागेल..Jitendra Awhad Full PC : प्रतिभा पवारांची गेटवर अडवणूक प्रकरण, जितेंद्र आव्हाड अजितदादांवर कडाडलेSantosh Bangar on Vidhan Sabha : 25 हजारांच्या फरकाने सीट निघेल, मतदानानंतर संतोष बांगर निवांतRajesaheb Deshmukh : धनंजय मुंडे यांच्या गुंडानी मतदानाच्या मशीन फोडल्य,देशमुखांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनातील आरोपीला मुंबईतून जामीन, चेतन पाटीलची सुटका
मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनातील आरोपीला मुंबईतून जामीन, चेतन पाटीलची सुटका
धक्कादायक! उल्हासनगरमध्ये 3 वर्षीय मुलीचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला, परिसरात खळबळ 
धक्कादायक! उल्हासनगरमध्ये 3 वर्षीय मुलीचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला, परिसरात खळबळ 
श्रीमंतांच्या मुंबईत गरिबी टक्का, जिल्ह्यात सरासरी 42.59 टक्के मतदान; 10 मतदारसंघाची आकडेवारी समोर
श्रीमंतांच्या मुंबईत गरिबी टक्का, जिल्ह्यात सरासरी 42.59 टक्के मतदान; 10 मतदारसंघाची आकडेवारी समोर
Kolhapur News : शाळेचं गेट अंगावर पडून सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; लघूशंकेसाठी जात असताना घडली घटना
कोल्हापूर : शाळेचं गेट अंगावर पडून सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; लघूशंकेसाठी जात असताना घडली घटना
Bharat Gogawale : मंत्रिमंडळात बसणार, कोणत्याही खात्याचा मंत्री होण्यास तयार, भरत गोगावलेंनी किती हजार मतांनी जिंकणार ते सांगितलं
मंत्रिमंडळात बसणार, कोणत्याही खात्याचा मंत्री होण्यास तयार, भरत गोगावलेंनी किती हजार मतांनी जिंकणार ते सांगितलं
SSC & HSC Board Exam Time Table 2025 : मोठी बातमी! दहावी अन् 12 वी बोर्ड परीक्षेचं वेळापत्रक जाहीर, यंदा 8 दिवस आधीच परीक्षा
मोठी बातमी! दहावी अन् 12 वी बोर्ड परीक्षेचं वेळापत्रक जाहीर, यंदा 8 दिवस आधीच परीक्षा
Embed widget