एक्स्प्लोर

Horoscope Today 18 January 2024 : आजचा गुरुवार खास! 12 राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस कसा राहील? आजचे राशीभविष्य जाणून घ्या

Horoscope Today 18 January 2024 : व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी आजचा दिवस किती खास असणार आहे? मेष ते मीन राशीचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या.

Horoscope Today 18 January 2024 : राशीभविष्यानुसार, आज म्हणजेच 18 जानेवारी 2024 रोजी, गुरुवार हा महत्त्वाचा दिवस आहे. ग्रहांच्या चालीनुसार, वृषभ राशीच्या लोकांना आज खूप मेहनत करावी लागेल, तरच तुम्हाला यश मिळेल. आज सिंह राशीचे लोक त्यांच्या व्यवसायाला नवीन रूप देऊ शकतात, यामुळे तुम्हाला आर्थिक फायदा होईल. सर्व राशीच्या लोकांसाठी गुरुवार कसा राहील? सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या.

मेष (Aries Horoscope Mesh Rashi Today)

आजचा दिवस चांगला जाईल. नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर, तुम्ही तुमच्या ऑफिसमधील तुमच्या जबाबदाऱ्या अतिशय हुशारीने पार पाडाल आणि कोणतीही चूक करणार नाही, तुमचे बॉस तुमच्यावर खूप खूश असतील आणि ते तुमचा पगार वाढवू शकतात. व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर, व्यावसायिकांची सर्व कामे चांगली होतील. व्यवसायात प्रगती होईल. आज तुम्हाला तुमच्या व्यवसायाशी संबंधित नवीन करार मिळू शकतात, ज्यामुळे तुम्हाला चांगला नफा होईल.

तरुणांबद्दल सांगायचे तर, तुम्ही कोणतेही नवीन काम सुरू केले तर आई-वडिलांचा आशीर्वाद घ्यायला विसरू नका. तुमच्या कुटुंबात कोणतीही समस्य असेल तर ती लगेच सोडवा. मेष राशीच्या लोकांनी आज चिंतामुक्त राहा, कोणत्याही प्रकारचे टेन्शन घेऊ नका, तरच तुमचे मन आणि आरोग्य निरोगी राहील. तुम्हाला ज्या कामात रस आहे ते तुम्ही करा, यामुळे तुम्हाला खूप समाधान मिळेल. 

वृषभ (Taurus Horoscope Vrushabh Rashi Today)

आजचा दिवस चांगला जाईल. नोकरदार लोकांबद्दल सांगायचे तर, आज ऑफिसमधील कामात कोणत्याही प्रकारची चूक करू नका. व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे तर, तुमचा व्यवसाय आहे तसा चालू द्या, आज त्यात कोणतेही बदल करू नका. तुमच्या व्यवसायात कोणतेही पैसे गुंतवू नका, अन्यथा तुमचे नुकसान होऊ शकते. जर आपण तरुणांबद्दल बोललो तर, जर त्यांना त्यांच्या परीक्षेत चांगले गुण हवे असतील, तर त्यासाठी मेहनत करावी लागेल, तरच तुम्ही यश मिळवू शकता. अभ्यासाचा सराव करत राहा.

आज तुम्ही एखादी व्यक्तीशी नवीन नातं जोडत असाल तर आधी ते नातं समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि मगच ते टिकवण्याचा विचार करा. आज आरोग्याची काळजी घ्यावी. एखादी समस्या जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल आणि तुम्ही तुमच्या मुलांसोबत आनंदी राहाल.

मिथुन (Gemini Horoscope Mitun Rashi Today)

आजचा दिवस चांगला जाईल. नोकरदार लोकांबद्दल बोलायचे झाले तर, आज तुमच्या कार्यालयात तुमच्याकडून काही चूक होऊ शकते, त्यामुळे तुम्ही कार्यालयीन काम अत्यंत जबाबदारीने आणि लक्षपूर्वक करा, अन्यथा तुमचे अधिकारी तुमच्यावर नाराज होऊ शकतात. जर आपण व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोललो तर, तुमच्या हाताखाली काम करणारे लोक रजेवर गेल्यामुळे तुमच्यावर कामाचा बोजा जास्त असू शकतो. तरुणांबद्दल बोलायचे तर, आज त्यांच्या मनात अनेक प्रकारचे विचार येतील, ज्यामुळे ते एका ठिकाणी लक्ष केंद्रित करू शकणार नाही. तुम्ही तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, तरच तुम्ही तुमच्या आयुष्यात यश मिळवू शकता. 

