एक्स्प्लोर

15th August Headlines : देशभरात स्वातंत्र्य दिनाचा उत्साह, आजपासून सार्वजनिक आरोग्य विभागाच्या रुग्णालयात मोफत उपचार; आज दिवसभरात

15th August Headlines : स्वातंत्र्य दिनानिमित्ताने देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लाल किल्ल्यावर ध्वजारोहण होणार आहे

 15th August Headlines : आज देशाचा 77 वा स्वातंत्र्य दिनाचा उत्साह आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्ताने देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लाल किल्ल्यावर ध्वजारोहण होणार आहे. तर, राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मंत्रालयात ध्वजारोहण केले जाणार आहे. 

लाल किल्ल्यावर पंतप्रधानांच्या हस्ते ध्वजारोहण केलं जातं. 

· लाल किल्यावर स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम सकाळी 6.55 मिनीटांनी सुरू होणार आहे. 7.33 वाजता पंतप्रधान मोदींच भाषण होईल. सकाळी 7.30 वाजता पंतप्रधान मोदी ध्वाजारोहण करतील आणि त्यानंतर 21 तोफांची सलामी दिली जाईल. त्यानंतर 7.33 वाजता पंतप्रधान मोदींचे देशाला उद्देशून भाषण होईल.

यावर्षी महाराष्ट्रातील शेतकरी उत्पादक संघटना योजनेच्या 24 लाभार्थ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या समारोहाला आमंत्रित करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लाल किल्ल्यावरुन केलेले भाषण ऐकण्यासाठी आमंत्रित करण्यात आलेल्या 1 हजार 800 व्यक्तींमध्ये या योजनेच्या अडीचशे लाभार्थ्यांचा त्यांच्या जोडीदारासह समावेश आहे. या विशेष निमंत्रितांमध्ये व्हायब्रंट व्हिलेजेसचे  सरपंच, शिक्षक, शेतकरी,मच्छिमार तसेच सेन्ट्रल व्हिस्टा प्रकल्प, अमृत सरोवर, हर घर जल या आणि अशाच इतर महत्त्वाच्या सरकारी कार्यक्रमांमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींचा समावेश आहे. 
 
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मंत्रालयात ध्वजारोहण 

- मुंबई- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंत्रालयातील ध्वजारोहण करणार आहेत. ध्वजारोहण झाल्यानंतर मुख्यमंत्री राज्याला उद्देशून भाषण करतील. यामध्ये राज्याच्या प्रगतीच्या सध्याचे स्थितीवरती ते भाष्य करतील.

- मुंबई- स्वातंत्र्य दिनानिमित्त उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्या शिवसेना भवन येथे सकाळी 8 वाजता ध्वजारोहण होणार आहे. 

- मुंबई - भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेशच्या कार्यालयात, स्वातंत्र्य दिनानिमित्त “ध्वजारोहण आणि भारतमाता पूजन” कार्यक्रम आयोजित केले आहे. 

- मुंबई -राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या वतीने खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते सकाळी दहा वाजता बेलार्ड पियर येथील कार्यालयात ध्वजारोहण होणार आहे.

आमदार बच्चू कडू यांची पर्यावरण आणि तिरंगा रॅली 

अमरावती - आमदार बच्चू कडू यांची पर्यावरण आणि तिरंगा सायकल रॅली काढणार आहे. पर्यावरण राखणं हे देशहितासाठी महत्वाचं आहे. यासाठी ही सायकल रॅली आहे. 

आजपासून सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सर्व शासकीय रुग्णालयात सर्वांना मोफत उपचार

आज 15 ऑगस्टपासून राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सर्व शासकीय रुग्णालयात सर्वांना मोफत उपचार मिळणार आहेत. तसेच काही चाचण्याही मोफत होणार आहेत.

खासदार विनायक राऊत यांचे उपोषण

रत्नागिरी – आज सर्वत्र स्वतंत्र दिनाचा उत्साह असेल. पण स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत संगमेश्वर मधील कथित जमीन घोटाळ्याच्या प्रकरणात उपोषणाची हाक देणार आहेत. संगमेश्वर मधील काही जमीन अदानी समूहाशी संबंधित कंपन्यांनी खरेदी केल्याचा आरोप राऊत यांनी काही महिन्यापूर्वी पत्रकार परिषदेमध्ये केला होता. दरम्यान ही खरेदी केलेली जमीन मूळ मालकाला फसवून त्याच्या संमतीशिवाय परस्पर सातबारामध्ये बदल करून खरेदी केल्याचं राऊत यांचं म्हणणं आहे. याच मुद्द्यावर ते उपोषण करणार आहेत. 
 
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune crime : चारित्र्यावर संशय, नात्याला 'कात्री'; व्हिडीओ शूट करत पतीने पत्नीला संपवलं, पुण्यात नात्याला काळीमा
चारित्र्यावर संशय, नात्याला 'कात्री'; व्हिडीओ शूट करत पतीने पत्नीला संपवलं, पुण्यात नात्याला काळीमा
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार,  पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार, पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bangladeshi Ladki Bahin | भारतात बांगलादेशी लाडकी बहीण, नेमकं प्रकरण काय? Special ReportSharad Pawar Special Reportशुगर इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमात शरद पवार Ajit Pawarनी शेजारी बसणं टाळलंUddhav Thackeray Speech Andheri| भाजपवर निशाणा, शिदेंचा घेतला समाचार, अंधेरी मेळाव्यात ठाकरे कडाडलेEknath Shinde BKC Full Speech : उठाव ते विधानसभेचा निकाल; एकनाथ शिंदेंची तुफान फटकेबाजी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune crime : चारित्र्यावर संशय, नात्याला 'कात्री'; व्हिडीओ शूट करत पतीने पत्नीला संपवलं, पुण्यात नात्याला काळीमा
चारित्र्यावर संशय, नात्याला 'कात्री'; व्हिडीओ शूट करत पतीने पत्नीला संपवलं, पुण्यात नात्याला काळीमा
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार,  पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार, पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
शेरोशायरी, उद्धव ठाकरेंवर बाण, लाडक्या बहणींचाही सन्मान; बऱ्याच दिवसांंनी एकनाथ शिंदे भाषणात कडाडले
शेरोशायरी, उद्धव ठाकरेंवर बाण, लाडक्या बहणींचाही सन्मान; बऱ्याच दिवसांंनी एकनाथ शिंदे भाषणात कडाडले
Ajit Pawar: महामंडळांचं वाटप लवकरच, महायुतीमधील 3 नेत्यांना जबाबदारी; अजित पवारांनी सांगितली तीन नावं
महामंडळांचं वाटप लवकरच, महायुतीमधील 3 नेत्यांना जबाबदारी; अजित पवारांनी सांगितली तीन नावं
Devendra Fadnavis : महाराष्ट्रासाठी मोठी गुंतवणूक, तरुणांना रोजगाराच्या संधी, देवेंद्र फडणवीस दोवोसमधून काय काय म्हणाले?
Devendra Fadnavis : महाराष्ट्रासाठी मोठी गुंतवणूक, तरुणांना रोजगाराच्या संधी, देवेंद्र फडणवीस दोवोसमधून काय काय म्हणाले?
Raj Thackeray : राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
Embed widget