एक्स्प्लोर

Morning Headlines 18th January: देश विदेशातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर, वाचा मॉर्निंग न्यूज

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील... 

Ram Mandir Pran Pratishtha: क्रेनच्या मदतीनं राम मंदिर परिसरात पोहोचली रामललाची मूर्ती; आज गर्भगृहात स्थापना

Ram Mandir Pran Pratishtha: नवी दिल्ली : येत्या 22 जानेवारीला अयोध्येतील (Ayodhya) भव्य राम मंदिरात (Ram Mandir) रामललाचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा पार पडणार आहे. अयोध्येच्या राम मंदिरात प्रभू रामललाच्या अभिषेकचा मुहूर्त जवळ आला आहे. अयोध्येत भक्तांची रेलचेल वाढली असून तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यासाठी अयोध्येत मोठी तयारी सुरू असून  प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पुजाविधींना सुरुवात झाली आहे. बुधवारी (17 जानेवारी) या विधींच्या दुसऱ्या दिवशी रामललाची मूर्ती मंदिर परिसरात नेण्यात आली होती. अशातच आज मूर्ती मंदिरातील गर्भगृहात ठेवली जाणार आहे... वाचा सविस्तर 

Ayodhya Ram Mandir : आज रामललाचा मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश, जलाधिवास-गंगाधीवास होणार, काय आहे ही परंपरा? जाणून घ्या 

Ayodhya Ram Mandir : अयोध्येत रामललाला त्यांच्या मंदिरात विराजमान करण्याची तयारी सुरू झाली आहे. आज 18 जानेवारी 2024 हा राम मंदिर विधींचा तिसरा दिवस आहे. 22 जानेवारीला रामनगरीच्या नव्याने बांधलेल्या मंदिरात रामललाच्या मूर्तीला अभिषेक केला जाईल, मात्र आज गर्भगृहात रामलला प्रवेश करणार आहे. यासोबतच आज राममंदिरात जलाधिवास-गंगाधीवास होणार आहे. काय आहे ही परंपरा? जाणून घ्या... वाचा सविस्तर 

Suraj Chavan : आदित्य ठाकरेंना धक्का! सुरज चव्हाण यांना अटक, महापालिका खिचडी घोटाळ्याप्रकरणी ईडीची कारवाई

मुंबई: मुंबई पालिकेतील कथित खिचडी घोटाळा प्रकरणी (BMC Khichdi Scam) शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांचे विश्वासू सुरज चव्हाण (Suraj Chavan)  यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. कोव्हिड काळातील खिचडी घोटाळा प्रकरणी या पूर्वीही सुरज चव्हाण यांची ईडीकडून चौकशी करण्यात आली होती. आता त्यांना अटक करण्यात आली आहे... वाचा सविस्तर 

Who Is Suraj Chavan : युवासेनेचा साधारण कार्यकर्ता, आदित्य ठाकरेंचा कणा ते ठाकरे गटाच्या सचिवपदाची धुरा; खिचडी घोटाळ्यात अटक झालेले सूरज चव्हाण कोण?

ED Arrests Suraj Chavan : मुंबई : मुंबई महापालिकेत (Mumbai Municipal Corporation) कोरोना (Coronavirus Updates) काळात झालेल्या कथित खिचडी घोटाळा प्रकरणात (Khichdi Scam Case) ठाकरे गटाचे (Thackeray Group) सचिव सूरज चव्हाण (Suraj Chavan) यांना ईडीकडून (ED) अटक करण्यात आली आहे. आज त्यांना ईडीच्या विशेष पीएमएलए कोर्टात हजर केलं जाणार आहे. आमदार आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय म्हणून सूरज चव्हाण यांची ओळख आहे. आदित्य ठाकरेंच्या निकटवर्तींयावर पहिल्यांदाच ईडीकडून कारवाई करण्यात आली आहे... वाचा सविस्तर 

Mumbai Airport: लेट फ्लाईट, रनवेवर बसूनच प्रवासी जेवले, BCAS चा दणका; Indigo ला 1.2 कोटींचा, तर मुंबई विमानतळाला 90 लाखांचा भुर्दंड

Mumbai Airport: इंडिगो एअरलाईन (Indigo Airline) आणि मुंबई विमानतळ (Mumbai Airport) प्रशासनाला Bureau of Civil Aviation Security अर्थात BCASनं दणका दिला आहे. मुंबई विमानतळावर विमानाच्या शेजारीच बसून प्रवासी बसल्याप्रकरणी इंडिगोला 1 कोटी 20 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे, तर मुंबई विमानतळाला 60 लाखांचा दंड भरावा लागणार आहे... वाचा सविस्तर 

दावोसमध्ये 3 लाख 53 हजार कोटींचा विक्रमी करार, महाराष्ट्रात 2 लाख रोजगार निर्मिती होणार