तुमचा कोणाशी वाद झाला असेल तर थोडे सावध राहा, अन्यथा तुम्हाला अडचणींना सामोरे जावे लागू शकते. तुमच्या आरोग्याविषयी बोलायचे झाले तर, तुमचे आरोग्य सामान्य असेल, परंतु तुमच्या आई किंवा वडिलांची तब्येत बिघडू शकते, त्यामुळे त्यांच्या आरोग्याकडे लक्ष द्या, निष्काळजी राहू नका. त्यांना शक्य तितक्या लवकर डॉक्टरांकडे न्या.

कर्क (Cancer Horoscope Kark Rashi Today)

आजचा दिवस चांगला जाईल. नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर, आज तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी समस्यांना सामोरे जावे लागू शकते. प्रमोशन लिस्टमध्ये तुमचे नाव न दिल्यामुळे तुम्हाला राग येईल. जर आपण व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोललो तर, आज व्यावसायिकांना चांगला नफा मिळू शकतो, यामुळे तुम्हाला खूप आनंद होईल. तरुणांना आज मित्रांशी चांगले संबंध ठेवावे लागतील.

तुमच्या जोडीदाराबद्दल बोलायचे तर, तुमच्या जोडीदाराच्या प्रगतीसाठी आजचा दिवस चांगला आहे, म्हणून तुम्ही त्यांना पूर्ण पाठिंबा द्यावा आणि यशस्वी होण्यासाठी त्यांचे मनोबल वाढवावे. तुमच्या तब्येतीबद्दल बोलायचे झाले तर, तुम्हाला डोकेदुखी किंवा मायग्रेनचा त्रास होत असेल तर बेफिकीर राहू नका, डॉक्टरांचा सल्ला घेऊन औषधे घ्या. शेअर मार्केट किंवा सट्टा मार्केटमध्ये पैसे गुंतवले तर आज भरपूर पैसे मिळतील, चांगला नफा होऊ शकतो.

सिंह (Leo Horoscope Singh Rashi Today)

आजचा दिवस चांगला जाईल. जर आपण काम करणाऱ्या लोकांबद्दल बोललो तर, आज तुम्ही ऑफिसच्या कामात खूप व्यस्त असाल. तुम्ही तुमच्या कामात पूर्णपणे मग्न असाल. व्यवसाय करणार्‍या लोकांबद्दल बोलायचे तर, व्यापारी त्यांच्या व्यवसायाला नवीन आकार देऊ शकतात, यामुळे तुम्हाला आर्थिक फायदा होईल, परंतु अशा परिस्थितीतही व्यवसायात काही लोक तुमची दिशाभूल देखील करू शकतात. 

तरुणांनी आपल्यापेक्षा मोठ्या माणसांशी बोलताना आपल्या बोलण्यात नम्र असावे. अतिशय सौम्यपणे बोलावे. आज तुमची प्रगती पाहून तुमच्या कुटुंबातील सदस्यांना खूप आनंद होईल. तुमची दैनंदिन दिनचर्या व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करा. आज तुम्ही कठोर परिश्रम करण्याची आणि सामाजिक कार्यक्रमांमध्ये सक्रियपणे सहभागी होण्याची तयारी ठेवावी. 

कन्या (Virgo Horoscope Kanya Today)

आजचा दिवस थोडा त्रासदायक राहील. नोकरी करणार्‍या लोकांबद्दल बोलायचे तर, आज तुमच्याकडे ऑफिसची बरीच कामे असतील, ज्यामुळे तुमचा मूड ऑफ होऊ शकतो. पण तुम्ही संयमाने काम करत राहा. तुम्हाला यश नक्कीच मिळेल आणि तुम्हाला प्रमोशन देखील मिळू शकेल. व्यवसाय करणार्‍या लोकांबद्दल सांगायचे तर, व्यवसायात भागीदारी सुरू करणार्‍या लोकांशी समन्वय साधून काम करावे लागेल आणि परस्पर समंजसपणाने तुमचा व्यवसाय देखील चांगला होईल. तुमचा एकमेकांवर विश्वास हवा, कोणाच्याही चिथावणीने कोणतेही काम करू नका. व्यावसायिक भागीदारावरील विश्वास दृढ ठेवा.

तरुणांनी चुकीच्या मित्रांच्या सहवासात राहू नये. आई-वडिलांचे ऐकावे आणि त्यांनी दाखवलेल्या मार्गावर चालावे, तरच ते तुमच्यावर खूप खुश होतील. आज आरोग्याची काळजी घ्या, एखादा त्रास जाणवल्यास घरगुती उपाय करू नका. डॉक्टरांनी दिलेल्या सूचनांचे पालन करा. आज तुम्ही काहीतरी गोड तयार करून मुलांना खाऊ घालू शकता आणि त्यांना काही भेटवस्तू देखील देऊ शकता.  

