Morning Headlines : देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर मॉर्निंग न्यूज
देश विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
देश विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
आज देशभरात ईदचा उत्साह, भारतात नमाजासाठी मशिदीत जमले रोजेदार
देशासह जगभरात आज 'ईद-उल-फित्र' म्हणजेच 'रमजान ईद' साजरी केली जात आहे. मुस्लीम बांधवांचा ईद हा अत्यंत पवित्र सण आहे. या दिवसाची प्रत्येकजण आतुरतेने वाट पाहतो. याच पार्श्वभूमीवर आज पहाटेपासूनच ईदच्या नमाजासाठी मशिदींमध्ये मुस्लीम बांधवांची गर्दी होऊ लागली आहे. लोक एकमेकांना ईदच्या शुभेच्छा देत आहेत. काल म्हणजेच (21 एप्रिल) रोजी भारतात संध्याकाळी ईदचा चंद्र दिसल्यानंतर आज सगळीकडे ईदचा उत्साह पाहायला मिळतोय. वाचा सविस्तर
राहुल गांधी 12 तुघलक लेन या शासकीय बंगल्याची चावी लोकसभा सचिवालयाला परत करणार
ग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी आपलं निवासस्थान रिकामं केलं आहे. 12, तुघलक लेन या शासकीय निवासस्थानात राहुल गांधी यांचं वास्तव्य होतं. मात्र खासदारकी गेल्यानं त्यांना घर रिकामं करण्याची नोटीस पाठवण्यात आली. यासाठी एक महिन्याचा कालावधी देण्यात आला होता. चार दिवसांपूर्वी राहुल यांनी बहुतांश सामान 10, जनपथ या सोनिया गांधींच्या निवासस्थानी पाठवलं. काल संध्याकाळी त्यांनी शेवटचं शिफ्टींग केलं. ते स्वतः काही दिवसांपूर्वीच सोनिया गांधींच्या बंगल्यात शिफ्ट झाले आहेत वाचा सविस्तर
देशातील अनेक राज्यात अवकाळीचा फेरा
देशातील वातावरणात सातत्यानं बदल होत आहे. कुठे उन्हाचा तडाका जाणवत आहे, तर कुठे अवकाळी पाऊस कोसळत आहे. याचा शेती पिकांना फटका बसत आहे. दरम्यानं, हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार आजही देशातील विविध राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच तापमानात दोन ते तीन अंशाची घट होण्याची शक्यता देखील वर्तवली आहे. वाचा सविस्तर
अवकाळी पावसाचा फळांच्या राजाला फटका, देशातील आंबा उत्पादक संकटात
देशातील काही भागात अवकाळी पावासानंही धुमाकूळ घातला आहे. तर काही ठिकाणी गारपीट देखील होत आहे. या बदलत्या वातावरणाचा शेती पिकांना मोठा फटका बसत आहे. अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळं ओडिशा, उत्तर प्रदेशसह अनेक राज्यांमध्ये शेतकऱ्यांच्या आंबा पिकांची नासाडी केली आहे. याचा मोठा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसला आहे. वाचा सविस्तर
श्रीनगरचं ट्युलिप गार्डन पर्यटकांनी फुलले, 32 दिवसांत साडे तीन लाख पर्यटकांची भेट
गार्डन खुले झाल्यानंतर 32 दिवसांत येथे 3.7 लाख पर्यटकांनी भेट दिली. यामध्ये तीन हजारपेक्षा अधिक विदेशी पर्यटक होते.
काश्मीरमध्ये नवा पर्यटन हंगाम सुरू होताच आशियातील सर्वात मोठं ट्युलिप गार्डन पर्यटकांसाठी विशेष आकर्षण ठरले आहे. वाचा सविस्तर
रशियन क्रांतीचा जनक लेनिनचा जन्म, सुभाषचंद्र बोस यांचा ICS सेवेचा राजीनामा; आज इतिहासात
पृथ्वीवर राहणारे सर्व प्राणी आणि वनस्पती वाचविण्याच्या आणि जगभरातील पर्यावरणाविषयी जागरूकता वाढवण्याच्या उद्देशाने 22 एप्रिल रोजी 'अर्थ डे' म्हणजेच 'वसुंधरा दिन' साजरा करण्यास सुरुवात करण्यात आली. 1970 मध्ये सुरू झालेली ही परंपरा 192 देशांनी स्वीकारली आणि आज जवळजवळ प्रत्येक वर्षी वसुंधरा दिना साजरा केला जातो. त्याचसोबत आजच्याच दिवशी पॅरिस करारावर स्वाक्षरी करण्यात आली. वाचा सविस्तर
आजचा शनिवार 'या' राशींसाठी सुख-समृद्धीचा! मेष ते मीन राशींचा कसा असेल आजचा दिवस? वाचा राशीभविष्य
आजचा शनिवार हा खूप महत्त्वाचा दिवस आहे. मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या यांसह सर्व राशींना आज सुख-समृद्धी मिळेल. या दिवशी कोणाला मिळेल यश? काय म्हणतात तुमच्या नशीबाचे तारे? जाणून घ्या आजचं राशीभविष्य वाचा सविस्तर
'जागतिक वसुंधरा दिन' का साजरा केला जातो? वाचा इतिहास आणि महत्त्व
भारतात दरवर्षी 22 एप्रिल रोजी जागतिक पृथ्वी दिन (World Earth Day 2023) साजरा केला जातो. वाढते प्रदूषण आणि अयोग्य जीवनशैली हेच पृथ्वीच्या सद्य:स्थितीमागील मुख्य कारण आहे. हा दिवस 'आंतरराष्ट्रीय मातृ वसुंधरा दिन' म्हणूनही ओळखला जातो. आपल्या पृथ्वीचे संरक्षण करणे ही प्रत्येकाची जबाबदराी आहे आणि याचीच आठवण करून देणे हेच जागतिक वसुंधरा दिनाचे मुख्य उदिद्ष्ट आहे. यामुळेच या दिवशी पर्यावरण रक्षण आणि पृथ्वी वाचवण्याची प्रतिज्ञा घेतली जाते.
वाचा सविस्तर