मुंबई : स्वित्झर्लंडमधील दावोसमध्ये सुरु असलेल्या जागतिक आर्थिक परिषदेत दोन दिवसांत महाराष्ट्राने 3 लाख 10 हजार 850 कोटीचे सामंजस्य  करार केले आहेत. त्याशिवाय गुरुवारी 42 हजार 825 कोटींचे करार होत आहेत. अशा रितीने 3 लाख 53 हजार 675 लाख कोटींचे विक्रमी सामंजस्य  करार करीत असल्याची  माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. याव्यतिरिक्त 1 लाख कोटींच्या गुंतवणुकीत उद्योगांनी स्वारस्य दाखवले असल्याने राज्यावर जागतिक उद्योग आणि गुंतवणूकदारांचा विश्वास वाढला आहे अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी त्यांचे आभारही मानले आहेत. या करारांमुळे राज्यात 2 लाख इतक्या मोठ्या संख्येने रोजगार निर्मिती होणार आहे. वाचा सविस्तर 

बदले की आग! इराणच्या एअरस्ट्राईकला 24 तासही उलटले नाहीत, तोच पाकिस्तानचा इराणवर हल्ला, दहशतवादी स्थळं उध्वस्थ केल्याचा दावा

Pakistan Targeted Militant Targets In Iran: नवी दिल्ली: इराणनं पाकिस्तानवर (Pakistan) क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ला चढवत दहशतवादी तळं उध्वस्थ केली होती. इराणच्या हल्ल्यानंतर अस्वस्थ झालेल्या पाकिस्ताननं आता इराणवर एअरस्ट्राईक केल्याचा दावा केला. इराणच्या हल्याच्या एका दिवसानंतर पाकिस्ताननं इराणच्या दहशतवादी स्थळांवर हल्ला चढवल्याचा दावा केला आहे. पाकिस्तानच्या मीडियानं दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्ताननं इराणमधील अनेक दहशतवादी लक्ष्यांवर हल्ले केले आहेत. हा हल्ला कधी आणि कुठे करण्यात आला याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. या हल्ल्याबाबत इराण किंवा पाकिस्तानकडून अद्याप कोणतंही अधिकृत वक्तव्य जारी करण्यात आलेलं नाही... वाचा सविस्तर 

Horoscope Today 18 January 2024 : आजचा गुरुवार खास! 12 राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस कसा राहील? आजचे राशीभविष्य जाणून घ्या

Horoscope Today 18 January 2024 : राशीभविष्यानुसार, आज म्हणजेच 18 जानेवारी 2024 रोजी, गुरुवार हा महत्त्वाचा दिवस आहे. ग्रहांच्या चालीनुसार, वृषभ राशीच्या लोकांना आज खूप मेहनत करावी लागेल, तरच तुम्हाला यश मिळेल. आज सिंह राशीचे लोक त्यांच्या व्यवसायाला नवीन रूप देऊ शकतात, यामुळे तुम्हाला आर्थिक फायदा होईल. सर्व राशीच्या लोकांसाठी गुरुवार कसा राहील? सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या... वाचा सविस्तर 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
Adult Web Series On OTT : फक्त 'मस्तराम'च नाही तर 'या' वेब सीरिजमध्येही हॉट सीन्सचा भडिमार, कुटुंबासह चुकूनही पाहू नका
फक्त 'मस्तराम'च नाही तर 'या' वेब सीरिजमध्येही हॉट सीन्सचा भडिमार, कुटुंबासह चुकूनही पाहू नका
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Majha Gaon Majha Jilha : गावा-खेड्यातील बातम्या : माझं गाव माझा जिल्हा : 07 AM: 25 June 2024TOP 100 Headlines : सकाळच्या 100 बातम्यांचा वेगवान आढावा : 25 June 2024 : 07 AM :  ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 26 June 2024Nagesh Patil Ashtikar Lok Sabha Oath : बाळासाहेबांना स्मरुन शपथ, अध्यक्षांनी रोखलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
Adult Web Series On OTT : फक्त 'मस्तराम'च नाही तर 'या' वेब सीरिजमध्येही हॉट सीन्सचा भडिमार, कुटुंबासह चुकूनही पाहू नका
फक्त 'मस्तराम'च नाही तर 'या' वेब सीरिजमध्येही हॉट सीन्सचा भडिमार, कुटुंबासह चुकूनही पाहू नका
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
Amol Mitkari : प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
Pune : पुण्यात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही तरूणांची ओळख पटली, मुंबईचा तरूण आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर
पुण्यात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही तरूणांची ओळख पटली, मुंबईचा तरूण आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर
''बेट्या, तुझा टांगा उलटवणार'', मनोज जरांगेंचा भुजबळांना इशारा; मराठा-ओबीसी समाजाला महत्त्वाचं आवाहन
''बेट्या, तुझा टांगा उलटवणार'', मनोज जरांगेंचा भुजबळांना इशारा; मराठा-ओबीसी समाजाला महत्त्वाचं आवाहन
Embed widget