एक्स्प्लोर

बदले की आग! इराणच्या एअरस्ट्राईकला 24 तासही उलटले नाहीत, तोच पाकिस्तानचा इराणवर हल्ला, दहशतवादी स्थळं उध्वस्थ केल्याचा दावा

हमारे बदले की आग, हे वाक्य पाकिस्तानला अगदी हुबेहुब लागू होतंय. इराणच्या एअरस्ट्राईकला 24 तासही उलटले नाहीत, तोच पाकिस्ताननं इराणवर हल्ला चढवला आहे.

Pakistan Targeted Militant Targets In Iran: नवी दिल्ली: इराणनं पाकिस्तानवर (Pakistan) क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ला चढवत दहशतवादी तळं उध्वस्थ केली होती. इराणच्या हल्ल्यानंतर अस्वस्थ झालेल्या पाकिस्ताननं आता इराणवर एअरस्ट्राईक केल्याचा दावा केला. इराणच्या हल्याच्या एका दिवसानंतर पाकिस्ताननं इराणच्या दहशतवादी स्थळांवर हल्ला चढवल्याचा दावा केला आहे. पाकिस्तानच्या मीडियानं दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्ताननं इराणमधील अनेक दहशतवादी लक्ष्यांवर हल्ले केले आहेत. हा हल्ला कधी आणि कुठे करण्यात आला याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. या हल्ल्याबाबत इराण किंवा पाकिस्तानकडून अद्याप कोणतंही अधिकृत वक्तव्य जारी करण्यात आलेलं नाही. 

पाकिस्तानी माध्यमांमार्फत समोर आलेल्या माहितीनुसार, इराणमधील बीएलए दहशतवादी तळांना लक्ष्य करून हे हल्ले करण्यात आले आहेत. पाकिस्तानचा दावा आहे की, बलुचिस्तान लिबरेशन आर्मी (BLA), बलुचिस्तान लिबरेशन फोर्स (BLF) यासारखे बलूच फुटीरतावादी दहशतवादी गट इराणमध्ये सक्रिय आहेत, जे पाकिस्तानविरोधी कारवाया करतात.

पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या दाव्यानुसार, बलुचिस्तान लिबरेशन फ्रंट आणि बलुचिस्तान लिबरेशन आर्मी इराणमध्ये राहून पाकिस्तानविरुद्ध कट रचतात आणि हल्ले करतात. इराण अशा संघटनांना आश्रय देऊन मदत करतो, असा पाकिस्तानचा दावा आहे. मात्र, जेव्हा जेव्हा पाकिस्ताननं इराणवर असे आरोप केले आहेत, तेव्हा तेव्हा इराणनं नेहमीच पाकिस्तानचे सर्व दावे फेटाळून लावले आहेत.

दोन्ही देशांमध्ये बंधुत्वाचे संबंध, हल्ला पाकिस्तानवर नाहीतर दहशतवाद्यांवर : इराणचे परराष्ट्र मंत्री

पाकिस्तानी हल्ल्यापूर्वी इराणचे परराष्ट्र मंत्री आमिर अब्दुल्लाहियान म्हणाले होते की, दोन्ही देशांमध्ये बंधुत्वाचे संबंध आहेत. इराणनं पाकिस्तानच्या हद्दीत हल्ला केला असला तरी हा हल्ला पाकिस्तानवर नसून पाकिस्तानात लपलेल्या इराणी दहशतवाद्यांवर आहे, असं परराष्ट्रमंत्र्यांनी म्हटलं होतं. ते म्हणाले, "जैश उल-अदल ही इराणी दहशतवादी संघटना आहे. त्यांनी पाकिस्तानच्या सिस्तान-बलुचिस्तान प्रांतातील काही भागांत आश्रय घेतला आहे."

पाकिस्तान-इराण संबंध कसे आहेत?

