World Cup 2023 : जगातील सर्वात मोठ्या मैदानावर विश्वचषकाचा महामुकाबला! 132000 प्रेक्षक अनुभवणार अविस्मरणीय क्षण, टीम इंडिया नवा इतिहास रचण्यासाठी सज्ज
IND vs AUS, World Cup 2023 : जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडिअममध्ये विश्वचषक 2023 चा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगणार आहे.
India vs Australia, World Cup 2023 : जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियममध्ये (Largest Stadium in The World) महामुकाबला रंगणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात विश्वचषक 2023 चा (ODI World Cup 2023 Final Match) महाअंतिम सामना रंगणार आहे. हा सामना अहमदाबाद (Ahmedabad) येथील नरेंद्र मोदी स्टेडियम (Narendra Modi Stadium) मध्ये रविवारी, 19 नोव्हेंबर रोजी दुपारी 2 वाजता पाहायला मिळणार आहे. नरेंद्र मोदी स्टेडियम हे जगातील सर्वात मोठं क्रिकेटचं मैदान आहे.
अंतिम सामन्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया आमने-सामने
साबरमती नदीच्या काठावर बनवलेले नरेंद्र मोदी स्टेडियम (Narendra Modi Stadium Pitch) जगातील सर्वात मोठं क्रिकेट मैदान आहे. या मैदानाचे सौंदर्यही पाहण्यासारखं आहे. रविवारी या मैदानावर विश्वचषकाचा अंतिम सामना रंगणार आहे. या अंतिम सामन्यात टीम इंडियासमोर ऑस्ट्रेलियाचं आव्हान असणार आहे. या सामन्याआधी नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमचा इतिहास आणि त्याची वैशिष्ट्ये जाणून घ्या.
Air show with National Anthem of India preparation at Narendra Modi Stadium. 🇮🇳
— Johns. (@CricCrazyJohns) November 17, 2023
- This is beautiful. [ICC] pic.twitter.com/08fhHf8IGq
जगातील सर्वात मोठ्या मैदानावर महामुकाबला
नरेंद्र मोदी स्टेडियम विश्वातील सर्वात मोठं क्रिकेट स्टेडियम आहे. नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये 132000 प्रेक्षक सामना पाहू शकणार आहेत. याआधी ऑस्ट्रेलियाचे मेलबर्न क्रिकेट ग्राउंड (Melbourne Cricket Ground, Australia) हे जगातील सर्वात मोठे मैदान होते, पण आता या स्टेडियमने मेलबर्न क्रिकेट ग्राउंडला मागे टाकलं आहे.
Main functions at Narendra Modi Stadium ahead of the final:
— Johns. (@CricCrazyJohns) November 17, 2023
- Air show by Suryakiran Acrobatic team.
- All the World Cup winning captains will be honoured.
- Bcci officials will give special Blazer to World Cup winning captains.
- Performance by Pritam. pic.twitter.com/nVPw354xwB
नरेंद्र मोदी स्टेडियमचा इतिहास
अहमदाबादमधील हे स्टेडियम हे मोटेरा स्टेडियम (Motera Stadium) नावानेही ओळखलं जातं. हे मैदान 1982 मध्ये पूर्ण झालं. पण, त्यावेळी मैदानात केवळ 49 हजार प्रेक्षक बसण्याची क्षमता होती. 2015 साली पंतप्रधान आणि गुजरात क्रिकेट असोसिएशनचे तत्कालीन अध्यक्ष नरेंद्र मोदी यांनी स्टेडियम पुन्हा नव्याने बांधण्याचा निर्णय घेतला. 2020 मध्ये स्टेडियम पूर्ण झाले. आता या स्टेडियममध्ये 132000 चाहते सामना पाहू शकतात. हे जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम आहे. यापूर्वी ऑस्ट्रेलियाचे मेलबर्न क्रिकेट ग्राउंड हे जगातील सर्वात मोठे मैदान होतं, ज्यावर 90 हजार चाहत्यांना सामना पाहण्यासाठी व्यवस्था होती.
नरेंद्र मोदी स्टेडियमची खास वैशिष्ट्ये
हे मैदान सुमारे 63 एकरमध्ये पसरलेले आहे, याला 4 गेट आहेत. याशिवाय नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये 4 ड्रेसिंग रूम आहेत. क्रिकेट स्टेडियममध्ये साधारणपणे दोन ड्रेसिंग रूम असतात. नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये सरावासाठी 6 इनडोअर खेळपट्ट्या आहेत, तर 3 मैदानी खेळपट्ट्या बनवण्यात आल्या आहेत. या स्टेडियममध्ये क्रिकेट अकादमी आहे. या स्टेडियममध्ये चाहत्यांच्या बसण्यासाठी केलेली व्यवस्था उत्तम आहे.
ऐतिहासिक क्षणांचा साक्षीदार
हे मैदान अनेक मोठ्या विक्रमांचे साक्षीदार आहे. या मैदानावर सुनील गावस्कर यांनी 1986-87 मध्ये पाकिस्तानविरुद्ध 10 हजार कसोटी धावांचा आकडा गाठला होता. सुनील गावसकर हे कसोटी इतिहासात 10 हजार धावा करणारे पहिले फलंदाज होते. फेब्रुवारी 1994 मध्ये कपिल देव यांनी या मैदानावर सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम केला होता, त्यांनी माजी भारतीय कर्णधार सर रिचर्ड हॅडली यांना मागे टाकले होते. यानंतर सचिन तेंडुलकरने 2013 मध्ये या मैदानावर 30 हजार आंतरराष्ट्रीय धावा केल्या. अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प फेब्रुवारी 2020 मध्ये भारतात आले होते, तेव्हा याच मैदानावर 'नमस्ते ट्रम्प' कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.