एक्स्प्लोर

दावोसमध्ये 3 लाख 53 हजार कोटींचा विक्रमी करार, महाराष्ट्रात 2 लाख रोजगार निर्मिती होणार

पोलाद, आयटी, हरित उर्जा, कृषी, लॉजिस्टिक्, इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात मोठी गुंतवणूक, महाराष्ट्रावर दाखविलेल्या विश्वासाबद्धल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मानले गुंतवणूकदारांचे आभार

मुंबई : स्वित्झर्लंडमधील दावोसमध्ये सुरु असलेल्या जागतिक आर्थिक परिषदेत दोन दिवसांत महाराष्ट्राने 3 लाख 10 हजार 850 कोटीचे सामंजस्य  करार केले आहेत. त्याशिवाय गुरुवारी 42 हजार 825 कोटींचे करार होत आहेत. अशा रितीने 3 लाख 53 हजार 675 लाख कोटींचे विक्रमी सामंजस्य  करार करीत असल्याची  माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. याव्यतिरिक्त 1 लाख कोटींच्या गुंतवणुकीत उद्योगांनी स्वारस्य दाखवले असल्याने राज्यावर जागतिक उद्योग आणि गुंतवणूकदारांचा विश्वास वाढला आहे अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी त्यांचे आभारही मानले आहेत. या करारांमुळे राज्यात 2 लाख इतक्या मोठ्या संख्येने रोजगार निर्मिती होणार आहे.

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा अधिक वाढ

 हे सामंजस्य करार केवळ कागदावर न राहता त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी जलदगतीने करण्याचा आमचा भर आहे. गेल्या वर्षी दावोस येथे झालेल्या करारांपेक्षा यंदा अधिक गुंतवणुकीचे सामंजस्य करार होत आहेत, असे सांगतानाच उद्योगपूरक, कुशल मनुष्यबळ आणि झटपट निर्णय घेणारे लोकाभिमुख राज्य अशी  महाराष्ट्राची प्रतिमा जगभरात असल्याचे याठिकाणी जाणवल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. 

दावोस परिषदेच्या पहिल्याच दिवशी म्हणजे 16 तारखेस 6 उद्योगांसमवेत 1 लाख 2 हजार कोटींच्या गुंतवणुकीचे करार करण्यात आले. त्यातून 26 हजार रोजगार निर्मिती होणार आहे. 17 जानेवारीस 8 उद्योगांशी 2 लाख 8 हजार 850 कोटींचे गुंतवणूक करार करण्यात आले. त्यातून 1 लाख 51 हजार 900 रोजगार निर्मिती होईल. उद्या 6 उद्योगांशी 42 हजार 825 कोटींचे करार होत असून त्यातून 13 हजार रोजगार निर्माण होतील असे मुख्यमंत्री म्हणाले.   

गुंतवणूक करार झालेल्या उद्योगांची माहिती व रोजगार पुढीलप्रमाणे : 

16 जानेवारी – आयनॉक्स एअर प्रोडक्ट 25 हजार कोटी ( 5 हजार रोजगार ), बी सी जिंदाल 41हजार कोटी ( 5 हजार रोजगार), जेएसडब्ल्यू स्टील 25 हजार कोटी ( 15 हजार रोजगार), एबी इन बेव्ह 600 कोटी ( 150 रोजगार), गोदरेज एग्रोव्हेट 1000 कोटी ( 650 रोजगार) अमेरिका स्थित डेटा कंपनी 10 हजार कोटी ( 200 रोजगार)

17 जानेवारी – अदानी ग्रुप 50 हजार कोटी ( 500रोजगार), स्विस इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स 1158 कोटी ( 500 रोजगार), इंडियन ज्वेलरी पार्क 50 हजार कोटी ( 1 लाख रोजगार), वेब वर्क्स 5ह्जार कोटी ( 100 रोजगार), लॉजिस्टिकमधील इंडोस्पेस,इएसआर, केएसएच, प्रगती, यांची मिळून 3500 कोटी ( 15 हजार रोजगार), नसर्गिक संसाधानातील कॉन्गलोमिरेट कंपनी 20 हजार कोटी ( 4 हजार रोजगार) 

महाप्रीत ने हरित उर्जा प्रकल्पांसाठी 56हजार कोटींचे करार केले. अमेरिकास्थित प्रेडीक्शन्स समवेत 4 हजार कोटी, युरोपमधील हिरो फ्युचर एनर्जी मध्ये 8 हजार कोटी, जर्मनीच्या ग्रीन एनर्जी 3000 मध्ये 40 हजार कोटी, व्हीएचएम ओमान समवेत 4 हजार कोटी  

18 जानेवारीस पुढील सामंजस्य करार होतील-  सुरजागड इस्पात 10 हजार कोटी ( 5 हजार रोजगार), कालिका स्टील 900 कोटी ( 800 रोजगार), मिलियन स्टील 250 कोटी ( 300 रोजगार), ह्युंदाई मोटर्स 7 हजार कोटी ( 4 हजार रोजगार ), कतारची एएलयु टेक समवेत 2075 कोटी ( 400 रोजगार), सीटीआरएल एस ( ctr s) 8600 कोटी ( 2500 रोजगार)   

1 लाख कोटींचे गुंतवणूक स्वारस्य 
याशिवाय विविध उद्योगांनी 1 लाख कोटींचे गुंतवणूक स्वारस्य दाखविले असून यात अर्सेलर निपॉन मित्तल तसेच सौदी, अरब, ओमान येथील उद्योगांचा समावेश आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Laxman Hake: महाराष्ट्राच्या मानगुटीवर जरांगे नावाचं भूत शरद पवारांनी बसवलं; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
महाराष्ट्राच्या मानगुटीवर जरांगे नावाचं भूत शरद पवारांनी बसवलं; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
Eknath Shinde : त्यावेळी आम्ही जे केलं ते खुलेआम केलं, जनतेच्या मनातील केलं, ते काय झोपले होते का? एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
त्यावेळी आम्ही जे केलं ते खुलेआम केलं, जनतेच्या मनातील केलं, ते काय झोपले होते का? : एकनाथ शिंदे
Eknath Shinde: प्रचार संपायला अवघे काही तास शिल्लक, एकनाथ शिंदेंचा शिवसैनिकांना महत्त्वाचा आदेश, म्हणाले, 'या' चुका टाळा
Eknath Shinde: प्रचार संपायला अवघे काही तास शिल्लक, एकनाथ शिंदेंचा शिवसैनिकांना महत्त्वाचा आदेश, म्हणाले, 'या' चुका टाळा
Sarpanch Viral Video : सरपंच साहेब गर्लफ्रेंडसोबत 'लाँग ड्राईव्ह'वर, बायकोनं थेट चौकात पकडलं अन् गर्लफ्रेंडच्या झिंज्या धरुन रस्त्यावर फोडून काढलं!
Video : सरपंच साहेब गर्लफ्रेंडसोबत 'लाँग ड्राईव्ह'वर, बायकोनं थेट चौकात पकडलं अन् गर्लफ्रेंडच्या झिंज्या धरुन रस्त्यावर फोडून काढलं!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis : स्ट्राईक रेट आणि जागांवर मुख्यमंत्रिपदाचा निर्णय होणार नाही - देवेंद्र फडणवीसCM Eknath Shinde : बाळासाहेबांच्या मनातला महाराष्ट्र घडवण्यासाठी आमचे प्रयत्नSanjay Raut on Shivsena Advertisenment : शिंदेंच्या शिवसेनेची जाहीरात; राऊतांचा पलटवारSharad Pawar Bag Checking Baramati : बारामतीत शरद पवारांच्या बॅगची तपासणी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Laxman Hake: महाराष्ट्राच्या मानगुटीवर जरांगे नावाचं भूत शरद पवारांनी बसवलं; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
महाराष्ट्राच्या मानगुटीवर जरांगे नावाचं भूत शरद पवारांनी बसवलं; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
Eknath Shinde : त्यावेळी आम्ही जे केलं ते खुलेआम केलं, जनतेच्या मनातील केलं, ते काय झोपले होते का? एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
त्यावेळी आम्ही जे केलं ते खुलेआम केलं, जनतेच्या मनातील केलं, ते काय झोपले होते का? : एकनाथ शिंदे
Eknath Shinde: प्रचार संपायला अवघे काही तास शिल्लक, एकनाथ शिंदेंचा शिवसैनिकांना महत्त्वाचा आदेश, म्हणाले, 'या' चुका टाळा
Eknath Shinde: प्रचार संपायला अवघे काही तास शिल्लक, एकनाथ शिंदेंचा शिवसैनिकांना महत्त्वाचा आदेश, म्हणाले, 'या' चुका टाळा
Sarpanch Viral Video : सरपंच साहेब गर्लफ्रेंडसोबत 'लाँग ड्राईव्ह'वर, बायकोनं थेट चौकात पकडलं अन् गर्लफ्रेंडच्या झिंज्या धरुन रस्त्यावर फोडून काढलं!
Video : सरपंच साहेब गर्लफ्रेंडसोबत 'लाँग ड्राईव्ह'वर, बायकोनं थेट चौकात पकडलं अन् गर्लफ्रेंडच्या झिंज्या धरुन रस्त्यावर फोडून काढलं!
मोठी बातमी : पारनेरमध्ये शेवटच्या क्षणी गेम फिरला, निलेश लंकेंच्या कट्टर विरोधकाचा अजितदादा गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
मोठी बातमी : पारनेरमध्ये शेवटच्या क्षणी गेम फिरला, निलेश लंकेंच्या कट्टर विरोधकाचा अजितदादा गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
Priyanka Gandhi In Kolhapur : प्रियांका गांधी प्रथमच कोल्हापुरात अन् जुना सहकारी विमानतळावर दिसताच ताफा अचानक जागेवर थांबला! बोलवून केली विचारपूस
प्रियांका गांधी प्रथमच कोल्हापुरात अन् जुना सहकारी दिसताच विमानतळावर ताफा अचानक जागेवर थांबला! बोलवून केली विचारपूस
हौसेने चप्पल चिन्ह घेतलं, आता आचारसंहितेच्या कचाट्यात, मतदानाला चप्पल घालून येण्यास बंदी
हौसेने चप्पल चिन्ह घेतलं, आता आचारसंहितेच्या कचाट्यात, मतदानाला चप्पल घालून येण्यास बंदी
Eknath Shinde Exclusive : भाजप वापरून फेकून देते, ठाकरेंच्या 'त्या' वक्तव्यावर एकनाथ शिंदेंचा पलटवार, म्हणाले 'उद्धव ठाकरे पण तेच...'
भाजप वापरून फेकून देते, ठाकरेंच्या 'त्या' वक्तव्यावर एकनाथ शिंदेंचा पलटवार, म्हणाले 'उद्धव ठाकरे पण तेच...'
Embed widget