तूळ (Libra Horoscope Tula Rashi Today)

आजचा दिवस चांगला जाईल. नोकरदारांना आज ऑफिसमध्ये सहकाऱ्यांची मदत करावी लागेल. व्यवसाय करणार्‍या लोकांबद्दल बोलायचे तर, गृहोपयोगी वस्तूंचा व्यवसाय करणार्‍या लोकांना आज मोठा नफा मिळू शकतो, त्यांना मोठी ऑर्डर मिळू शकते, वस्तूंचा पुरवठा मुबलक असल्यास कमाई देखील खूप जास्त होऊ शकते.  

तरुणांना जीवनात यशस्वी होण्यासाठी खूप कठोर परिश्रम करावे लागतील आणि आळशीपणा सोडावा लागेल, अन्यथा, आळशीपणामुळे तुम्ही करत असलेले एखादे काम खराब होऊ शकते. घरातील एखाद्या कामामुळे जर तुम्हाला जास्त तणाव वाटत असेल तर तुम्ही मधेच विश्रांती घ्यावी, अन्यथा तुमचे आरोग्य बिघडू शकते. आज तुम्हाला काही आर्थिक लाभ मिळू शकतो, ज्यामुळे तुमचे मन खूप आनंदी होईल. 

वृश्चिक (Scorpio Horoscope Vruschik Rashi Today)

आजचा दिवस चांगला जाईल. नोकरदार लोकांबद्दल बोलायचे तर, आज तुमच्या ऑफिसमधल्या सहकार्‍यांशी कम्युनिकेशन गॅप निर्माण होऊ देऊ नका, नाहीतर तुमचे कोणतेही काम बिघडू शकते. आज व्यापाऱ्यांना विचारपूर्वक व्यवसाय करावा लागेल. आज व्यवसायात तुमचे काही नुकसान होऊ शकते. आज तरुणांनी हट्टीपणा सोडून महत्त्वाच्या विषयांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे, अन्यथा तुमचे काही विषय अडकू शकतात, ज्याचा परिणाम तुमच्या निकालावरही होऊ शकतो.

तुमच्या वैवाहिक जीवनात दीर्घकाळापासून काही समस्या येत असतील तर तुम्ही त्या आता सुधारू शकतात. आज तुम्ही सर्व कामे विचारपूर्वक करावी. तुमच्या आरोग्याविषयी सांगायचे तर, हवामानातील बदलामुळे तुम्हाला सर्दी, खोकला इत्यादी आजार उद्भवू शकतात, त्यामुळे थोडी काळजी घ्या.

धनु (Sagittarius Horoscope Dhanu Rashi Today)

आजचा दिवस थोडा त्रासदायक असेल. काम करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर, आज तुम्हाला तुमच्या ऑफिसमध्ये कोणत्याही परिणामाची चिंता न करता फक्त तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करावे लागेल, तरच तुम्ही यश मिळवू शकाल आणि तुमचा बॉस तुमच्या कामावर खूश होईल. व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे तर, इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचा व्यवसाय करणाऱ्यांना आज काही चांगली बातमी मिळू शकते. इलेक्ट्रिक वस्तूंची चांगली विक्री होईल आणि लग्नाच्या हंगामात तुम्ही ऑफर देखील देऊ शकता, यामुळे तुमच्या वस्तूंची विक्री वाढेल.  

तरुण आज खेळाच्या माध्यमातून दिवसभर सक्रिय राहण्याचा प्रयत्न करतील. आज तुम्हाला तुमच्या कुटुंबातील तुमच्या सासरच्या लोकांकडून एखादी चांगली बातमी मिळेल, ज्यामुळे तुमचे मन खूप आनंदी होईल. त्यासाठी तुम्ही त्यांचे अभिनंदन करायला तयार असावे. आज चालताना काळजी घ्यावी, अन्यथा काही तुमच्या पायात रुतू शकते.

मकर (Capricorn Horoscope Makar Rashi Today)

आजचा दिवस थोडा ठीक राहील. जर आपण नोकरदार लोकांबद्दल बोललो तर, आज नोकरदारांना त्यांच्या चुकांमुळे ऑफिसमध्ये बॉसकडून ओरडा ऐकावा लागेल. जर व्यावसायिक लोकांबद्दल बोलायचे झाले तर, आज लाकूड व्यावसायिकांना चांगला नफा मिळू शकतो. तरुणांबद्दल बोलायचे झाले तर, त्यांनी ध्येय गाठण्यासाठी कठोर परिश्रम केले तर त्यांना नक्कीच यश मिळेल.