पाकिस्तान आणि इराणमध्ये अभूतपूर्व तणाव सुरू आहे. यापूर्वी दोन्ही देशांमधील संबंध फारसे चांगले नसले तरी याआधी परिस्थिती इतकी बिघडलेली नव्हती. इराण आणि पाकिस्तान दोन्ही देशांच्या सीमा लागून आहेत, तरीही दोघांमध्ये परस्परावलंबी संबंध नाहीत. इराण हा शिया बहुसंख्य देश आहे तर पाकिस्तान हा सुन्नी बहुसंख्य देश आहे. दोन्ही देश वेळोवेळी एकमेकांवर दहशतवादी हल्ल्यांचे आरोप करत असतात. इराणनं अनेकवेळा पाकिस्तानवर सीमेपलीकडून अंमली पदार्थांची तस्करी होत असल्याचा आरोप केला आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Loksabha Election : देशात चौथ्या टप्प्यात पाचपर्यंत 62.56 टक्के मतदान; बंगालमध्ये सर्वाधिक, महाराष्ट्रात किती?
देशात चौथ्या टप्प्यात पाचपर्यंत 62.56 टक्के मतदान; बंगालमध्ये सर्वाधिक, महाराष्ट्रात किती?
मुंबईतील महाकाय बॅनर दुर्घटनेत 3 ठार, 59 जणांना बाहेर काढलं; अद्यापही 38 जण अडकले
मुंबईतील महाकाय बॅनर दुर्घटनेत 3 ठार, 59 जणांना बाहेर काढलं; अद्यापही 38 जण अडकले
राजस्थानला मोठा धक्का, मोक्याच्या क्षणी स्टार प्लेअरची आयपीएलमधून माघार! 
राजस्थानला मोठा धक्का, मोक्याच्या क्षणी स्टार प्लेअरची आयपीएलमधून माघार! 
Uddhav Thackeray: ''वाट लगावा दी न पापा...'' उद्धव ठाकरेंनी सांगितली पंतप्रधान मोदींची 5 ठळक कामे
''वाट लगावा दी न पापा...'' उद्धव ठाकरेंनी सांगितली पंतप्रधान मोदींची 5 ठळक कामे
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Eknath Shinde Ghatkopar : घाटकोपरमध्ये होर्डिंग दुर्घटना, पालघरची  सभा आटपून एकनाथ शिंदे घटनास्थळीGhatkopar Hoarding Video : 'ऑपरेशन होर्डिंग'ला पहिलं यश,  7 ते 8 जणांना काढलं बाहेर!Mumbai Rain Tree Collapsed : अवघ्या एका फुटावर कोसळलं झाड, चिमुकले थोडक्यात बचावले! ABP MajhaGhatkopar Hoarding Video : मर गया...मर गया, घाटकोपरमधील होर्डिंग कोसळतानाचा LIVE व्हिडीओ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Loksabha Election : देशात चौथ्या टप्प्यात पाचपर्यंत 62.56 टक्के मतदान; बंगालमध्ये सर्वाधिक, महाराष्ट्रात किती?
देशात चौथ्या टप्प्यात पाचपर्यंत 62.56 टक्के मतदान; बंगालमध्ये सर्वाधिक, महाराष्ट्रात किती?
मुंबईतील महाकाय बॅनर दुर्घटनेत 3 ठार, 59 जणांना बाहेर काढलं; अद्यापही 38 जण अडकले
मुंबईतील महाकाय बॅनर दुर्घटनेत 3 ठार, 59 जणांना बाहेर काढलं; अद्यापही 38 जण अडकले
राजस्थानला मोठा धक्का, मोक्याच्या क्षणी स्टार प्लेअरची आयपीएलमधून माघार! 
राजस्थानला मोठा धक्का, मोक्याच्या क्षणी स्टार प्लेअरची आयपीएलमधून माघार! 
Uddhav Thackeray: ''वाट लगावा दी न पापा...'' उद्धव ठाकरेंनी सांगितली पंतप्रधान मोदींची 5 ठळक कामे
''वाट लगावा दी न पापा...'' उद्धव ठाकरेंनी सांगितली पंतप्रधान मोदींची 5 ठळक कामे
Heena Gavit : नंदुरबारच्या भाजप उमेदवार हिना गावितांचा मोबाईल हॅक, काँग्रेसवर केला गंभीर आरोप
नंदुरबारच्या भाजप उमेदवार हिना गावितांचा मोबाईल हॅक, काँग्रेसवर केला गंभीर आरोप
Ghatkopar Hoarding Accident : घाटकोपरमधील घटना ही अत्यंत दुर्दैवी, उच्चस्तरीय चौकशी करून कारवाई करण्याचं मुख्यमंत्री शिंदेंचं आश्वासन
घाटकोपरमधील घटना ही अत्यंत दुर्दैवी, उच्चस्तरीय चौकशी करून कारवाई करण्याचं मुख्यमंत्री शिंदेंचं आश्वासन
ना रोहित, ना सूर्या, ना शिवम दुबे.. आयपीएलमध्ये षटकार ठोकणाऱ्यात विराट दुसरा, पहिल्या क्रमांकावर कोण? 
ना रोहित, ना सूर्या, ना शिवम दुबे.. आयपीएलमध्ये षटकार ठोकणाऱ्यात विराट दुसरा, पहिल्या क्रमांकावर कोण? 
बारामतीचा प्रसाद अहमदनगरकरांना मानवणारा नाही, विखे पाटलांनी सांगितली मतदान केंद्रातील पत्रकामागची स्टोरी
बारामतीचा प्रसाद अहमदनगरकरांना मानवणारा नाही, विखे पाटलांनी सांगितली मतदान केंद्रातील पत्रकामागची स्टोरी
Embed widget