Morning Headlines 18th November : देश विदेशातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर, वाचा Morning News
देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...
देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...
LPG Price Cut : दिवाळीनंतर महागाईतून दिलासा! एलपीजीच्या दरात 78 रुपयांची कपात, मुंबईत गॅस सिलेंडरचा दर काय?
LPG Gas Cylinder Price : आज तेल कंपन्यांनी सर्वसामान्यांच्या दिलासा दिला आहे. महागाईच्या (Inflation) गर्तेत अडकलेल्या सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे एलपीजी (LPG) दरात कपात करण्यात आली आहे. भारतीय तेल कंपन्यांनी नवे दर जारी केले असून एलपीजीचे दर कमी करण्यात आली आहेत. तेल वितरण कंपन्यांनी आज गॅस सिलेंडर 78 रुपयांनी स्वस्त झाला आहे. वाचा सविस्तर
Kulgam Encounter : जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये लष्कर-ए-तोएबाविरोधात मोठी कारवाई! 5 दहशतवाद्यांचा खात्मा
Jammu Kashmir News : जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय लष्कराला (Jammu Kashmir Encounter) मोठं यश आलं आहे. सैन्य दलाने पाच दहशतवाद्यांना (Terrorist Encounter) कंठस्नान घातलं आहे. जम्मू-काश्मीरमधील कुलगाम सेक्टरमध्ये लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये मोठी चकमक झाली, यात भारतीय लष्कराला मोठं यश मिळालं आहे. सैन्य दलाने लष्कर-ए-तोएबाच्या पाच दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. भारतीय लष्कराने जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात मोहिम हाती घेतली आहे, यामध्ये पोलिसांच्या मदतीने सर्च ऑपरेशन राबवलं जात आहे. वाचा सविस्तर
World Cup 2023 : जगातील सर्वात मोठ्या मैदानावर विश्वचषकाचा महामुकाबला! टीम इंडिया नवा इतिहास रचण्यासाठी सज्ज
India vs Australia, World Cup 2023 : जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियममध्ये (Largest Stadium in The World) महामुकाबला रंगणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात विश्वचषक 2023 चा (ODI World Cup 2023 Final Match) महाअंतिम सामना रंगणार आहे. हा सामना अहमदाबाद (Ahmedabad) येथील नरेंद्र मोदी स्टेडियम (Narendra Modi Stadium) मध्ये रविवारी, 19 नोव्हेंबर रोजी दुपारी 2 वाजता पाहायला मिळणार आहे. नरेंद्र मोदी स्टेडियम हे जगातील सर्वात मोठं क्रिकेटचं मैदान आहे. वाचा सविस्तर
Small Saving Schemes : छोट्या बचत योजनांचे मोठे फायदे! गुंतवणूकीची हमी, भरघोस परतावा आणि बरंच काही
Benefits of Small Saving Schemes : सरकारकडून अनेक छोट्या-मोठ्या बचत योजना चालवल्या जातात. फक्त मोठ्या नाही तर, लहान बचत योजनांमध्ये गुंतवणूक केल्यासह चांगला फायदा होतो. छोट्या बचत योजनांमध्ये सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी म्हणजेच पीपीएफ (PPF), ज्येष्ठ नागरिक बचत योजना, सुकन्या समृद्धी योजना यासारख्या काही योजनांचा समावेश होतो. या योजना सर्वसामान्यांसाठी अत्यंत फायदेशीर ठरत आहेत. त्यामुळे लहान बचत योजना लोकांमध्ये खूप लोकप्रिय आहेत. वाचा सविस्तर
18 November In History : थोरले माधवराव पेशवे यांचे निधन, व्ही. शांताराम यांचा जन्म, वाघाला राष्ट्रीय प्राण्याचा दर्जा; आज इतिहासात
मुंबई : 18 नोव्हेंबर म्हणजेच आजच्याच दिवशी देशात व विदेशात काही महत्वपूर्ण घटना घडल्या होत्या, सोबतच काही प्रसिध्द व्यक्तींचा जन्म झाला होता. इतिहासात आजच्या दिवशी घडलेल्या संपूर्ण महत्वपूर्ण बाबींचा आढावा आपण आजच्या दिनविशेषमार्फत घेणार आहोत. थोरले पेशवा माधवराव यांचं आजच्याच दिवशी निधन झालं होतं. आजचा दिवस देशभरात निसर्गोपचार दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे. हे पाचवे वर्ष आहे. आज व्ही शांताराम यांचा जन्मदिवसही आहे. आजच्या दिवशी इतिहासात कोणकोणत्या महत्वपूर्ण घटना घडल्या होत्या यांची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. तसंच, आजच्या दिवशी असणारे दिग्गजांचे जन्मदिवस आणि निधन झालेल्या महत्वपूर्ण व्यक्तींबद्दल थोडक्यात जाणून घ्या. वाचा सविस्तर...
Horoscope Today 18 November 2023 : शनिवारच्या दिवशी कोणावर असेल शनिदेवाची कृपा? 12 राशींचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या
Horoscope Today 18 November 2023 : राशीभविष्यानुसार आज म्हणजेच 18 नोव्हेंबर 2023 रोजी शनिवार हा महत्त्वाचा दिवस आहे. या दिवशी शनिदेवाच्या पूजेला विशेष महत्त्व आहे. शनी महाराजांची कृपा कोणावर होणार आहे? शनिवार कसा असेल तुमच्यासाठी? जाणून घ्या आजचे राशीभविष्य. वाचा सविस्तर