आज तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांना काही भेटवस्तू देऊ शकता, त्यामुळे त्यांना खूप आनंद होईल. आज वाहन चालवताना सावधगिरी बाळगा, अन्यथा काही दुखापतींना सामोरे जावे लागू शकते. जर तुम्ही एखाद्या कामासाठी मोठे कर्ज घेतले असेल तर ते फेडण्याचा प्रयत्न करा. तुमचे खर्च कमी करा आणि तुमच्या बचतीतून तुमचे कर्ज फेडण्याचा प्रयत्न करा.

कुंभ (Aquarius Horoscope Kumbha Rashi Today)

आजचा दिवस चांगला जाईल. नोकरदार लोकांबद्दल सांगायचे तर, आज तुमचे प्रलंबित बिनसलेले काम तुम्ही सुरळीतपणे पूर्ण करू शकता. व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर, किरकोळ व्यवसाय करणाऱ्या लोकांना आज थोड्याशा मंदीचा सामना करावा लागू शकतो, त्यामुळे नफ्याची जास्त अपेक्षा ठेवू नका. तरुणांबद्दल बोलताना, तरुणांनी आज आपल्या उणिवा ओळखण्याचा प्रयत्न केला पाहिजे, आपल्या उणीवांसाठी इतरांना दोष देऊ नका आणि त्या दूर करण्याचा प्रयत्न करा.

कुटुंबातील सदस्यांच्या समस्या सोडवण्यासाठी कुटुंबातील सदस्यांसोबत बसा, त्यांचे म्हणणे ऐका आणि त्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा. तुमची दिनचर्या नियमित करा. नियमित वेळेवर झोपा आणि नियमित वेळेत उठा. तुम्ही तुमच्या गुरूला किंवा काही खास व्यक्तीला भेटू शकता, ज्यांना भेटून तुम्हाला प्रसन्न वाटेल. 

मीन (Pisces Horoscope Meen Rashi Today)

आजचा दिवस चांगला जाईल. नोकरी करणाऱ्या लोकांना त्यांच्या कार्यालयात मोठी जबाबदारी घ्यावी लागेल. गरज भासल्यास तुम्ही सहकाऱ्यांची मदत घेऊ शकता. व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल सांगायचे तर, तुमच्या व्यवसायासाठी कोणताही मोठा निर्णय घेण्यासाठी तुम्हाला आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागेल. घाईघाईत कोणताही निर्णय घेणे टाळण्याचा प्रयत्न करा, यामुळे तुमचे नुकसान होऊ शकते. तरुणांबद्दल बोलायचे तर, आज त्यांना आपला राग दूर ठेवावा लागेल.

आज तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तींसोबत बसून हसत-खेळत तुमचा दिवस आनंदाने घालवू शकता. तुम्ही तुमच्या घराभोवतीचे वातावरण शांत ठेवण्याचाही प्रयत्न केला पाहिजे. हार्ट किंवा ब्लडप्रेशरच्या रूग्णांनी आज आपल्या तब्येतीची काळजी घ्यावी, त्यांनी तळलेले पदार्थ खाणे टाळावे आणि घरचेच पदार्थ खावे, बाहेरच्या गोष्टी खाणे टाळावे.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Budh Gochar 2024 : फक्त 15 दिवस बाकी! मग बुध करणार वर्षातील पहिलं मार्गक्रमण; 'या' 3 राशींची बिघडलेली कामं होणार सुरळीत

