Budget 2024 Panchang : आज देशाचा अंतरिम अर्थसंकल्प, 1 फेब्रुवारीचे पंचांग काय सांगते? मुहूर्त, योग, नक्षत्र जाणून घ्या
Budget 2024 Panchang : देशाचा अंतरिम अर्थसंकल्प आज 1 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 11 वाजता सादर केला जाईल. पंचांगानुसार, बजेट दिवसाचे मुहूर्त, योग, नक्षत्रांबद्दल जाणून घ्या
Budget 2024 Panchang : हिंदू धर्म आणि ज्योतिषशास्त्रात (Astrology) शुभ मुहूर्त आणि योग इत्यादींना महत्त्व दिले गेले आहे, त्यामुळे शुभ कार्ये पंचांगानुसार केली जातात. गुरुवार, 1 फेब्रुवारी रोजी देशाचा अंतरिम अर्थसंकल्प सादर होईल तेव्हा ग्रहांची स्थिती कशी असेल ते जाणून घेऊया. आज कोणते शुभ, अशुभ योग आणि शुभ मुहूर्त असतील?
अर्थसंकल्पाचा प्रत्येकाच्या जीवनावरील परिणाम
देशाचा अंतरिम अर्थसंकल्प 2024 गुरुवार, 1 फेब्रुवारी रोजी सादर केला जाणार आहे. मोठ्या उद्योगपतींपासून सर्वसामान्यांपर्यंत सर्वांच्या नजरा अर्थसंकल्पाकडे लागल्या आहेत. याचे कारण अर्थसंकल्पाचा प्रत्येकाच्या जीवनावर परिणाम होतो. गुरुवारी 1 फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन संसदेत अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहेत. बुधवार, 31 जानेवारी 2024 रोजी, नवीन संसदेत, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी संसदेच्या दोन्ही सभागृहांना संबोधित करताना, केंद्र सरकारच्या गेल्या 10 वर्षातील कामांची माहिती दिली आणि सांगितले की, मागील वर्ष भारतासाठी ऐतिहासिक कामगिरीने भरलेले होते. आता अंतरिम अर्थसंकल्प गुरुवारी 1 फेब्रुवारी रोजी संसदेत सादर होणार आहे. 1 फेब्रुवारी 2024 रोजी संसदेत सादर होणारा अर्थसंकल्प अंतरिम अर्थसंकल्प 2024 असेल. लोकसभेच्या निवडणुका या वर्षी एप्रिल किंवा मे महिन्यात होऊ शकतात. अशा स्थितीत 1 फेब्रुवारीला होणारा अंतरिम अर्थसंकल्प 'व्होट ऑन अकाउंट'सारखाच असेल. या अर्थसंकल्पात सरकार स्थापने वेळी महसूल आणि खर्च आदींचे अंदाजपत्रक मांडण्यात येणार आहे.
ग्रहांची स्थिती कशी असेल? शुभ, अशुभ योग आणि शुभ मुहूर्त जाणून घ्या
देशाच्या अर्थव्यवस्थेच्या सुरळीत कामकाजात कोणतीही अडचण येऊ नये आणि अर्थव्यवस्थेवर विश्वास कायम राहावा यासाठी अंतरिम अर्थसंकल्प सादर करणे आवश्यक आहे. मात्र, अर्थसंकल्पात काय विशेष आहे हे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पीय भाषणाला सुरुवात केल्यानंतरच कळेल. आज, 1 फेब्रुवारी रोजी देशाचा अंतरिम अर्थसंकल्प सादर होईल तेव्हा ग्रहांची स्थिती कशी असेल ते जाणून घेऊया. आज कोणते शुभ, अशुभ योग आणि शुभ मुहूर्त असतील? अंतरिम बजेट दिवसाचे पंचांग जाणून घ्या
पंचांगानुसार, गुरुवार, 01 फेब्रुवारी 2024 हा पौष महिन्याच्या कृष्ण पक्षाचा सातवा दिवस आहे. पंचांगानुसार अर्थसंकल्पाच्या दिवशी चित्रा आणि स्वाती नक्षत्र असतील.
पक्ष : कृष्ण
योग: धृती योग (31 जानेवारी 11:40 सकाळी - 01 फेब्रुवारी 12:27 दुपारी), शूल (फेब्रुवारी 01 12:27 दुपारी - 02 फेब्रुवारी 12:54 दुपारी)
दिवस: गुरुवार
तिथी : सप्तमी
नक्षत्र: चित्रा (01 फेब्रुवारी 01:08 रात्री - 02 फेब्रुवारी 03:49 रात्री),
स्वाती (फेब्रुवारी 02 03:49 रात्री - 03 फेब्रुवारी 05:57 रात्री)
करण : वणिज (फेब्रुवारी 01 12:53 रात्री - 01 फेब्रुवारी 02:04 दुपारी),
विष्टी (फेब्रुवारी 01 02:04 दुपारी - 02 फेब्रुवारी 03:08 रात्री)
बव (फेब्रुवारी 02 03:08 रात्री - 02 फेब्रुवारी 04:03 दुपारी)
1 फेब्रुवारी 2024 चा शुभ मुहूर्त
अभिजीत मुहूर्त - दुपारी 12:18 ते 01:02 पर्यंत
अमृत काल - रात्री 08:42 ते 10:28 पर्यंत
ब्रह्म मुहूर्त - सकाळी 05:34 ते 06:22
बजेट दिवसाचा अशुभ मुहूर्त
दूर्मुहूर्त: दुपारी 12:18 ते 01:20 पर्यंत
कुलिक : सकाळी 09:55 ते 11:17 पर्यंत
राहु काल : 02:02 ते दुपारी 3:24
यमघंट: सकाळी 07:11 ते 08:33
वर्ज्यम: सकाळी 10:02 ते 11:49 पर्यंत
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: