Morning Headlines 15th August : मॉर्निंग न्यूजमध्ये वाचा देश विदेशातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर
देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
PM Modi Independence Day Speech : मणिपूरमधील समस्येवर शांततेतून तोडगा काढणार : पंतप्रधान नरेंद्र मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग दहाव्यांदा लाल किल्ल्यावर तिरंगा फडकावला. यावेळी 21 तोफांची सलामी देण्यात आली. स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरुन देशाला संबोधित केलं. यावेळी पंतप्रधानांकडून विकसित भारत बनवण्याचा संकल्प करण्यात आला आहे. आपल्या भाषणात पंतप्रधानांनी आत्मनिर्भर भारत, मणिपूर, शेतकरी, शेजारी राष्ट्रांबद्दलचं धोरण यासह अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. मणिपूरमधील समस्येवर शांततेतून तोडगा काढणार असे मोदी या वेळी म्हणाले. वाचा सविस्तर
आज स्वातंत्र्यदिनीही पेट्रोल-डिझेलचे दर स्थिरच; कुठे किती रुपयांनी विकलं जातंय एक लिटर पेट्रोल?
आज देशाचा स्वातंत्र्यदिन... आजही देशातील पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. भारतीय तेल कंपन्यांकडून मंगळवारी पेट्रोल-डिझेलच्या दरांत सवलत कायम आहे. बीपीसीएल, एचपीसीएल आणि इंडियन ऑइलनं स्वातंत्र्यदिनी किमती बदललेल्या नाहीत. दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि कोलकाता येथेही पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. गेल्या वर्षी पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत शेवटच्या वेळी बदल करण्यात आला होता. तेव्हापासून देशातील पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. वाचा सविस्तर
द्वारका एक्स्प्रेसवेसाठी 14 पट अधिक खर्च, कॅगचा ठपका; मात्र, सरकारकडून खर्चाचे समर्थन
नियंत्रक आणि महालेखा परीक्षक अर्थान 'कॅग'ने (CAG) केंद्राच्या भारतमाला परियोजना टप्पा-1 अंतर्गत असलेल्या द्वारका एक्स्प्रेस वेसाठी मंजूर केलेल्या खर्चापेक्षा 14 पट अधिक खर्च केला असल्याचे नमूद केल्यानंतर एकच गदारोळ उडाला. या एक्स्प्रेसवेच्या बांधकामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप होऊ लागला. मात्र, रस्ते आणि वाहतूक मंत्रालयाने या 14 पट अधिक खर्चाचे समर्थन केले आहे. वाचा सविस्तर
राज्यात दहशतवादी संघटनांचा वाढता आलेख? तपास यंत्रणांकडून धक्कादायक माहिती समोर
मागील वर्षात तपास यंत्रणांनी केलेल्या कारवाईनंतर सध्या बीड, औरंगाबाद, मालेगाव आणि परभणी हे जिल्हे पुन्हा एकदा तपास यंत्रणांच्या निशाण्यावर आहेत. दरम्यान या दहशतवादी संघटना वेगवेगळ्या जिल्ह्यातून कार्यरत असल्याची माहिती देखील आता समोर येत आहे. त्यामुळे देशातील तसेच राज्यातील सुरक्षा यंत्रणांवर सध्या प्रश्न उपस्थित केला जात आहेत. यामध्ये सर्वात जास्त चर्चेत आला तो म्हणजे राज्यातील बीड जिल्हा. कारण बीडमध्ये राहणारा झैबुद्दीन अन्सारी ही तपास यंत्रणांच्या रडावर होता. त्याची बॉम्बस्फोट आणि 26/11 मुंबई दहशतवादी हल्ला प्रकरणातही चौकशी करण्यात आली होती. वाचा सविस्तर
म्हाडाच्या साडेसात कोटींच्या घरासाठी मंत्री भागवत कराड वेटिंगवर, आमदार कुचे ठरले यशस्वी विजेते
Mhada Lottery 2023 : म्हाडाच्या मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे मुंबईतील विविध गृहनिर्माण योजनांतर्गत घरांसाठी सोडत करण्यात आली आहे. यामध्ये दक्षिण मुंबईच्या ताडदेवमधील साडेसात कोटींच्या घरासाठी केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड म्हाडाच्या यादीत वेटिंगवर आहेत. तर भाजप आमदार नारायण कुचे यांनी बाजी मारली आहे. साडेसात कोटींच्या घरावर कुचे यांना आमदार/खासदारांच्या कोट्यातून सदनिका लागली आहे. वाचा सविस्तर
15th August Headlines : देशभरात स्वातंत्र्य दिनाचा उत्साह, आजपासून सार्वजनिक आरोग्य विभागाच्या रुग्णालयात मोफत उपचार; आज दिवसभरात
आज देशाचा 77 वा स्वातंत्र्य दिनाचा उत्साह आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्ताने देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लाल किल्ल्यावर ध्वजारोहण होणार आहे. तर, राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मंत्रालयात ध्वजारोहण केले जाणार आहे. वाचा सविस्तर
15th August In History: दीडशे वर्षांच्या गुलामगिरीतून भारत स्वातंत्र्य झाला, पोस्टाची पीन कोड सेवा सुरु; आज दिवसभरात
इंग्रजांच्या प्रदीर्घ गुलामगिरीनंतर अखेर 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताने मोकळा श्वास घेतला आणि भारताच्या भूमीत स्वातंत्र्याचा सूर्य उगवला. ब्रिटिशांनी सत्ता भारतीयांच्या हाती सोपवली आणि त्यांनी देश सोडला. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून पंडित नेहरूंनी शपथ घेतली. या दिवसाशी संबंधित इतर घटनांबद्दल बोलायचे झाल्यास, 15 ऑगस्ट ही तारीख एका खास कारणासाठी भारतीय पोस्टल सेवेच्या इतिहासात नोंदवली जाते. खरे तर 1972 मध्ये 15 ऑगस्ट याच दिवशी 'पोस्टल इंडेक्स नंबर' म्हणजेच पिन कोड लागू झाला. प्रत्येक क्षेत्रासाठी स्वतंत्र पिन कोड असल्याने टपाल वाहतूक करणे सोपे झाले. वाचा सविस्तर
वृषभ, सिंह, कन्या आणि मकर राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस खास, जाणून घ्या आजचं राशीभविष्य...
आज वार मंगळवार दिनांक 15 ऑगस्ट 2023. आजचा दिवस काही राशींच्या लोकांसाठी खास असणार आहे. वृषभ, सिंह, कन्या आणि मकर राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायी ठरणार आहे. पाहुयात आजचा दिवस मेष ते मीन या राशींच्या लोकांसाठी कसा राहिल. वाचा सविस्तर