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पश्चिम रेल्वेच्या पालघर रेल्वे स्थानकाजवळ भीषण अपघात, 3 जणांचा जागीच मृत्यू 
पश्चिम रेल्वेच्या पालघर रेल्वे स्थानकाजवळ भीषण अपघात, 3 जणांचा जागीच मृत्यू 
Success Story : माढ्याच्या शिरपेचात मानाचा तुरा! 23 व्या वर्षी दोघीही  CA उत्तीर्ण, नेमकी कशी घातली यशाला गवसणी?
माढ्याच्या शिरपेचात मानाचा तुरा! 23 व्या वर्षी दोघीही  CA उत्तीर्ण, नेमकी कशी घातली यशाला गवसणी?
मोठी बातमी! सोलापुरात राहणाऱ्या 3 बांगलादेशी तरुणांना अटक, एजंटकडून काढली होती बनावट आधार कार्ड 
मोठी बातमी! सोलापुरात राहणाऱ्या 3 बांगलादेशी तरुणांना अटक, एजंटकडून काढली होती बनावट आधार कार्ड 
जगातील 10 सर्वात मोठे कर्जदार देश कोणते? भारताच्या तुलनेत अमेरिकेवर 10 पट कर्ज अधिक
जगातील 10 सर्वात मोठे कर्जदार देश कोणते? भारताच्या तुलनेत अमेरिकेवर 10 पट कर्ज अधिक
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report Annamalai : तमिळनाडूत भाजप प्रदेशाध्यक्ष अन्नामलाईंनी स्वत:ला चाबकाचे फटके का मारले?Special Report Chhatrapati Sambhajinagar : कमांडो भरतीची बोगस जाहिरात, तरुणांची फसवणूकSpecial Report Aditi tatkare On Ladki Bahin Yojana : 'लाडकी बहीण' योजनेमुळे शिक्षकांचे पगार उशीराने?Special Report : Suresh Dhas यांचे आरोप ,महायुतीमध्ये Dhananjay Munde एकाकी पडलेत?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पश्चिम रेल्वेच्या पालघर रेल्वे स्थानकाजवळ भीषण अपघात, 3 जणांचा जागीच मृत्यू 
पश्चिम रेल्वेच्या पालघर रेल्वे स्थानकाजवळ भीषण अपघात, 3 जणांचा जागीच मृत्यू 
Success Story : माढ्याच्या शिरपेचात मानाचा तुरा! 23 व्या वर्षी दोघीही  CA उत्तीर्ण, नेमकी कशी घातली यशाला गवसणी?
माढ्याच्या शिरपेचात मानाचा तुरा! 23 व्या वर्षी दोघीही  CA उत्तीर्ण, नेमकी कशी घातली यशाला गवसणी?
मोठी बातमी! सोलापुरात राहणाऱ्या 3 बांगलादेशी तरुणांना अटक, एजंटकडून काढली होती बनावट आधार कार्ड 
मोठी बातमी! सोलापुरात राहणाऱ्या 3 बांगलादेशी तरुणांना अटक, एजंटकडून काढली होती बनावट आधार कार्ड 
जगातील 10 सर्वात मोठे कर्जदार देश कोणते? भारताच्या तुलनेत अमेरिकेवर 10 पट कर्ज अधिक
जगातील 10 सर्वात मोठे कर्जदार देश कोणते? भारताच्या तुलनेत अमेरिकेवर 10 पट कर्ज अधिक
Rohit Sharma : तर रोहित शर्माचा सुद्धा सिडनीत अश्विनसारखाच 'द एंड' अटळ? सुनील गावसकर थेट बोलले, तिकडं आगरकरही ऑस्ट्रेलियात पोहोचले!
तर रोहित शर्माचा सुद्धा सिडनीत अश्विनसारखाच 'द एंड' अटळ? सुनील गावसकर थेट बोलले, तिकडं आगरकरही ऑस्ट्रेलियात पोहोचले!
Pakistan on Manmohan Singh : पाकिस्तानमधील गाहमध्ये जन्म, पण भारताच्या 'अर्थक्रांती'चे शिल्पकार अन् पीएमही झाले; झेलमचा सुपूत्र मनमोहन सिंग यांच्या निधनावर पाकिस्तान काय म्हणाला?
पाकिस्तानमधील गाहमध्ये जन्म, पण भारताच्या 'अर्थक्रांती'चे शिल्पकार अन् पीएमही झाले; झेलमचा सुपूत्र मनमोहन सिंग यांच्या निधनावर पाकिस्तान काय म्हणाला?
Santosh Deshmukh Case : बीडमध्ये पावसाची वाणवा, पण बंदुकीतून हवेत फैरींवर फैरी करणाऱ्या टपरी अन् छपरींचा महापूर! जिल्ह्यात किती हजार जणांकडे शस्त्र परवाना?
बीडमध्ये पावसाची वाणवा, पण बंदुकीतून हवेत फैरींवर फैरी करणाऱ्या टपरी अन् छपरींचा महापूर! जिल्ह्यात किती हजार जणांकडे शस्त्र परवाना?
Mutual Fund SIP : 15000 रुपयांच्या दरमहा एसआयपीनं 15 कोटी रुपये किती वर्षात होतील? जाणून घ्या समीकरण
15000 रुपयांच्या दरमहा एसआयपीनं 15 कोटी रुपये किती वर्षात होतील? जाणून घ्या समीकरण
Embed widget